पैसा सांगतो, नियमाने वागा..

पैसा सांगतो, नियमाने वागा..

गडगंज श्रीमंत लोकांकडे पाहलं की तुम्हाला प्रश्न पडत असेल यांच्याकडे एवढा पैसा येतो तरी कुठून? हे लोक काही दिवस रात्र घाम गाळत नाही. पैशाने पैसा खेचून आणता येतो का? पैशाचे असे काही नियम आहे का? जे फॉलो केले तर आपल्याकडे सुद्धा पैसे येतील? नक्कीच येतील, या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पैशाचे काही नियम सांगणार आहे जे अंमलात आणले तर तुमची नक्कीच भरभराट होईल.   

1. पैसा कमवा आणि टिकवा 
बहुदा लोक काय करतात तर थोडा पैसा बँक अकाउंटमध्ये आला तर तो पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवून डबल करण्यापेक्षा तो खर्च करून टाकतात. त्यांची लाईफस्टाईल बदलतात, महागड्या वस्तू खरेदी करातात. जिथे पैशांची देखरेख ठेवली जाते आणि काळजी घेतली जाते तिथेच तो टिकतो हे लक्षात घ्या.         

2. तुमच्या पैशाविषयी गुप्तता पाळा 
तुमच्याकडे असलेल्या सगळ्याच पैशाविषयी इतरांना सांगू नका. एखादं सिक्रेट अकाउंट मेंटेन करा ज्याबद्दल केवळ तुम्हालाच माहीत आहे असं. सिक्रेट ठेवलेला पैसा चांगला वाढतो. याचं कारण काय? जेव्हा तुमच्या आर्थिक बाबींची तुम्ही इतरांना कल्पना देता तेव्हा ते तुमचा फायदा घेण्याची शक्यता असते. छोट्या छोट्या कारणांसाठी ते तुमच्याकडे पैसे मागू शकतात. तो तर मनुष्य स्वभावच आहे, त्याला कोणीही बदलू नाही शकत. पण, जेव्हा तुम्ही पैसे द्यायला नकार द्याल तेव्हा तुमच्यातील संबंध बिघडू शकतात. मी असं म्हणत नाही की तुम्ही त्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करू नका. पण, जर का तुमच्याकडे सिक्रेट अकाउंट असेल तर इमर्जंसीमध्ये तुम्ही ते पैसे वापरू शकता. कधीही कोणत्याही कारणासाठी तुम्हाला पैशांची गरज भासू शकते. त्यावेळी हे पैसे तुम्हाला वापरता येतील. 

3. आणीबाणीच्या परिस्थितीत पैसा कमवला जातो. 
लॉकडाऊनमध्ये तुम्ही पाहिलं असेल शेअर मार्केट कोसळला होता. रिअलइस्टेट मध्ये सुद्धा घरांच्या किंमती कमी झाल्या होत्या. हा असा काळ होता ज्यावेळी सामान्य माणूस खरेदी करू शकत नाही. सर्वसाधारण पणे खरेदीकडे लोकांचा कल नसतो. पैसेवाले लोक नेमकं याच वेळी प्रॉपर्टी किंवा शेअर्स खरेदी करतात. यावेळी मागणी कमी असल्याने खरेदी करणाऱ्याची बार्गेनिंग पावर वाढते. हिच प्रॉपर्टी 2 वर्षांनी विक्रीला काढली तरी त्यातून भरपूर प्रॉफीट मिळतो.  
4. पैसा प्रवाही ठेवा. 
मित्रांनो पैशाला एकाच ठिकाणी रहायला आवडत नाही. तुम्ही पैसा तुमच्या बँक अकाउंटमध्ये पडून ठेवलात तर तो नाराज होईल (Sarcasm). माणसांप्रमाणेच पैसा जेव्हा एकाच ठिकाणी राहून कंटाळतो तेव्हा तो अनुत्पादक होऊन जातो आणि तुमचं नुकसान सुद्धा करतो. तुम्हाला माझं बोलणं हास्यास्पद वाटेल पण हे खरंय. पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवला नाही तर तो कंटाळतो. समजा एकाच बिझनेसमध्ये तुम्ही पैसा टाकत राहिलात, पण त्यातून तुम्हाला काहीच रिटर्न्स मिळत नसतील तर असा पैसा तुमचं नुकसानच करतो. पैसा नुसता बँकेत पडून ठेवला तरीही तो वाया घालवण्यासारखाच आहे. मी मघाशी तुम्हाला सिक्रेट अकाउंटबद्दल बोललो त्यात आणि यात फरक आहे. ते मी तुम्हाला इमर्जन्सीसाठी मेंटेन करायला सांगितलंय.       

5. उधळपट्टी करणारे लोक पैशाला आवडत नाहीत 
जिथे पैसा सतत खर्च केला जातो तिथे तो कधीच वाढत नाही. तुम्ही जितका खर्च करता त्याच्या दुप्पट तुम्हाला पुन्हा कमवून आणता आलं पाहिजे. तुम्ही पाहता की श्रीमंत व्यक्ती महागड्या गाड्यांतून फिरतात, महागड्या वस्तू वापरतात पण ते जेवढा खर्च करतात तेवढा किंबहुना त्यापेक्षा जास्त पैसा खेचून आणण्याची यंत्रणा त्यांनी तयार करून ठेवलेली आहे.  

6. पैशाला खरेपणा आवडतो. 
युनिक आणि क्रिएटीव्ह आयडियाजना नेहमी मागणी असतेच. जेव्हा तुम्ही कोणाकडून प्रेरणा घेता तेव्हा त्यांना कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्याकडून टिप्स घेऊन तुमचा स्वतःचा प्लान डेव्हलप करा. कारण त्यांची आणि तुमची परिस्थिती सारखीच असेल असं नाही. तुमच्याकडे जसं आहे जेवढं आहे त्यापासून सुरुवात करा. 

7. पैसा तुम्हाला आनंदी बनवणार नाही. 
तुम्हाला वाटत असेल पैसा आला म्हणजे तुम्ही आनंदी व्हाल तर तसं नाहीए. पैसा जेवढा असेल तेवढा तो कमीच वाटतो. हे खरंय की पैसा आनंद देत नाही, पण पैशाने विकत घेतलेल्या वस्तू कदाचित तुम्हाला आनंद देऊ शकतात. आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसा हवा असतो म्हणून पैसा हा नेहमीच सर्वांच्या केंद्रस्थानी असतो. काही जण म्हणतात आनंद हा आपल्या मानण्यावर असतो, पैसा त्यामध्ये काही करू शकत नाही. काही म्हणतात जेवढा पैसा जास्त तेवढे प्रॉब्लेम जास्त, मी म्हणेन पैसा तुम्हाला आनंदी व्हायला मदत करतो पण, केवळ पैसा असणं म्हणजे आनंद नाही. 
8. पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या. 
गरीब लोक पैशासाठी काम करतात, तर श्रीमंत लोक पैशाला त्यांच्यासाठी कामाला लावतात. श्रीमंत लोक त्यांच्या बिझनेसमध्ये कामाला कर्मचारी ठेवतात आणि स्वतःचा वेळ ते स्ट्रॅटजी डेव्हलप करण्यासाठी वापरतात. तर, गरीब लोक श्रीमंत लोकांसाठी काम करतात. श्रीमंतांकडे पॅसिव्ह इनकमचे अनेक स्त्रोत असतात, त्यामुळे काम नाही केलं तरीही त्यांच्याकडे पैशांचा ओघ सुरूच राहतो. तर, गरीब लोकांना रोजच्या जेवणासाठी सुद्धा काम करावं लागतं.