भारतासोबत इलेक्ट्रिक वाहनांचा करार मोडून एलॉन मस्क जाणार इंडोनेशियात

भारतासोबत इलेक्ट्रिक वाहनांचा करार मोडून एलॉन मस्क जाणार इंडोनेशियात

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा खूप मोठा व्यवसाय भारतात आणण्याच्या तयारीत होते. मात्र, एलॉन मस्क यांची मागणी भारत सरकराने फेटाळून लावल्याने हा  करार  रद्द करण्यात आला आहे. आयात करात सूट न दिल्याने टेस्ला इंकने आता भारतात शोरूमच्या जागेचा शोधही थांबवला आहे. भारतात येण्याआधीच हा प्रकल्प रद्द झाल्याने भारतातील तरुण बेरोजगारांच्या हातातून खूप चांगली संधी गेल्याची भावना आहे. हा प्रकल्प आता इंडोनेशियात होण्याची शक्यता आहे. 

उद्योजकांनो, टाइम मॅनेजमेंटच्या नोट्स विनामूल्य मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा ....

इंडोनेशियामध्ये अनेक नैसर्गिक संसधाने उपलब्ध आहेत. कॉपर आणि निकेल आदी धातू या देशात मुबलक प्रमाणात सापडतात. त्यामुळे अनेक व्यवसायिक या देशात व्यवसाय वृद्धीसाठी येण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच एलॉन मस्क यांनीही आता  इंडोनेशिया येथे  जाण्याचा विचार  केला आहे. टेस्ला इंक आणि स्पेसेक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांची नुकतीच भेट घेतली. टेक्सास येथील विको चिकातील रॉकेट मॅन्युफॅक्चरर साईटवर ही भेट झाली. या भेटीत एलॉन मस्क इंडोनेशियात भेट देणार असल्याचे ठरले आहे.

बिझनेस  कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

विडोडो यांच्या कार्यालयातून जाहीर झालेल्या पत्रकानुसार नोव्हेंबरमध्ये एलॉन मस्क इंडोनेशिया येथे भेट देणार आहेत. एलॉन मस्कचा इंडोनेशियातील करार यशस्वी झाला तर भारतासाठी हा धक्कादायक निर्णय ठरेल. 

स्नेहलनीतीच्या एक दिवसीय बिझनेस ट्रेनिंग शिबिरासाठी नाव नोंदणी करा

भारतात इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात खर्च रद्द करावा अशी मागणी टेस्लाकडून करण्यात आली होती. मात्र, आयात खर्च द्यायचा नसल्यास वाहनांचे उत्पादन भारतात करावे लागेल अशी अट भारताने घातली. टेस्लाचे चीन येथे कारखाना असल्याने भारतात नवा कारखाना सुरू करण्यास कपंनीने नकार दिला. भारतात या  वाहनांची अपेक्षित  विक्री झाली तर येथे  कारखाना सुरू करु असा शब्द दिल्यानंतरही भारत सरकराने त्यांची मागणी  फेटाळून लावली.  

दरम्यान, भारतातील प्रकल्प रद्द झाल्याने भारतातील कर्मचार्यांना दुबई येथे पाठवण्यात आले आहे.

आमच्या फेसबुक पेजला लाईक करा