बिझनेसमन म्हणून अपयशी होतो

बिझनेसमन म्हणून अपयशी होतो


जगप्रसिद्ध असणारी सोशल मिडीया साईट फेसबुक चा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याला आपण सर्वच ओळखतो. हार्वर्ड विद्यापीठातून ड्रॉपआऊट असलेल्या मार्ककडे कोणत्याही बिझनेस स्कूलची पदवी नाही. तरीही आज संपूर्ण जग त्याला आणि त्याने निर्माण केलेल्या फेसबुकला ओळखते.. अगदी साधी राहणीमान असलेल्या मार्कचे बिझनेसचे नॉलेज हे अधिक आहे.. अनेक मोठमोठी मंडळी या अब्जाधीशाला सध्या राहणीमानात बघून चकित होतात. अनुभवावरून मार्कने एक बिझनेसमन का अपयशी होतो याची करणे सांगितली आहेत... 


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


१. इतरांच्या मतांची काळजी करणे -
लोक काय म्हणतील हा विचार सगळ्यात हानिकारक असतो. अनेकांची स्वप्नं तर या एका प्रश्नामुळेच तुटतात. इतरांच्या मतांमुळे आपली विचार करण्याची क्षमता खुंटते.. कोणतेही काम करत असताना जे लोक नेहमी दुसऱ्यांच्या मतांची काळजी करतात ते लोक आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. अनेक लोक लोकांच्या मतांची चिंता करतात आणि त्यामुळे ते बिझनेस सुरु करू शकत नाहीत..


२. अनेक गुरु असणे -
प्रत्येक व्यक्तीला पुढे जाण्यासाठी उपदेशाची, प्रेरणेची गरज असते. आणि हीच प्रेरणा किंवा उपदेश गुरु कडून मिळत असते. गुरु म्हणजेच एक्स्पर्ट, ज्यांना फिल्ड मधील अधिक माहिती असते व ते तुम्हाला बिझनेस यशस्वी होण्यासाठी वेळोवेळी उपदेश करत असतात. अशावेळी एका गुरुचे ऐकून प्रेरणा घेणे योग्य ठरते . पण एका पेक्षा जास्त गुरूंचे म्हणणे ऐकणे तुम्हाला गोंधळात टाकू शकते...


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


३. स्वतःवर विश्वास न ठेवणे -
बिझनेस सुरु करायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. जर तुमचाच स्वतःवर विश्वास नसेल तर लोकं तुमच्यावर का विश्वास ठेवतील स्वतःवरचा अविश्वास तुम्हाला अपयशी बनवू शकतो..


४. योग्य निर्णय न घेणे -
योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यास बिझनेसला खूप मोठा तोटा सहन करावा लागतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता एका बिझनेसमनला यशस्वी बनवते. सोबतच त्याचा बिझनेसही यशाच्या शिखरावर घेऊन जाते..


५. मूर्खांच्या संगतीत राहणे -
अनेकदा बिझनेस बुडण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या आजूबाजूला असणारी माणसे असतात. अशी माणसे ज्यामुळे बिझनेसला कोणत्याही प्रकारचा फायदा तर दूरच पण बऱ्यापैकी तोटा होतो. कृतिशील नसलेली, बिनकामाची माणसं नेहमीच तुम्हाला पुढे जाण्यासाठी रोखतात. त्यामुळे अशा लोकांच्या संगतीत न राहणंच योग्य आहे..


६. ध्येय व 'टु-डू लिस्ट' यांच्याकडे दुर्लक्ष करणे -
कोणताही बिझनेस यशस्वी करण्यासाठी तुमचे ध्येय निश्चित पाहिजे. त्याचप्रमाणे प्रत्येक कामाची टु-डू लिस्ट तयार करून त्यानुसार काम करणे प्रत्येक बिझनेसमनसाठी आवश्यक असते. ध्येयामुळे पुढे जाण्याची प्रेरणा मिळते तर टु-डू लिस्ट मुळे कोणती कामे झाली नाहीत व करायची आहे हे समजते..


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


७. इतरांना कॉपी करणे -
जीवनात यशस्वी होण्यासाठी मोठ्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा सल्ला अनेकजण देतात, परंतु याचा अर्थ त्यांना कॉपी करणे नव्हे. मोठमोठ्या बिझनेसमन कडून प्रेरणा घेऊन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी..


८. स्वतःला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी जवळ ठेवणे -
काम करताना आलेले डिस्ट्रॅक्शन म्हणजेच व्यत्ययामुळे कामात अडथळा निर्माण होतो व लक्ष लागत नाही. अशा गोष्टी किंवा व्यक्ती जवळ असल्यास काम पूर्ण होऊ शकत नाही व त्यामुळे बिझनेस पुढे जाऊ शकत नाही..


९. अहंकारीपणा -
अहंकार माणसाला कधीच फायदेशीर ठरत नाही. अतिअहंकार माणसाला आंधळं बनवतं. अहंकाराचे विसर्जन करणे म्हणजे प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणे. बिझनेस करणाऱ्या व्यक्तीने कधीच अहंकार करू नये. हेच यशस्वी बिझनेसचे रहस्य आहे..