
तुम्हाला तुमचा बिझनेस तर वाढवायचा आहे पण, तुमच्याकडे तसे रिसोर्सेस नसतील, तर एखाद्या ॲड एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट देणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं. तुमचा बिझनेस डिजिटली जेवढा लोकांपर्यंत पोहोचेल तेवढ्या प्रमाणात ब्रँड अवेअरनेस होण्यास मदत होते. ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचं कामकाज कसं चालतं हे या ब्लॉगच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.
ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज या विविध व्यवसायांसाठी क्रिएटीव्ह सर्व्हिस देण्याचं काम करतात. ग्राहकांसाठी योजना आखणं, त्या प्रत्यक्षात उतरवणं आणि बऱ्याच क्रिएटीव्ह गोष्टींवर काम करणं हे ॲड एजन्सीचं काम आहे.
उद्योजक ग्राहकाला क्रिएटीव्ह सेवा देण्यासाठी ॲड एजन्सीमध्ये कंटेंट क्रिएटर्स, ग्राफिक डिझायनर्स, व्हिडिओ एडिटर्स, रिसर्चर्स आणि ॲडव्हर्टायझिंग एक्सपर्ट्स असतात. क्लाएंटच्या ब्रँडविषयी मार्केटमध्ये जागरुकतात निर्माण करणे, वस्तू किंवा सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांचा ग्राहकवर्ग वाढण्यास मदत करणे, त्यांना जास्त नफा आणि मार्केट शेअर मिळवून देणे हे कोणत्याही ॲड एजन्सीचं उद्दीष्ट्य असतं.
बिजनेसमधून भरपूर संपत्ती कशी कमवाल ? या स्नेहलनीतीच्या आगामी विनामूल्य वेबिनारसाठी नावनोंदणी करा... व्हाट्सअप करा +91 93217 46252 किंवा इथे क्लिक करा
घरगुती व्यवसाय, मोठ्या कंपन्या, मल्टी-नॅशनल कंपन्या अशा सर्वच उद्योगांना ॲड एजन्सीज सेवा देतात. कंपनी छोटी असली की तिची स्वतःची मार्केटींग टीम असण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अशा कंपन्यांना नफ्यासाठी बाहेरून मार्केटींग एक्सपर्ट्सची मदत घ्यावी लागते, अशा वेळी ॲड एजन्सी कामी येते.
एखाद्या व्यवसायाचं ब्रँडींग, जनसंपर्क, इव्हेंट मॅनेजमेंट, व्हिडिओ स्ट्रॅटजीज, मार्केट रिसर्च, मार्केटींग, सेल्स प्रमोशन करण्याचं काम ॲड एजन्सी करते.
सुरुवातीला ग्राहकांकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जातात. त्यानंतर क्लाएंटच्या ग्राहकांना त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत यावर एजन्सीकडून रिसर्च केला जातो. मार्केटमध्ये त्यांच्या ब्रँडची काय व्हॅल्यू आहे, त्यांना ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो याचा अभ्यास केला जातो.
यानंतर एजन्सी एडव्हर्टायझींग स्ट्रॅटजीसाठी योजना आखते, त्याचं बजेट बनवते आणि कोण कोणती जबाबदारी पार पाडणार हे ठरवलं जातं.