लोक ‘व्हॉट्स ऍप’ला शोधत आहेत पर्याय..

लोक ‘व्हॉट्स ऍप’ला शोधत आहेत पर्याय..

आपलं सगळ्यांचं विश्व सध्या व्हॉट्स ऍप ने व्यापलेलं आहे. बर्थ डे  सेलिब्रेशन असो, मित्रांच्या संपर्कात राहणं असो, फेसबुक नंतर आपल्या जवळचा कोणी असेल तर तो व्हॉट्स  ऍपच पण सध्या व्हॉट्स ऍप चर्चेत आहे ते एका वेगळ्याच कारणासाठी. ते म्हणजे  व्हॉट्स ऍपने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीसाठी. विशेष म्हणजे येत्या 8 फेब्रुवारीपर्यंत ही पॉलिसी आपण स्वीकारली नाही,  तर व्हॉट्स ऍप डिलिट करण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय उरणार नाही. याआधी जुलै 2020 मध्ये व्हॉट्स ऍपची प्रायव्हसी  पॉलिसी अपडेट झाली होती. त्यावेळी मात्र वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीवर भर देण्यात आला होता. तसेच ते आमच्या डीएनए मध्येच आहे असंही व्हॉट्स ऍपने म्हटलं होतं. मात्र, आता 4 जानेवारी 2021 ला आलेल्या  अपडेटमध्ये या गोष्टींचा समावेश नाही. एका जागतिक सर्वेक्षणातून  असं समोर आलं आहे की, व्हॉट्स ऍपने आपल्या धोरणात बदल केल्यानंतर लाखो लोकांनी टेलिग्राम डाऊनलोड केलं आहे, तर काही प्रमाणात सिग्नल ऍपही डाऊनलोड करण्यात आलं आहे.

तुमचा बिजनेस 10 पटीने वाढण्यासाठी स्नेहलनीतीचा 10X MBA ONLINE अँप 30 दिवसांसाठी विनामूल्य डाऊनलोड करा...

सिग्नल हे ना नफा ना तोटा तत्वावर चालणारं ऍप आहे. त्यामुळे तुमचा डेटा त्यांनी तिसऱ्या कंपनीला विकण्याची शक्यता नाही. ज्याचे संस्थापक आहेत मॉक्सी मार्लिनस्पाईक. व्हॉट्स ऍप प्रमाणेच सिग्न ऍपवर सुद्धा एंड टू एंड एनक्रिप्शन आहे. यामध्ये 150 जणांचा ग्रुप बनवता येतो. 

सिग्नल ऍप ऑडियो व्हिडिओची सुविधा देखील देतं. तर, टेलिग्राम या ऍपचे संस्थापक आहेत पेव्हेल ड्युरोव्ह. यामध्ये एंड टू एंड एनक्रिप्शनची सुविधा नसते. पण, सिक्रेट चॅट असा एक पर्याय आहे ज्यामध्ये आपण केलेले चॅट सुरक्षित असतात. या माध्यमातून मोठे व्हिडिओज क्वालिटी न बदलता पाठवता येतात. तर, ग्रुपमधील सदस्यांची संख्या 2 लाख पर्यंत ठेवता येते. तसेच याद्वारे ऑडियो व्हिडिओ कॉल सुद्धा करता येतात.            

2016 पासूनच व्हॉट्स ऍपने आपल्या वापरकर्त्यांचा डेटा फेसबुकसोबत शेअर करण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता आपल्या नव्या धोरणात व्हॉट्स ऍपने हा डेटा इतर कंपन्यांसोबत सुद्धा शेअर करणार असल्याचं म्हटलं आहे. व्हॉट्स ऍप आता आपला इंटरनेटवरचा डेटा जसं की तुम्ही काय सर्च करता, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुमचा सर्विस प्रोव्हायडर कोणता आहे, तुम्ही कोणती भाषा वापरता, तुमच्या डिव्हाईसशी संबंधित माहिती व्हॉट्स ऍप गोळा करू शकतं. जुन्या धोरणात याचा उल्लेख नव्हता. तुम्ही व्हॉट्स ऍपचं पेमेंट फिचर वापरत असाल तर तुमचे बँक डिटेल्स, ट्रांसॅक्शनची माहिती व्हॉट्स ऍप वापरू शकतं.   

बिजनेसमधून भरपूर संपत्ती कशी कमवाल ? या स्नेहलनीतीच्या आगामी विनामूल्य वेबिनारसाठी नावनोंदणी करा...  व्हाट्सअप करा +91 93217 46252 किंवा इथे क्लिक करा 

व्हॉट्स ऍपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार व्हॉट्सअ‍ॅप तुमचे वैयक्तिक संभाषण किंवा ग्रुप चॅट वाचू शकत नाही. परंतु, तुमचं स्टेटस, लोकेशन व मोबाईलचा डेटा फेसबुक तसेच इतर ऍप्सना देऊ शकतो. बँक डिटेल, क्रेडिट-डेबिट कार्ड डिटेल, लोकेशन, आयपी अॅड्रेसचीही इतरांना देवाण-घेवाण करण्यात येईल. तुम्ही व्हॉट्स ऍपवर संभाषण करताना मित्रासोबत एखादी लिंक शेअर केली तर त्याची माहिती व्हॉट्स ऍपकडे जाईल. नवीन प्रायव्हसी पॉलिसीनुसार वापरकर्त्यांना त्याच्या चॅट्सची माहिती फेसबुकीसह इतर कंपन्यांना शेअर करण्यासाठी मान्यता द्यावी लागणार आहे. याचा सर्वच पातळ्यांवर निषेध व्यक्त होत आहे. व्हॉट्स ऍपचे चाहते या धोरणामुळे नाराज आहेत. आता व्हॉट्स ऍपला पर्याय शोधण्यासाठी व्हॉट्स ऍप युजर्सची धडपड सुरू झाली आहे. टेलिग्राम हे ऍप भारतात मुळातच प्रसिद्ध आहे, आता व्हॉट्स ऍपच्या नव्या पॉलिसीमुळे टेलिग्राम डाऊनलोड करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आणखी एक ऍप सध्या भारतीयांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे, ते म्हणजे सिग्नल ऍप. सिग्नल ऍप आता भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत करू इच्छित आहे. सिग्नल ऍपचे सह संस्थापक तसेच कार्यकारी अध्यक्ष ब्रायन ऍक्टन यांनी तसे संकेत दर्शवले आहेत. 

2009 मध्ये आलेल्या व्हॉट्स ऍपचे सुद्धा ते सह संस्थापक होते. त्यानंतर 2014 मध्ये फेसबुकने 19 अब्ज डॉलर्सला व्हॉट्स ऍप विकत घेतलं होतं. विशेष म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या ईलॉन मस्क यांनी ‘युज सिग्नल’ असं ट्विट करत सिग्नल ऍपला आपला पाठिंबा दर्शवला होता.

बिझनेस  कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

सध्या व्हॉट्स ऍपच्या नवीन धोरणामुळे वापरकर्त्यांचा गोंधळ उडाला असला तरी सध्या सुरक्षित वाटणारे सिग्नल, टेलिग्राम सारखे पर्याय भविष्यातही आपली गोपनीयता अबाधित ठेवतील याची खात्री कोण देणार!