काय आहे  OTT प्लॅटफॉर्म?

काय आहे OTT प्लॅटफॉर्म?

 
आपल्याकडे काही वर्षांपूर्वी ‘OTT प्लॅटफाॅर्म काय आहे?’ असे विचारले असते तर अनेकांचे 'माहित नाही' असेच उत्तर येत असे. परंतु करोना व्हायरसमुळे लावला गेलेल्या लॉकडाऊनमुळे आता हेच OTT प्लॅटफाॅर्म घराघरात पोहचले आहेत. जगात सगळीकडे लाॅकडाऊनमुळे नुकसान होत असताना याचा जबरदस्त फायदा OTT प्लॅटफाॅर्म कंपन्यांना झाला आहे.


काय आहे  OTT प्लॅटफॉर्म?
OTT प्लॅटफॉर्म म्हणजे 'ओव्हर द टॉप' प्लॅटफॉर्म ज्यात तुम्हाला इंटरनेटद्वारे ऑडिओ आणि व्हिडीओ कंटेन्ट बघता येतात. पण त्यात आपल्या ब्रॉडकास्टिंग, केबल सर्व्हिसेसचा समावेश होत नाही. या OTT प्लॅटफॉर्म्समुळे आपल्याला जुन्यापासून ते नवीन प्रदर्शित झालेले अनेक चित्रपट बघता येतात. त्याचबरोबर आपल्याला या प्लॅटफॉर्म्सवर विविध भाषांचे चित्रपट, विविध शैलीतले चित्रपट बघतात येतात. विशेष म्हणजे या प्रकारामध्ये आपल्याला विविध वेबसिरीजस सुद्धा बघतात येतात.
या प्लॅटफॉर्म्सची खासियत म्हणजे आपल्याला जगभरातील चित्रपट, वेबसिरीज, डॉक्युमेंट्रीज, लघु चित्रपट अश्या अनेक गोष्टी पाहण्याचा आनंद तो ही कोणत्या जाहिरातीचा अडथळा न येता मिळतो. कुठला ही एपिसोड आणि कुठलाही सिनेमा एखाद्या दिवशी लागणार आणि आपण त्या दिवसाची वाट बघत बसणार हे सर्व काही आता मागे राहिले आहे. आता आपल्या नवनवीन गोष्टी आपण पाहिजे तेव्हा बघू शकतो.


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


OTT प्लॅटफॉर्म म्हणजे अशी व्यवस्था जी दृकश्राव्य माध्यमामधील कंटेट थेट लोकांपर्यंत इंटरनेटच्या सहाय्याने पोहचवते, तेही हवं तेव्हा, हवं त्या ठिकाणी. आज भारतात नेटफ्लिक्स, हाॅटस्टार, सोनीलिव्ह, एमएक्स प्लेअर, प्राईम व्हिडीओ, एराॅस नाऊ, अल्ट बालाजी, वुट किंवा झी ५ असे ३० ओटीटी तर १० म्युझिक प्लॅटफाॅर्म आहेत. ओटीटी प्लॅटफाॅर्म्स लोकांपर्यंत अनेकानेक वेबसिरीज, चित्रपट आणत आहेत. त्यात नाविन्याबरोबरचं अतिशय कमी कालावधीत लोकांपर्यंत पोहचण्याची ताकदही आहे.
 
भारतातील OTT प्लॅटफॉर्म्सचा इतिहास
२००८ साली भारतात रिलायन्स एंटरटेनमेंटद्वारे बिगफ्लिक्स हे OTT प्लॅटफॉर्म लॉन्च झाले.  २०१० मध्ये, डिजीव्हिव्हने नेक्सजीटीव्ही नावाचे भारताचे पहिले ओटीटी मोबाइल अ‍ॅप सुरू केले जे थेट टीव्ही आणि नवनवीन कंटेन्टप्रदर्शित करत होते. नेक्सजीटीव्ही हे जगातील पहिले अ‍ॅप आहे ज्यात  मोबाइल फोनवर इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण केले गेले.
२०१३ च्या सुमारास जेव्हा डिट्टो (झी) आणि सोनी लिव्ह हे दोन भारतीय मार्केटमध्ये लॉन्च झाले तेव्हा OTT प्लॅटफॉर्ममध्ये भारताला महत्त्वपूर्ण गती मिळाली. डिट्टो हे एक अग्रेसर प्लॅटफॉर्म ठरले ज्यामध्ये स्टार, सोनी, व्हायकॉम, झी इत्यादी सर्व माध्यमातील वाहिन्यांवरील कार्यक्रम होते.
 
२०१९ मध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेले OTT प्लॅटफॉर्म
हॉटस्टार:
२०१८ मध्ये स्टार इंडियाचे स्वतःच्या मालकीचे  हॉटस्टार म्हणजे आताचे 'डिजनी हॉटस्टार' ज्यात त्यांचे १५ कोटींहून जास्त युजर्स आहेत आणि ३५ कोटींहून जास्त लोकांनी हा अ‍ॅप डाउनलोड केला आहे. २०१९ मध्ये हॉटस्टारने 'हॉटस्टार स्पेशल'च्या नावाने स्वतःचे ओरिजिनल कंटेन्ट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली. त्या व्यतिरिक्त हॉटस्टारवर टीव्ही प्रोग्रॅम, चित्रपट आणि विविध खेळांचे प्रक्षेपण देखील होते.

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


नेटफ्लिक्स:
नेटफ्लिक्स ही एक अमेरिकन कंपनी आहे जिने २०१६ साली तिचे अ‍ॅप भारतात लॉन्च केले ज्याचे क्रेझ हे संपूर्ण युवा पिढीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विविध भनाट चित्रपट, वेब सिरीज डॉक्युमेंट्रीज असलेला हा अ‍ॅप भारतात खूप चालतोय. जगभरात या अ‍ॅपचे १६ कोटींहून अधिक युजर्स आहेत.

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ:
अ‍ॅमेझॉन ही प्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट जिथे तुम्हाला  A टू Z  गोष्टी मिळतात. या कंपनीने सुद्धा लोकांना मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह असा कन्टेन्ट दिला आहे. जसे की अ‍ॅमेझॉन पे, अ‍ॅमेझॉन म्युझिक आणि इतर OTT प्लॅटफॉर्मसारखा त्यांनी सुद्धा त्यांचा अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ सुरु केला जो भारतात २०१६ मध्ये लॉन्च करण्यात आला. त्यात ही तुम्हाला अ‍ॅमेझॉन प्राईमचे ओरिजिनल कंटेन्ट आणि विविध चित्रपट बघायला मिळतात. 


आता तर लॉकडाऊनमुळे थिएटर बंद आहेत, त्यामुळे अनेक प्रॉडक्शन हाऊसेस या OTT प्लॅटफॉर्म्सवर कमी बजेट असणारे चित्रपट सुद्धा प्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे हे प्लॅटफॉर्म्स अधिक पॉप्युलर होत आहेत.