जाहिरात क्षेत्राचे स्मार्टफोनवरचे वर्चस्व!

जाहिरात क्षेत्राचे स्मार्टफोनवरचे वर्चस्व!

जाहिरात म्हणजे एखाद्या वस्तू आणि सेवा यांचे प्रोमोशन करणे जेणे करून साधारण नागरिकाला वस्तू आणि सेवांबद्दल माहिती घेऊ शकेल. त्याचबरोबर ज्यांना त्या वस्तू आणि सेवांची माहिती नसेल तर जाहिरात क्षेत्र त्याची माहिती पोहोचवण्याचे काम करते..

आज मार्केटमध्ये जाहिरात क्षेत्रामुळे अनेक ब्रँड आणि त्यांच्या वस्तू व सेवा एवढ्या प्रसिद्ध झाल्या की आता लोकं त्याच ब्रँडच्या वस्तूची खरेदी करतात.  वस्तू आणि सेवांच्या खरेदी- विक्री आणि एखाद्या ब्रँडला प्रसिद्धी मिळवून देण्यात जाहिरात क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे..


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


आधीच्या काळात जाहिरात क्षेत्राचे वर्चस्व हे मोठ मोठाले होर्डिंग, टीव्ही वरील जाहिरात, ब्रोशर, पँप्लेट तसेच वर्तमानपत्रातील जाहिरात यावर होते. कित्येक दशकापासून अजून ही त्याचे या माध्यमातूनच प्रोमोशन होते. पण या सर्व ठिकाणी जाहिरात करणे एकतर खर्चिक असते त्याचबरोबर त्यांना पाहिजे असलेल्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येत नव्हते. त्यामुळे काहीतरी वेगळी शक्कल लढवणे महत्त्वाचे होते..

जाहिरात विश्वासाठी २०१५ हे वर्ष अतिशय महत्त्वाचे होते. कारण मोबाईल विश्वाने सुद्धा जाहिरात क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यामुळे आता मोबाइलसाठी केल्या जाणाऱ्या जाहिरातींची संख्या वाढत आहे. पूर्वी कुठलीही जाहिरात पाहण्यासाठी टीव्ही हे महत्त्वाचे माध्यम होते. मात्र गेल्या दशकभरापासून जाहिरातींचा आणि पर्यायाने काँटेंटकंझम्पशन  कंझम्शनचा प्रवास टीव्ही ते डेस्कटॉप आणि डेस्कटॉप ते स्मार्टफोन असा झाला आहे. ग्राहकांना मोठय़ा प्रमाणावर आकर्षति करण्यासाठी स्मार्टफोन हे महत्त्वाचे माध्यम आहे हे लक्षात घेत जाहिरात क्षेत्राने  त्यावर लक्ष केंद्रित करत खास जाहिराती आणि डिजिटल काँटेंट तयार करण्यास सुरुवात केली आहे..


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


अधिकृत आकडेवारीनुसार आज भारतीय लोक त्यांचे कित्येक तास त्यांच्या स्मार्टफोनवर डिजिटल काँटेंट पाहात असतात. त्यात सामान्यपणे सकाळी उठल्यापासून फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, मेल्स तपासणं किंवा ई-शॉिपग साइट्स पाहतो. बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतं की, इंटरनेट ब्राउजिंग बंद केल्यावरही कुठली ना कुठली जाहिरात आपल्या स्क्रीनवर झळकत राहते. हे असं का होतं? 

तर आपण जे शोधकाम करतो त्याचा माग काढत, आपल्या आवडीनिवडीनुसार विशिष्ट उत्पादनांच्या जाहिराती आपल्या मोबाइल स्क्रीनवर येतात. या जाहिराती व्हिडीओ, बॅनर किंवा अ‍ॅप नोटिफिकेशन या प्रकारांत मोडतात. २०१५ मध्ये गुगलने मार्शमॅलो या नावाची ऑपरेटिंग सिस्टीम सुरू केली. यामुळे लॉकस्क्रीनवरही कस्टमाइज्ड जाहिरातींचा पर्याय उपलब्ध झाला. ज्यांच्याकडे ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. समजा, तुम्ही एखाद्या ऑनलाइन शॉिपग वेबसाइटवर एखादे उत्पादन फक्त पाहिले, मात्र खरेदी नाही केले तरी तुमच्या सर्चमुळे तुमच्या इनबॉक्समध्ये त्या उत्पादनाची जाहिरात दिसू लागते.

सतत लोकांच्या नजरेसमोर राहणं किंवा त्यांच्या कानावर आपल्याविषयी माहिती जात राहणं यामुळे लोकांना आपली ओळख होऊ लागते आणि ते आपल्याला ओळखू लागतात. जेव्हा ग्राहकांच्या मनावर आपलं नाव कोरलं जातं तेव्हा आपोआप त्यांच्या माध्यमातून आपली प्रसिद्धी होऊ लागते आणि ही साखळी वाढत जावून आपलं नाव होऊ लागते. ही आहे जाहिरातीची ताकद.

मोबाईलवर जाहिराती सतत लोकांच्या डोक्यावर हॅमर करत असतात. त्यामुळे आपल्या मोबाईलवर दिसणाऱ्या जाहिराती आपल्याला सतत आठवत राहतात. कधी नव्हे ते सर्च केलेल्या गोष्टी सतत डोळ्यासमोर आल्याने कधी कधी व्यक्ती ती वस्तू घेऊन सुद्धा टाकतो. तेव्हा त्याला एक वेगळे समाधान मिळते. अनेकदा शॉपिंग करताना या मोबाईल जाहिराती खूप प्रभावी ठरतात. म्हणूनच त्यांची मजल पुढपर्यंत पोहोचली आहे.