तुम्ही तुमच्या मोबाईलचा योग्य वापर करताय का?

तुम्ही तुमच्या मोबाईलचा योग्य वापर करताय का?


आजची पिढी मोबाईलच्या विळख्यात अडकली आहे असे आपल्याला म्हणता येईल. कितीही झाले तरी नव्या तंत्रज्ञानाचे युग आहे.. मुलांसोबतच अगदी पालकही मोबाईलच्या आहारी गेलेले दिसतात. तरुणाई दिवस-रात्र गेमिंग, सोशल नेटवर्किंग साईट्स, वेब सिरीज सारख्या गोष्टींच्या पाठी असतात.. हा नक्कीच मोबाईल फोनचा गैरवापर ठरू शकतो..

मोबाईल फोन फक्त मनोरंजन म्हणून वापरणे ही सर्वात मोठी चूक आहे. बिझनेसमन म्हणजेच व्यावसायिकांसाठी मोबाईल म्हणजे त्यांच्या कामाचे साधन आहे. हे ज्यांना कळले तेच मोबाईलचा योग्य वापर करत आहेत असे म्हंटले तरीही चालेल..


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


अनेक जण आपला बिझनेस वाढवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करताना दिसतात. पण आपल्या हातात असणाऱ्या मोबाईलकडे एक मार्ग म्हणून कोणीही बघण्यास तयार नाही. मोबाईल म्हणजे फक्त मनोरंजनाचे साधन असेच अनेकांना वाटते. पण या मोबाईलचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस सुद्धा वाढवू शकता.. यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील आणि सोबतच काही गोष्टी करणे टाळावे लागेल... चला तर त्या गोष्टी कोणत्या ते आपण पाहूया..


या गोष्टी करा..
१) गुंतवणुकीबद्दल शिकून घ्या. मोबाईल हे साधन गुंतवणूक शिकून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आज इंटरनेटवर गुंतवणूक कशी करावी इथून गुंतवणूक कष्ट करावी इथपर्यंत सगळी माहिती उपलब्ध असते. तेव्हा याचा वापर करून गुंतवणुकीबद्दल शिकून घ्यावे. भविष्यात याचा नक्कीच फायदा होईल..


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


२) तुम्ही मोबाईल मार्फत तुमचा बिझनेस सुरु करू शकता. तुमच्या उत्पादनांबद्दल लोकांना माहिती देऊन तुमची उत्पादने त्यांना विकू शकता. मोबाईल हे साधन मार्केटिंग वर काम करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर ठरेल..


३) मोबाईल मार्फत सोशल मीडियाचा वापर करून तेथे आपल्या उत्पादनासाठी ऑनलाईन शॉप किंवा पेज तयार करणे हा आताच्या विक्रेत्यांचा नवा फंडा आहे. असे केल्यास ऑनलाईन मार्केटिंग सुद्धा होते आणि ऑनलाईन असणारे ग्राहक सुद्धा आपल्याला मिळतात..

४) मोबाईल फोनचा वापर करून आपल्याला आपल्या ग्राहकांना जोडता येते. योग्य सेवा आणि वस्तू पुरवण्यासोबतच त्यांच्याशी योग्य संवाद आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्यास ग्राहक अधिक संतुष्ट होतात. त्यामुळे असे कौशल्य सुद्धा आपल्याला मोबाईल फोन मधून शिकता येईल.


या गोष्टी करू नका..
१) मोबाईल फोन हातात घेऊन तो फक्त मनोरंजनासाठी किंवा टाईमपास साठी वापरणे बंद करा..


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


२) तरुणांना वेबसिरीज, मूव्हीज तर अगदी लहानांना सुद्धा गेमिंग ने वेड लावले आहे. हे सर्व कमीतकमी वेळेसाठी वापरा. मोबाईलचा वापर नवनवे रिसर्च, अभ्यास यासाठी करा..


३) फक्त अमुक-तमुक लोकांना फॉलो करत राहणे, फोटो अपलोड करणे, दहा वेळा नोटिफिकेशन चेक करणे यापेक्षा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या लोकांनी मार्केट रिसर्च, नवनवीन स्पर्धक उत्पादनांची माहिती, सर्व्हिसची माहिती मिळवण्यासाठी मोबाईलचा वापर करणे सुरु करा..


४) वारंवार सोशल मीडियाचा वापर टाईमपास साठी न करता काही बिझनेस रिलेटेड न्यूझ वाचण्यासाठी करावा. इंटरनेटवर भरपूर काही शिकण्यासारखे आहे. आणि मोबाईल हे साधन इंटरनेटच्या वापरासाठी अनुकूल आहे. त्यामुळे त्याचा योग्य वापर करा.