फेडेक्सची यशोगाथा

फेडेक्सची यशोगाथा


कुणालाही एखादी  वस्तू किंवा पार्सल पाठवायचे असल्यास फेडेक्स करून द्या. अशाप्रकारचा वाक्यप्रचार सहज वापरला जातो. फेडेक्स ही जगातील अग्रगण्य कुरियर डिलेव्हरी सर्विस देणारी कंपनी आहे. १९७३ मध्ये या कंपनीची स्थापना फेडरल एक्स्प्रेस या नावाने करण्यात आली. 


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


या कंपनीची आर्थिक उलाढाल २.३ बिलियन डॉलर आहे. दररोज १०.२ मिलियन पॅकेजेसची डिलिव्हरी ही कंपनी करते. २०१८च्या आकडेवारीनुसार या कंपनीत काम करणाऱ्यांची संख्या २,२७,००० एवढी होती. 


या कंपंनीचे संस्थापक फ्रेड्रिक्स स्मिथ यांची यशोगाथा सर्व उद्योजकांना प्रेरणादायी ठरू शकते. वयाच्या सहाव्या वर्षी फ्रेड्रिक्सच्या डोक्यावरून  वडिलांचे छत्र हरपले. फ्रेड्रिक्सची जबाबदारी त्यांच्या आईवर आली. लहानपणीच हाडाच्या एक दुर्धर आजाराने  ग्रस्त असलेले फ्रेड्रिक्स डब्ल्यू स्मिथने वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत या रोगावर मात  केली. पुढे तो एक चांगला फुटबॉलपटू झाला. तर वयाच्या १५ व्या वर्षी ते विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले. खेळांमध्ये आणि फुटबॉल खेळण्यामध्ये विशेष रस असणारे फ्रेड्रिक्स अभ्यासातदेखील हुशार होते. 


शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या प्रतिष्ठित येल विद्यापीठात प्रवेश मिळवला. त्यावेळी अर्थशास्त्र या विषयासाठी त्यांनी संगणकाच्या युगात वेगवान सुविधा देणारी डिलिव्हरी सर्व्हिस सुरु करण्याबाबत एक प्रबंध लिहिला होता. या प्रबंधासाठी  शिक्षकाने अशा प्रकारची योजना व्यवहार्य नसल्याचे सांगत फ्रेड्रिक्सला क श्रेणी दिली. याच प्रबंधावरून त्यांना फेडेक्सची कल्पना सुचली. पॅकेजेसची एक्सप्रेस डिलिव्हरी करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात घर करून बसला. तातडीने पाठवायच्या पॅकेजेसची एका रात्रीत डिलिव्हरी करण्याची त्यांची कल्पना होती.    


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


  विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर ते अमेरिकेच्या सैन्यदलात सामील झाले. १९६६ ते ६९ दरम्यात त्यांनी प्लाटून लीडर या पदावर तीन वर्षे काम केले. यावेळी त्यांना सैन्य दलाची लॉजिस्टिक यंत्रणा जवळून पाहता आली. व्हिएतनाममध्ये दोन टूर ड्युटीवर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. १९७०  मध्ये त्यांनी स्मिथने आर्क एव्हिएशन सेल्स या विमान देखभाल कंपनीत कंट्रोलिंग इंटरेस्ट विकत घेतले. १९७१ मध्ये त्यांनी जुन्या जेट विमानांची खरेदी-विक्री सुरु केली. 

   वारसा हक्कातून मिळालेले ४ मिलियन डॉलर त्यांनी या व्यवसायात लावले, आणि ९१ मिलियन डॉलरचे भांडवल व्हेंचर कॅपिटल पद्धतीतून मिळवले. १९७३ मध्ये त्यांची कंपनी फेडरल एक्सप्रेस सुरु झाली. अमेरिकेतील २५ शहरांमध्ये सर्वप्रथम ही सुविधा सुरु करण्यात आली. सुरुवातीला छोटे पॅकेजेस आणि कागदपत्रांची डिलिव्हरी करण्यावर या कंपनीने भर दिला. त्यावेळी १४ फाल्कन २० विमाने त्यांच्याकडे होती. त्यांचे लक्ष एकीकृत एअर-ग्राउंड सिस्टम विकसित करण्यावर होते, जे यापूर्वी कधीही झाले नव्हते. म्हणून हा बिझनेस चालवताना सुरुवातीला फ्रेड्रिक्स यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा त्यांचे मोठे कर्ज नामंजूर करण्यात आले. आणि विमानासाठी लागणाऱ्या इंधनासाठी पुरेसे पैसे त्यांच्याकडे नव्हते. हातात  केवळ ५ हजार डॉलरच शिल्लक होते. पैसे उभा करण्याचा कुठलाच पर्याय शिल्लक न राहिल्याने त्यांनी थेट लास वेगास गाठले. ब्लॅकजॅक खेळून त्यांनी ५ हजाराचे २७ हजार केले. हे पैसे त्यांनी २४ हजार डॉलरचे इंधन बिल भरण्यासाठी वापरले.  स्मिथ यांनी विविध कंपन्यांचे बोर्ड मेम्बर पद भूषविले. २००० साली कंपनीने आपले फेडरल एक्सप्रेस हे नाव बदलून फेडएक्स असे ठेवले. २१ विविध श्रेणीमध्ये फेडेक्सने त्यांच्या सेवा विभागल्या आहेत.


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


फेडेक्सकडे सामानाची हवाई वाहतूक करण्यासाठी ६५० हुन अधिक विमाने आहेत. ही जगातील सर्वात मोठी कार्गो डिलिव्हरी करणारी कंपनी आहे. लहानपणी हाडाच्या आजाराशी लढा देत असेलेला मुलगा वयाच्या १५ वर्षोपर्यंत विमान उडवायला शिकला. बिझनेससाठी अस्तित्वातच नसलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी त्यांनी केली.

   बिझनेसमध्ये आर्थिक अडचणी आल्यावरही आपला बिझनेस बंद करण्याचा विचार देखील त्यांच्या  मनाला शिवला नाही.म्हणून आज एखादी एअरलाईन कंपनी करत नसेल  एवढ्या विमानांचा वापर फेडेक्स पॅकेज डिलिव्हरीसाठी करीत आहे. बिझनेसमध्ये रिस्क घेण्यास घाबरू नका. ही शिकवण फ्रेड्रिक्स यांच्या जीवनातून मिळते.