जाणून घ्या बिझनेसचे सत्य..

जाणून घ्या बिझनेसचे सत्य..


बिझनेस करायचा म्हणजे काही सोपे काम नाही. बिझनेस करायचा असेल तर त्यात अथक परिश्रम आणि प्रयत्नांची गरज असते. जो येणाऱ्या समस्यांमुळे घाबरून न जाता त्यांना सामोरे जातो तोच या बिझनेसच्या समुद्रात यशस्वीरीत्या पोहू शकतो..

आज भारतात अनेकांना स्वतःचा बिझनेस सुरु करायची इच्छा असते, पण त्यासाठी योग्य अभ्यास व प्रयत्न कसे करावे हेच अनेकांना माहित नसते. बिझनेस सुरु कसा करावा याचा अभ्यास करण्यातच अनेकांचा वेळ निघून जातो. तर अनेक जण लोक काय म्हणतील किंवा बिझनेस अपयशी झाला तर असा विचार करून डोक्यातून बिझनेसचे खूळ काढून टाकतात...


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


अनेकदा काही जण उतावळेपणाने व्यवसाय सुरु तर करतात पण तो बिझनेस योग्य प्रकारे हँडल नाही करू शकत.. अशा वेळी बिझनेसला बसायचा तो फटका बसतोच. तर काही जण व्यवसायात टिकून तर असतात. पण १० वर्ष व्यवसाय करूनही नफा म्हणजे काय हेच माहित नसते, व्यवसाय करूनही अपेक्षित यश त्यांच्या हाती लागत नाही..

यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिझनेस करायचा की नाही हे सर्वात आधी ठरवावे. तुमचे ध्येय आधीच ठरलेले असेल तर तुम्ही त्या मार्गावर चालणे अधिक सोपे होते.
कोणताही बिझनेस सुरुवातीलाच लाखो - करोडो कमवत नाही हे ध्यानात ठेवा. बिझनेसच्या सुरुवातीला नफ्याचा विचारच करू नये. सर्वात आधी बिझनेस योग्य प्रकारे सुरु करण्यावर भर द्यावा लागतो. भले ही त्या बिझनेस मधून सुरुवातीला खूपच कमी मिळकत मिळत असेल. बिझनेस सेट होण्यासाठी थोडा वेळ देणे गरजेचे असते.
बिझनेस सुरु करताना कोणीही फायनान्शिअली स्थिर नसते..


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


बिझनेस सुरु करणारे सर्व एकाच ठिकाणापासून सुरुवात करतात. त्यामुळे बिझनेस सुरु करताना सर्वांना सामान आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो.
आपला बिझनेस यशस्वी करायचा असेल आणि त्यातून हवा तेवढा नफा मिळवायचा असेल तर त्यासाठी अविरतपणे काम करावे लागते. बिझनेस सुरु करणे ठीक आहे पण त्यासाठी तेवढीच मेहनत घेऊन काम करणे हाच बिझनेस यशस्वी करण्याचा मंत्र आहे. तुमचे ध्येय काय आहे हे लक्षात ठेऊन बिझनेस मोठा करण्यासाठी प्रयत्न करावे.
जर पैसा किंवा वेळ तुमच्या बिझनेस मध्ये अडथळा निर्माण करत असतील तर तुमच्या प्रायॉरिटीज चुकीच्या आहेत असे समजा. पैसा किंवा वेळ यामुळे बिझनेसमध्ये कधीच अडथळा निर्माण होत नाही..

बिझनेस करायचा असेल किंवा तो यशस्वी करायचा असेल तर तो कसाही करता येतो.
जर तुम्ही बिझनेसमध्ये लहानात लहान गोष्टींकडे दुर्लक्ष्य केले तर बिझनेसमध्ये अनेक गोष्टी तुमच्यासाठी अप्राप्य राहतील. कोणताही बिझनेस असो, त्यामध्ये येणाऱ्या छोट्यात छोट्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावे लागते. त्यांच्याकडे दुर्लक्ष्य करून चालत नाही. कारण पुढे जाऊन आपल्याला अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष्य करण्याची सवय लागते.. आणि हे बिझनेस अत्यंत धोकादायक आहे..


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


बिझनेसच्या सुरुवातीला कोणालाच माहिती नसते की आपण काय करत आहोत. बिझनेससाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे सुरुवातीला कोणालाच माहिती नसते. त्यामुळे आपण आपले प्रयत्न करत राहावे. इतरांकडे बघत बसण्यापेक्षा स्वतःच्या बिझनेसकडे लक्ष दिले असता बिझनेससाठी हे फायद्याचे ठरते.