पैसे कमविण्याच्या मार्गातील टप्पे

पैसे कमविण्याच्या मार्गातील टप्पे


आयुष्यात पैसे कमावणे किंवा स्वतच्या पायावर उभे राहणे म्हणजेच फक्त यश नव्हे. ते कमावलेले पैसे योग्य पद्धतीने गुंतवून त्यातून पुन्हा अधिक कमाई करणे स्वतच्या हिमतीवर स्वतचा बिझनेस सुरु करणे आणि तो मोठा करणे, त्यातून भरपूर नफा मिळवणे पैसे सांभाळणे ही सर्व यशस्वी माणसाची लक्षणे आहेत

भरपूर पैसा कमावणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण ते पैसे मिळाल्यावर त्यांना योग्य प्रकारे सांभाळणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे  पैसे कामवायचेच आहेत तर त्यासाठी विविध मार्ग आज उपलब्ध आहेत. पण या मार्गात सुद्धा अनंत टप्पे येतात. त्या टप्प्यांनुसार जर आपण पैशांची नीट काळजी घेतली तर नक्कीच आपण लवकर श्रीमंत होऊ शकतो तर पैसे कमावण्याच्या मार्गातील हे टप्पे कोणते ते आपण पाहूया 
 

10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


१ पैसे कमवा
पुष्कळ पैसे कमावण्याच्या मार्गातील पहिल्या टप्प्यामध्ये येते ते म्हणजे सगळ्यात पहिले पैसे कमावणे. पैसे कमावण्यासाठी प्रयत्नच केला नाही तर आपल्याकडे पैसे कसे येतील. त्यामुळे आधी पैसे कमावण्याचे विविध मार्ग शोधावे. पैसा निर्माण करावा. जर बिझनेस करण्याची इच्छा असेल तर स्वतचा बिझनेस सुरु करावा. त्यातून पैसा कमवावा. एकदा की तुमच्या कडे पैसे आले की मग तुम्ही पुढच्या वळू शकता

 
२ पैसे वाचवा
दुसऱ्या टप्प्यात येते ते म्हणजे कमावलेले पैसे वाचवणे. तुम्हाला माहित आहे का एका मोठ्या बिझनेसमनने म्हंटले आहे की, तुम्ही जे पैसे कमवता, तुमच्या त्या कमाई मधील ३०% पैसा तुम्ही सेव्ह केला पाहिजे. त्यामुळे सर्वसामन्यपणे आपल्या उत्पन्‍नाच्या किमान ३० टक्के बचत करावी. हे अगदी खरे आहे. आपल्या एकूण सर्व खर्चामधून होणारा वायफळ खर्च कमी करायला हवा आणि जास्तीत जास्त लक्ष सेविंग्स कडे द्यायला हवे. तुम्ही जितके पैसे वाचवाल तितके तुमचे सेविंग्स जास्त होतील. तोच पैसा तुमच्या कामाला येईल. जेवढे जास्त सेविंग्स तेवढे लवकर तुम्ही श्रीमंत व्हाल. त्यामुळे पैसे सेव्ह करा


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


३ पैशांची गुंतवणूक करा
हा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा आणि जोखीमेचा आहे. पैशांची गुंतवणूक करणे हे जेवढे रिस्की असते तेवढेच लाभदायक सुद्धा असते. कमावलेले पैसे किंवा सेविंग केलेले पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवले असता त्याचा नफा अधिक चांगला मिळतो.. योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणे हे आर्थिकदृष्ट्या गरजेचे आहे. योग्य ते नियोजन करूनच पैशांची गुंतवणूक करावी. गुंतवणुकीचे पर्याय प्रत्येकासाठी सारखे नसतात..

आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा, जोखीम घेण्याच्या क्षमतेचा अशा विविध घटकांचा अभ्यास करून मगच गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्विमा योजना बँकेतील मुदत ठेवी भविष्य निर्वाह निधी  निधी शेअर्स  म्युच्युअल फंड सोने-चांदी रिअल इस्टेट  इ. विविध अशा अनेक गुंतवणूक साधनांतून आपण गुंतवणूक करू शकतो आणि बक्कळ पैसा कमावू शकतो


४ पैसे वाढवा
पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर नक्कीच चांगला नफा आपल्याला मिळतो. त्या नफ्यामधून सुद्धा पुन्हा पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा. गरज नसेल तर मिळणाऱ्या नफ्याची पुन्हा गुंतवणूक करा

रिअल इस्टेट मध्ये चांगला नफा मिळवायचा असेल तर आधीच जमिनी घेऊन ठेवा. ज्यावेळी सर्व लोक जमिनी विकत असतात त्यावेळी त्यांची किंमत कमी झालेली असते. अशावेळी त्या जमिनी घेऊन ठेवा. त्यांनतर योग्य वेळ आल्यावर त्या जमिनी विका. त्यातून तुम्हाला नक्कीच नफा वाढवून मिळेल


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा

 
५ पैसे सांभाळा
आपण मेहनत करून कमावलेले पैसे गरज नसताना उडवू नका. पैशांचा वायफळ खर्च केल्याने पैसे आपल्याकडे टिकत नाही आणि आपण कधीच श्रीमंत होऊ शकत नाही एखाद्याला पैसे कमावता येतात पण ते सारखे खर्च होत असतात. अशाने कधीच आपल्याला यशस्वी होता येत नाही त्यामुळे कष्टाने कमावलेले पैसे सांभाळता सुद्धा आले पाहिजे. योग्य तऱ्हेने पैशांचा व्यवहार करता आला की लवकरच आपण सुद्धा श्रीमंत होऊ शकतो