७५ रिजेक्शन्स ते ७.६ बिलियन डॉलर्सचे साम्राज्य

७५ रिजेक्शन्स ते ७.६ बिलियन डॉलर्सचे साम्राज्य


प्रयत्नांनी यशप्राप्ती ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. शाळेत सुद्धा अगदी लहानपणा पासून आपल्याला हेच शिकवले जाते. 'जो प्रयत्न करतो तो नक्कीच यशस्वी होतो' हा मंत्र प्रत्येकासाठी लागू होतो आणि हे अगदी खरे आहे. कोणतीही परीक्षा असो किंवा कोणती स्पर्धा, कोणती कठीण परिस्थिती असो वा कोणताही बिझनेस असो, आपल्याकडे प्रयत्न करण्याशिवाय दुसरा कोणताच योग्य पर्याय नसतो. प्रयत्न केले तर त्याचे गोड फळ आपल्याला नक्कीच चाखायला मिळते...  मोठमोठ्या यशस्वी बिझनेसमन्सच्या बाबतीतही हेच घडले आहे. त्यांनी प्रयत्न केले, मेहनत केली आणि त्यामुळे आज ते यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचले आहेत...

अशा यशस्वी बिझनेसमन्सच्या यादीतील उभारती नावे म्हणजे बैजू भट्ट आणि व्लादिमिर टेनेव...

10X MBA Online ॲप डाऊनलोड करा

बैजू आणि व्लादिमिर या मित्रांना ७५ रिजेक्शन्स नंतर एक व्हेंचर कॅपिटलिस्ट मिळाला व त्यांनतर त्यांनी सुरु केलेल्या 'रॉबिनहूड' या नो-फी स्टॉक ट्रेडिंग अ‍ॅपने आज त्यांना अब्जाधीश बनवले आहे... 

 बैजू भट्ट आणि व्लादिमिर टेनेव या दोघांनी २००८ साली स्टॅंडफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये गणित या विषयात मास्टर्सची डिग्री मिळवली, आणि तेथेच त्या दोघांची भेट झाली. त्यांनतर त्या दोघांनी स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी 'रॉबिनहूड' हे नो-फी स्टॉक ट्रेडिंग अ‍ॅप तयार केले पण त्यांना हा अ‍ॅप लॉंच करण्यासाठी कॅपिटलिस्ट्स मिळत नव्हते. कोणालाही त्यांच्या अ‍ॅप वर भरोसा नव्हता. यांच्या अ‍ॅप वर पैसे गुंतवणे म्हणजे ते पैसे नक्कीच बुडणार असेच सगळ्यांना वाटत होते. ५ वर्षात त्यांना ७५ कॅपिटलिस्ट्स ने नाकारले. पण तरीही या दोघांनी त्यांचे प्रयत्न सोडले नाही. 

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

शेवटी ५ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर व ७५ रिजेक्शन्स नंतर त्यांना एक व्हेंचर कॅपिटलिस्ट मिळाला... डिसेंबर २०१३ मध्ये 'रॉबिनहूड' अ‍ॅप ऑफिशिअली लाँच झाले. क्राऊडसोर्सड तंत्रज्ञान बातम्यांच्या वेबसाइटवरील हॅकर न्यूजच्या छुप्या स्वरूपातून, टेकक्रंच, पॅन्डोडायली, व्हेंचरबिट, द स्ट्रीट आणि इतर माध्यमातून 'रॉबिनहूड' या कंपनीच्या लाँच बद्दल लेख प्रकाशित झाले. सुरुवातीलाच ३० दिवसांच्या आत त्यांच्या अ‍ॅपला १,००,००० एवढे साइनअप्स मिळाले. 

फेब्रुवारी २०१४ पर्यंत बैजू भट्ट आणि व्लादिमिर टेनेव सीएनबीसी आणि ब्लूमबर्ग टीव्हीवर होते... 
सप्टेंबर २०१४ पर्यंत या अ‍ॅप साठी वेटिंग लिस्ट वाढत गेली आणि ५,००,००० एवढे साइनअप्स वाढले. २०१५ मध्ये, कंपनीने जाहीर केले की अद्याप वेटलिस्टवर असलेले लोक खाती तयार करु शकतात आणि १८ व त्याहून अधिक वयाचे अमेरिकन रहिवासी खात्यासाठी अर्ज करु शकतात. जानेवारी २०१५ पर्यंत त्यांच्या संपूर्ण युझर्स पैकी ५०% युझर्स हे रोज त्यांचे अ‍ॅप यू करत होते तर ९०% लोक हे लोक दर आठवड्याला या ऍपला भेट देत होते. फेब्रुवारी २०१७ पर्यंत कंपनीने ३० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त व्यवहार केले. त्यांनतर एप्रिल २०१७ मध्ये कंपनीने ११० दशलक्ष डॉलर्स एवढा बिझनेस वाढवला. फेब्रुवारी २०१८ पर्यंत कंपनीकडे ३ दशलक्ष युझर अकाउंट्स होते. मे २०१८ पर्यंत कंपनी ५.६ अब्ज डॉलर्स पर्यंत जाऊन पोहोचली. तर आजच्या तारखेला त्यांची कंपनी ७.६ अब्ज डॉलर्सचा बिझनेस करते. 

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा

ज्या अ‍ॅपच्या लाँचसाठी बैजू आणि व्लादिमिर यांना कॅपिटलिस्ट्स मिळत नव्हते आज त्यांच्या याच अ‍ॅपने त्यांना अब्जाधीश बनवले. यावरून आपण सुद्धा चांगला बोध घेऊ शकतो. अपयशाशी कितीही वेळा मार्ग अडवला असला तरीही आपले प्रयत्न न थांबवता जास्त मेहनत केली तर यश आपल्याला नक्कीच मिळते...