उंदराला अब्जाधीश करणारा बिझनेसमन!

उंदराला अब्जाधीश करणारा बिझनेसमन!


डिस्नेचे नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यासमोर मोठ्या कानाचा खोडकर, सहृदय 'मिकी माउस' उभा राहतो.  या मिकीचे वडील म्हणजेच वॉल्ट डिस्नेयांनी या पिटुकल्या मिकीला घेऊन एक मोठे मनोरंजन साम्राज्य उभे केले आहे. माध्यम जगतावर मोठी पकड असणारी वॉल्ट डिस्ने कंपनी ही एक अचाट संस्था आहे. आज डिस्नेची कर्मचारी संख्या 201,000 हुन अधिक असून २०१८ मध्ये या कंपनीची एकूण आर्थिक उलाढाल ही ५९ अब्ज डॉलरहून अधिक होती. टीव्ही , प्रकाशन, चित्रपट, संगीत, व्हिडिओ गेम्स, अम्युजमेंट पार्क,  प्रसारण, रेडिओ, वेब पोर्टल अशा विविध क्षेत्रात सध्या डिस्नेकार्यरत आहे.


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


 २० मार्च, २०१९ मध्ये डिस्नेने २१ सेंच्युरी फॉक्स या कंपनीचे बहुतांश हक्क ७१.३ अब्ज डॉलरना विकत घेतली आहे. या करारामुळे डिस्नेहे  जगातील  सर्वात मोठे मीडिया पॉवरहाऊस बनले आहे.

वॉल्ट डिस्नेहे अ‍ॅनिमेटर, व्यंगचित्रकार, निर्माता, दिग्दर्शक आणि उद्योजक होते.  त्यांची गणना  20 व्या शतकातील सर्वात क्रीएटिव्ह लोकांमध्ये होते.  वॉल्टर डिस्ने यांचा जन्म ५ डिसेंबर, १९०१ रोजी शिकागो येथे झाला.  त्यांनतर त्यांचे कुटुंब मिसुरी आणि त्यानंतर कॅन्सस सिटी येथे स्थलांतरित झाले. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे ते घरोघरी जाऊन वृत्तपत्र टाकीत असत. लहानग्या वॉल्टला चार्ली चॅप्लिन अत्यंत आवडत. त्यासह शाळेतील बातमीपत्रासाठीदेखील ते व्यंगचित्र रेखाटायचे.  १९१७ मध्ये लष्करात भरती होण्यासाठी त्यांनी शाळा सोडली. मात्र १८ वर्षांहून लहान असल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला पुढे त्यांनी फ्रान्समध्ये जाऊन रेड क्रॉस संस्थेसाठी रुग्णवाहिका चालक म्हणून एक वर्ष काम केले.


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


१९१९ मध्ये काम मिळवण्यासाठी वॉल्ट डिस्नेविविध वृत्तपत्रांच्या कार्यालयांत खेपा घालीत होते. मात्र आमच्यावृत्तपत्रात काम करण्यासाठी लागणारे कौशल्य तुमच्याकडे नाही अशी उत्तर देत त्यांना काम नाकारण्यात आले.  नंतर त्यांनी कॅन्सस सिटी फिल्म ऍड कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. येथे त्यांनी कट आउट ऍनिमेशनचा वापर करीत जाहिराती तयार केल्या.

  १९२७ मध्ये  वॉल्ट डिस्नेने युनिव्हर्सल पिक्चर्सच्या संयुक्त विद्यमाने ‘ओस्वाल्ड द लकी रेबिट’ हे व्यंगचित्र तयार केले. या कार्टूनमुळे कंपनीने चांगली  कमाई केली. परंतु हे यश जास्त काळ टिकले नाही. लवकरच त्यानी आपले बहुतेक कर्मचारी गमावले आणि ‘ओसवाल्ड द लकी रेबिट’ ची निर्मिती बंद करण्यात आली. आता वॉल्ट यांना कार्टून मालिका सुरु करण्यासाठी नव्या पात्राची गरज भासू लागली.  तेव्हा त्यांना मॉर्टिमर माउस या उंदराची कल्पना सुचली पुढे त्यांनी या पात्राचे  नाव बदलून मिकी असे ठेवले. लहान मुलांमध्ये मिकी अतिशय लोकप्रिय झाला. लवकरच मिकीची ब्रॅण्डिंग असलेली खेळणी, कपडे, टोप्या यांची विक्री सुरु झाली. कार्टून जगतासाठी हे सारे नवीन होते. मिकी माउसला प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर डिस्नीने मिनी माउस, डोनाल्ड डक, गुफी, प्लूटो ही पात्र तयार केली. कार्टून व्यवसायात चांगला जम बसल्यानंतर त्यांनी डिस्नेलॅण्ड सुरु करण्याची कल्पना मांडली. १६५ एकर जमिनीवर १९५४ मध्ये डिस्नेलॅण्डच्या कामाला सुरुवात झाली. १७ जुलै, १९५५ रोजी कॅलिफोर्नीया येथे पहिले डिस्नेलॅण्ड पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.  पहिल्याच वर्षी डिस्नेलॅण्डला दहा लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली. डिस्ने यांनी स्नो व्हाइट अँड सेव्हन डवार्फस, पिनोकिओ, फॅन्टासिया, डंबो ,बॅम्बी , मेरी पोपपिन्स आणि सिन्ड्रेला या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली.


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


कौशल्य नाही असे सांगत अनेक ठिकाणांहून नाकारण्यात आलेल्या डिस्ने यांनी आज जगातील सर्वात मोठे मनोरंजन साम्राज्य उभे केले आहे. डिस्ने स्टुडिओची स्थापना झाल्यानंतर देखील त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.  स्नो व्हाइट चित्रपटाची निर्मिती करताना ते जवळपास दिवाळखोरीच्या पातळीवर आले होते.  परंतु आपल्या चित्रपटाच्या यशाबाबत त्यांना आत्मविश्वास होता.  चित्रपट खूप लोकप्रिय झाला आणि डिस्नीचे आर्थिक संकट टळले.  डिस्नेकंपनी आज यशाची नवनवीन शिखरे गाठत आहे. याचे सर्व श्रेय जाते ते कागदावर एक छोटासा उंदीर रेखाटणाऱ्या एका अवलिया कलाकाराला.