अतिउत्साहात केलेली चूक कोका-कोलाला पडली महागात

अतिउत्साहात केलेली चूक कोका-कोलाला पडली महागात


If it ain't broke, don't fix it अशी एक इंग्रजी म्हण आहे. जी  गोष्ट चांगली आहे, त्यात विनाकारण हस्तक्षेपं  करून बदल करू नका,  असे केल्याने फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक होते. याचाच प्रत्यय शीतपेयांची विक्री करणारी जगविख्यात कंपनी कोका कोलाला आला.


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


   मे  १८८६ म्हणजे १३३ वर्षांपूर्वी कोका-कोला कंपनीची स्थापना झाली. सुरुवातीला हे पेय औषध म्हणून विकले जात होते. जॉन स्टिथ पेम्बर्टन यांनी कोका-कोला तयार केले होते. पेम्बर्टन यांनी या पेयांचे हक्क उद्योजक एसा ग्रिग्ज कॅन्डलर या उद्योजकाला विकले. कॅन्डलर यांच्या प्रयत्नांमुळेच आज कोका-कोला जगाच्या शीतपेयांच्या बाजारपेठेवर अधिराज्य गाजवत आहे. सध्या कोका-कोला २०० हून अधिक देशांत विकले जात आहे. कोका-कोला हा जगातील सार्वधिक प्रसिद्ध ब्रँडपैकी एक आहे.

    १८ व्या शतकाच्या शेवटी शीतपेयाच्या अजून एका कंपनीची स्थापना झाली. या कंपनीचे नाव होते पेप्सी. पेप्सी हे सुरुवातीपासूनच कोका-कोलाचे कट्टर प्रतिस्पर्धी होते.  पेप्सी आणि कोक यांच्यातील युद्धात कोक नेहेमीपासूनच काहीसे वरचढ राहिले आहे. १९५०च्या दशकाच्या शेवटपर्यंत कोकने विक्रीच्या बाबतीत पेप्सीला बरेच मागे टाकले होते.  परंतु ६० च्या दशकात पेप्सीने त्याचे मार्केटिंग धोरण बदलून टाकले आणि युवा ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले. पेप्सीचे हे पाऊल धाडसी होते. युवांचा ब्रँड म्हणून जर लोकांमध्ये आपली ओळख निर्माण झाली, तर मध्यम वयाचे  आणि त्याहून अधिक वयाचे ग्राहक आपल्याला गमवावे लागतील. याची पूर्ण कल्पना  पेप्सीला होती. मात्र त्यांचा दावं यशस्वी ठरला. १९८० मध्ये त्यांनी पेप्सी जनरेशन हे  नवे स्लोगन लाँच केले. अमेरिकन अभिनेता डॉन जॉन्सन आणि सुप्रसिद्ध पॉप गायक मायकल जॅक्सन यांची ब्रँड अॅम्बॅसडर म्हणून निवड केली.  १९८१ च्या दरम्यान कोकचॆ सर्वोच्च स्थान डळमळू लागले होते. यावेळी रॉबेर्टो गोईझूएटा कोकचे अध्यक्ष  होते. 


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


      कोका-कोला तयार करण्याची रेसिपी ही जागतिक  उद्योग क्षेत्रात्यांचे तील सर्वाधिक जतन  करून ठेवलेल्या गुपितांपैकी एक  आहे.  या पेयांच्या मूळ चवची नेहेमीपासूनच लोकांना भुरळ होती.  म्हणूनच कोका-कोलाच्या चवीत सुरुवातीपासून कोणताच बदल करण्यात आला नाही. मात्र  १९८६ मध्ये कंपनीची १०० वर्षे पूर्ण होत असल्याने ग्राहकांना काहीतरी नवे  देण्याच्या  उत्साहात कंपनीने घेऊ नये तो निर्णय घेतला. त्यांनी कोका-कोलाची रेसिपी बदलण्याचे ठरवले. बाजारात या नव्या चवीच्या कोकची विक्री सुरु झाली.  या नव्या चवीच्या बाटल्या आणि कॅन्सवर  'न्यू'  असा उल्लेख करण्यात आला. जुन्या चवीच्या कोकची विक्री पूर्णतः बंद करण्यात आली.   

  याबदलाविरोधात लोकांनी तीव्रत  नाराजी दर्शवली. अनेकांनी कोका - कोलाचे सेवन बंद केले आणि ते पेप्सीकडे वळले. बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात घट आणि जनरोषाला कंपनीला सामोरे जावे लागत होते.  जगातील सर्वात चुकीच्या मार्केटिंग निर्णयांपैकी एक असे ठरवत  कोकच्या या निर्णयावर जोरदार टीका झाली.  कोकची चव पूर्ववत करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय असल्याचे कंपनीला जाणवले.  आणि  ११ जुलै १९८५ मध्ये कोकची जुनी चव असलेले प्रॉडक्ट पुन्हा सुरु करण्यात येत असल्याची  घोषणा करण्यात आली.


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


   व्यवसायात उत्पादनाप्रमाणेच मार्केटिंगलाही अत्यंत महत्व असल्याचे यातून  अधोरेखित होते. चवीत बदल करण्याआधी लोकांना चव पसंत पडते आहे का हे जाणून घेण्यासाठी  अनेक चाचण्या  घेण्यात आल्या होत्या. या चाचण्यांमध्ये नव्या चवीला लोकांनी वारंवार पसंती दिली. मात्र चवीत केलेल्या बदलामुळे हे पेय त्यांची ओरिजन्यालिटी गमावून बसल्याची भावना ग्राहकांमध्ये निर्माण झाली. याचाच फटका कोकला सहन करावा लागला. 

   बदलत्या काळानुसार आपल्या उत्पादनात सुधारणा केल्यास ते कालबाह्य होण्याची शक्यता असते. मात्र ग्राहकांची कोणतीही तक्रार नसताना केवळ आपल्या प्रतिस्पर्धीला मागे टाकण्याच्या  अट्टाहासापायी केलेली चूक जगातील मोठ्यात मोठी कंपनीदेखील पचवू शकत नाही, हीच शिकवण कोका कोलाच्या या कहाणीतून आपल्याला मिळते.