या 5 गोष्टींचे पालन करा व बिझनेसची क्षमता वाढवा !!

या 5 गोष्टींचे पालन करा व बिझनेसची क्षमता वाढवा !!


अनेकांना शिक्षण पूर्ण झाल्यावर किंवा आधीच नोकरी करावीशी वाटते. तर अनेकांना स्वतःच्या मालकीचा स्वतःचा बिझनेस सुरु करावासा वाटतो. सध्याची नवी पिढी नोकरी पेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याला प्राधान्य देत आहेत. पण त्यातील अनेकांना हे सुद्धा माहित नसते की एखादा बिझनेस सुरु करायचा असल्यास तो कसा सुरु करावा. तर अनेकांकडे पुरेसे भांडवल किंवा ओळख नसते. काही जणांना नेमका कशाचा बिझनेस सुरु करावा याचेच कोडे पडलेले असते. यासाठी सखोल अभ्यास आणि बिझनेसचे पुरेपूर ज्ञान व आवड असणे आवश्यक आहे.. 


तुमच्यातील क्षमता ओळखा आणि कामाला लागा.. 
तुम्हाला ज्या व्यवसायात आवड आहे तोच व्यवसाय करा म्हणजे लवकरात लवकर तो व्यवसाय यशच्या शिखरावर पोहोचेल. पुढील 5 गोष्टी तुमची बिझनेसची क्षमता वाढवण्यास मदत करतील.. 

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


1. आरामाच्या मानसिकतेतून बाहेर या -  
कोणतेही यश प्राप्त करण्यासाठी आरामाच्या मानसिकतेतून बाहेर पडणे गरजेचे असते. यासाठी मोठे धाडस करण्याची गरज असते. असे तेव्हाच होऊ शकते, जेव्हा तुम्ही क्षमता आणि गुणवत्ता विकसित कराल. 


2. स्वत:ला प्रेरित करा - 
तुम्ही स्वतःला कसे प्रेरित करू शकता ते ओळखा, नेटवर्किंग किंवा लोकांमध्ये बोलताना तुमचे वर्तन महत्त्वपूर्ण असते, ते तुम्हाला करिअरमध्ये पुढे नेऊ शकते किंवा इतर ध्येय गाठण्यात मदत करू शकते. 


3. योजना तयार करा - 
कुठल्याही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष नियोजन करा. उदाहरणार्थ तुम्ही अंतर्मुख व्यक्ती असाल आणि नेटवर्किंग इव्हेंटस्ची तुम्हाला भीती वाटत असेल, अशा वेळी काही लोकांकडे लक्ष केंद्रित करा आणि त्यांच्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करा, या सुरुवातीच्या भेटीगाठींचा हेतू हाच ठेवा की, पुढे तुम्हाला लोकांशी बोलण्यात अवघडलेपणा वाटू नये.

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा 


4. मानसिक ऊर्जा वाढीसाठी प्रयत्न करा -
बिझनेस करताना प्रत्येक वेळी तुम्हाला खूप काम असू शकते. त्यामुळे तुम्हाला तणाव व थकवा येऊ शकतो. एखादे काम दररोज करावयाचे असेल तर ते तुम्ही ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याची सवय लावा. मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठी योगा, तुमच्या आवडीनिवडी जोपासा.. कुटुंबासोबत वेळ घालवा. सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची सोबत ठेवा. 


5. नवनव्या लोकांशी ओळख वाढवा - 
बिझनेस सुरु करायचा म्हणजे लोकांच्या ओळखी तर लागतातच. याशिवाय नव्या लोकांकडून खूप काही शिकता येते. स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, नफा कमावण्यासाठी लोकांपर्यंत तुमच्या बिझनेसची माहिती पोहोचायला हवी. त्यामुळे नवनव्या लोकांशी ओळख वाढवा, तुमचे ज्ञान आपणहून वाढेल.  
जास्तीत जास्त लोकांना सांगा तुम्ही व्यवसाय करत आहात आणि तुमची ध्येयं सुद्धा सांगा…. 
म्हणजेच त्यांना कळेल की तुम्ही काय व्यवसाय करत आहात आणि तुमच्या ध्येय पूर्ती साठी ते कशा प्रकारे मदत करू शकतील….
जर तुम्ही तुमची ध्येय सांगितली नाहीत तर ते समजतील की तुम्ही या व्यवसायाला जास्त महत्त्व नाही देत आहात, त्याच पद्धतीने ते तुम्हाला प्रतिसाद देतील.