मराठी उद्योजक सुरेश कुटे यांची गगनभरारी !

मराठी उद्योजक सुरेश कुटे यांची गगनभरारी !

मराठी माणसाला व्यवसायातले फारसे काही जमत नाही, म्हणून त्यांनी व्यवसायाच्या भानगडीत न पडता नोकरीच करावी, व्यवसाय म्हणजे गुजराती-मारवाड्यांनीच करावा.. अशी समज आपल्याकडे सर्वत्र पहावयास मिळते. मात्र याला अनेक मराठी उद्योजकांनी खोटे ठरवले आहे. आज भारतातच नाही तर जगात अनेक मोठमोठे मराठी उद्योजक स्वतःचा बिझनेस यशस्वीरीत्या चालवत आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे 'कुटे गृप'चे संस्थापक सुरेश कुटे.. 


सुरेश कुटे यांनी त्यांच्या यशस्वी उद्योगाची उभारणी केली. त्याला कष्टाची जोड व चांगल्या लोकाचा संपर्क याच्या जोरावर आज ते एक यशस्वी उद्योजक म्हणून संपूर्ण भारतात नावारूपाला आले आहेत.. त्यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे...


व्यवसायाची सुरुवात...
एक सामान्य कुटुंबात जन्मलेले सुरेश कुटे यांनी त्यांच्या सुरवातीच्या काळात अनेक छोटेमोठे व्यवसाय केले. वडिलोपार्जित असलेल्या हिलाल चौकातील कापड दुकानदारीच्या व्यवसायात त्यांनी हातभार लावण्यास सुरवात केली.. यातूनच त्यांच्यातील उद्योगशिलतेला चालना मिळाली.

बीड जिल्हयात सर्वात जास्त कपाशी कापसाचे उत्पादन घेतले जाते, याबद्दल त्यांनी रिसर्च करणे चालू केले. यावर आधारीत त्यांनी व्यवसायही सुरू केला. सुरवातीला कॉटन प्रेसिंग, जिनिग या व्यवसायात त्यांनी आपले नाव कमावले.. 


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


व्यवसायाचा अभ्यास व बँकिंग क्षेत्रात पदार्पण... 
अनेक राज्यांत त्यांच्या या व्यवसायाच्या माध्यमातून संपर्क आला व बाहेरच्या राज्यातील मोठे बिझनेस कसे उभे राहतात याचा त्यांनी आभ्यास केला.. 
जिनिगच्या व्यवसायात येत असलेल्या बँकिंगच्या आडचणी ओळखून त्यांनी बँकिंग क्षेत्रात सुद्धा पदार्पण केले. 'ज्ञानराधा' नावाची मल्टीस्टेट काढून अनेक तरुणांना नोकरीला लावले.. त्यांच्या वडिलांचे नाव ज्ञानोबा व आईचे नाव राधा होते व या नावावरून 'ज्ञानराधा' नावाची मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची त्यांनी स्थापना केली. आजच्या घडीला या सोसायटीचा र्टनओव्हर ५०० कोटीच्या पुढे आहे.. 

इतर राज्यात व महाराष्ट्रात मिळून एकूण ४० शाखा बँकिंगची सेवा सर्वसामान्यांना देत आहेत. सुरेश हे या शाखांचा संपूर्ण व्यवहार हा पारदर्शक व सर्वसामान्य डोळयासमोर ठेवून करत आहेत..


चांगल्या लोकांची साथ...
या बिझनेसच्या उभारणीत त्यांना मोलाची साथ मिळत आहे ती त्यांची पत्नी अर्चना कुटे व त्यांचे भाऊ सदाशीव कुटे यांची.. योग्य वेळी योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन सुरेश यांनी 'कुटे गृप'ची स्थापना केली व या गृपच्या माध्यमातून 'तिरूमला ऑईल रिफायनी' या बिझनेसची उभारणी केली..

या तिरूमला ऑईल मिलच्या माध्यमातून त्याची संपूर्ण भारतभर ओळख निर्माण झाली.. त्यांची पत्नी अर्चना कुटे या ऑईल मिलचा संपूर्ण कारभार पहातात. या ऑईल मिलमध्ये तयार होणारे उत्पादन म्हणजे उत्तम दर्जाचे खाद्यतेल होय. हे उत्तम दर्जाचे खाद्यतेल ऑईल मिलच्या माध्यमातून तयार होत आहे व त्यावरची प्रोसेसिंग, पॅकिंग ही बीड येथील प्लॅंटमध्येच केली जाते..


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा 


या ऑईल मिलच्या माध्यमातून अनेक सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळत आहे.. या ऑईल मिलचे इतर ठिकाणी ही मोठे प्लॅंट उभे राहीले आहेत.. मुबई जवळील पनवेल येथे सुद्धा मोठा प्लॅंट आहे.. त्यामुळे भारताची आर्थिक राजधानी मुंबई तेथून इतर देश विदेशात तयार होणारे उत्पादन वितरीत केले जात आहे.. 


लवकरच या कुटे गृपची गगन भरारी युरोप व अमेरिकेत सुद्धा होईल.. त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आपल्याला सुद्धा अशा यशोगाथांमधून प्रेरणा घेऊन पुढे जाण्यासाठी मेहनत करायला हवी.. यश हे नक्कीच मिळेल..