श्रीमंत व्हायचंय तर हे नक्की करा..!

श्रीमंत व्हायचंय तर हे नक्की करा..!

आपण जीवनात अनेकदा खूप पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करतो. श्रीमंत होण्यासाठी हात-पाय मारतो. मोठी व्यक्ती बनण्यासाठी पुढे वाटचाल करतो. यशस्वी होण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतो... 

कोणी छोटा-मोठा उद्योग सुरु करतो, तर कोणी गलेलठ्ठ पगाराची नोकरी शोधतात. पण फक्त इतरांची नक्कल करून यशस्वी होण्यापेक्षा स्वतःमध्ये सकारात्मक बदल करून तुम्ही तुमच्या ध्येयात यश गाठू शकता. आणि हे करणे प्रत्येकासाठीच सोपे असे नाही... 
यशाचा मार्ग कठीण असतो हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. जर यश मिळवायचे आहे, श्रीमंत बनायचे आहे तर पुढील काही गोष्टी केल्यास तुम्ही नक्कीच तुमच्या ध्येयात यश मिळवू शकाल... 


१) बजेट ठरवून त्यानुसार खर्च करा -
आयुष्यात आपले अनेक प्लॅन्स असतात. त्यानुसार खर्च हा विभागला गेला पाहिजे. कुठल्याही खर्चासाठी आधी प्लॅन करणे, आपले बजेट ठरवणे आणि त्यानुसार खर्च करणे हे अतिशय आवश्यक आहे. याचा पुढील आयुष्यातही खूप फायदा होतो आणि आपला अवास्तव खर्चही होत नाही. खर्चाची योग्य विभागणी करावी. कोणत्या गोष्टीवर किती खर्च करणे आवश्यक आहे याचा विचार करावा. पुढील आयुष्यात कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यावे लागेल अशी परिस्थिती उद्भवू देऊ नका. यामुळे आधीच प्लॅनिंग करणे महत्त्वाचे आहे. 


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


२) 'प्लॅन - B' नेहमी तयार ठेवा - 
खर्चाचे बजेट ठरवतानाच कठीण प्रसंगांसाठी एका बाजूला काही पैसे सेव्ह करून ठेवलेले कधीही उपयोगाला येतात. पुढे जाऊन कोणत्याही कामासाठी पैशाची गरज भासल्यास तुमच्याकडे दुसऱ्या बाजूला साठवलेल्या पैशांची मदत असणारच आहे. त्यामुळे प्लॅन A तयार करत असतानाच सोबत प्लॅन B सुद्धा रेडी ठेवला पाहिजे...


३) सेव्हिंग करण्यावर भर द्या - 
अनेक जण वाचलेले पैसे सेव्हिंग्स मध्ये टाकतात. यामुळे जमा होणारी रक्कम ही सारखी नसते. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच किंवा पगार झाल्यावर एक निश्चित रक्कम सेव्हिंग्स मध्ये टाका. त्यामुळे योग्य सेव्हिंग्स होईल. सेव्हिंग्स करण्याला प्राधान्य द्या...

 
४) पैशांची योग्य गुंतवणूक करा - 
नुसतीच सेव्हिंग करून श्रीमंत होता येत नाही. तर पैसे कुठेतरी चांगल्या व भरवशाच्या ठिकाणी गुंतवणूक करून पैसे कसे वाढवावे याकडे लक्ष द्या. पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे त्या पैशांवर व्याज आणि प्रॉफिट मिळते. बॅंक्स, फंड्स, बॉण्ड्स, स्टॉक मार्केट, रिअल इस्टेट अशा वेगवेगळ्या ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करा व चांगले प्रॉफिट मिळवा. फक्त हे सगळे करत असताना तेवढीच सावधानता बाळगा व स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका... 

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा 


५) स्वतःला अपडेट ठेवा - 
श्रीमंत होण्यासाठी तुमचे पैसे वेळोवेळी वाढवत राहणे गरजेचे आहे. स्वतःला उपडेट ठेवा. बाहेरच्या जगात, मार्केट मध्ये काय चालू आहे याची सतत माहिती घेत रहा. सतत काही ना काही नवीन शिकत रहा. नवनवीन कौशल्य विकसित करा. एकरकमी पगारातून हे साध्य होणार नाही. वेगवेगळ्या मार्गांनी पैसे कमवण्याचा विचार करा, व त्यानुसार प्रयत्न करत राहा...