जैवतंत्रज्ञानात भारताची मान उंचावणाऱ्या किरण मझुमदार !

जैवतंत्रज्ञानात भारताची मान उंचावणाऱ्या किरण मझुमदार !

अनेक जण स्वतःचा बिझनेस करायचा असे स्वप्न पाहतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न सुद्धा करतात. काही जण यशस्वी होतात तर काही जणांच्या पदरी मेहनतीच्या अभावी निराशा पडते. बिझनेस करायचा म्हणजे त्यासाठी मेहनत, प्रयत्न, यश-अपयश या गोष्टी आल्याचं... 

संयम आणि त्यासोबतच ध्येय ठेवणे महत्त्वाचे आहे. जगात अशा अनेक व्यक्ती आहेत व होऊन गेल्या आहेत ज्यांनी मोठे ध्येय समोर ठेवले व त्यानुसार उंच भरारी घेतली. अशाच व्यक्तींमधील एक रणरागिणी म्हणजे किरण मझुमदार-शॉ.. 

आरोग्याच्या क्षेत्रात एक उद्योजक म्हणून जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने ज्यांनी भारताचे नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले आहे... 

किरण मझुमदार शॉ यांनी त्यांच्या जैवतंत्रज्ञानातील ज्ञानास उद्योजकतेची जोड दिली व जे सर्वजण करतात, त्यापेक्षा वेगळी वाट धरून 'बायोकॉन' ही भारतातील पहिली जैवतंत्रज्ञान कंपनी स्थापन केली.. 


शिक्षण... २३ मार्च १९५३ रोजी बंगळुरू येथे जन्मलेल्या किरण या लहानपणापासूनच अतिशय हुशार होत्या. १९६८ साली किरण यांनी बिशप कॉटन गर्ल्स हायस्कूल मधून आपले शिक्षण पूर्ण केले. बंगळुरू  युनिव्हर्सिटी मधून प्राणीशास्त्रात बी.एस.सी ची डिग्री घेतली... 

त्यानंतर त्यांनी १९७५ मध्ये मॉल्टिंग आणि ब्रूइंग या विषयावर ऑस्ट्रेलियात मेलबोर्न यूनिवर्सिटी येथे शिक्षण घेतले. किरण यांनी ऑस्ट्रेलियाचा बॅरेट ब्रदर्स आणि बर्स्टोन येथे प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले, तर कोलकाता येथे ज्युपिटर ब्रुअरीज लिमिटेड मध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून आणि १९७५ ते १९७७ या काळात बडोदाच्या स्टैंडर्ड मॉल्टिंग कॉरपोरेशनमध्ये तांत्रिक संचालक म्हणून काम केले...


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


बायोकॉनची सुरुवात...  १९७८ मध्ये, त्या आयर्लंडचा कॉर्क बायकॉन कैमिकल्स लिमिटेड मध्ये एक प्रशिक्षक व्यवस्थापक म्हणून जोडल्या गेल्या. आणि त्याच वर्षी स्वतःचा उद्योग सुरु करायचा म्हणून त्यांनी १०,००० रुपये भांडवलासह एका भाड्याचा गॅरेज मध्ये 'बायोकॉन'ची सुरुवात केली...

सुरुवातीला त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. कोणतीही बँक त्यांना कर्ज देण्यास तयार नव्हती, समस्या फक्त पैशाची नव्हती तर कामावर नवीन लोकांना नियुक्त करणेही अवघड होते. त्यांचे पहिले कर्मचारी एक निवृत्त गॅरेज मेकॅनिक होते. तसेच, त्यांना अस्थिर पायाभूत सुविधा असलेल्या देशातील बायोटेक व्यवसायाची उभारणी करण्याच्या संबंधातील तांत्रिक आव्हानांचा सामना करावा लागला...

निरंतर ऊर्जा, उच्च गुणवत्तायुक्त पाणी, निर्जंतुकीकरण प्रयोगशाळा, आयात केलेले संशोधन साधने आणि कामगार त्यावेळी आधुनिक वैज्ञानिक कौशल्ये भारतामध्ये सहज उपलब्ध नव्हती. किरण कोणत्याही गोष्टीला सहज जाऊन देत नव्हत्या, म्हणून त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला आणि बायोकॉनला नवीन प्रगतीच्या उंचाईवर नेऊन ठेवले...

बायोकॉन ही कंपनी स्थापन करून किरण यांनी औद्योगिक वितंचकांच्या निर्मितीत प्रथमच भारतात वेगळी कामगिरी करून दाखवली. त्यानंतर त्यांनी कर्करोग, मधुमेह व इतर अनेक रोगांवर उपचारांसाठी औषधांची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित केले...

त्यांची बायोकॉन कंपनी आता जगातील हजारो रुग्णांना दुर्धर आजारांवर औषधे पुरवीत आहे. ही जगातील सर्वाधिक इन्सुलिन निर्मिती करणारी कंपनी आहे. ‘पिशिया’वर आधारित मानवी इन्सुलिन त्यांनी ४० देशांत उपलब्ध करून दिले. त्यानंतर त्यांनी कर्करोग, मधुमेह व इतर अनेक रोगांवर उपचारांसाठी औषधांची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित केले...


 भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा 


सन्मान आणि पुरस्कार... किरण यांना सरकारने पद्मश्री, पद्मभूषण हे नागरी सन्मान देऊन गौरवले आहे. ‘फोर्ब्स’ ने १०० शक्तिशाली महिलांत, ‘टाइम्स’ मासिकाने १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये, तर ‘फायनान्शियल टाइम्स’ने पहिल्या ५० यशस्वी उद्योजक महिलांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश केला होता...

याशिवाय किरण यांना अलीकडेच फिलाडेल्फिया येथे केमिकल हेरिटेज फाउंडेशनचे 'ऑथमर' सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. हे पदक मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या महिला व पहिल्या भारतीय व्यक्ती आहेत...

जैवतंत्रज्ञानात संशोधनाला उद्योजकतेची जोड मिळाली, तर किती उत्तुंग काम करता येते याचा वस्तुपाठ त्यांनी जगाला घालून दिला. बंगळुरू येथे नारायण हृदयालय व कर्करोग उपचार केंद्र सुरू करण्यास त्यांनी मदत केली आहे... 

अलीकडेच अल्झुमब हे जुनाट सोरायसिसवरचे औषध त्यांनी उपलब्ध करून दिले, त्याला भारतात विक्रीस परवानगीही मिळाली आहे. त्यांच्या कंपनीचा इन्सुलिन निर्मिती प्रकल्प लवकरच मलेशियात सुरू होत आहे. रुग्णांना परवडतील अशी औषधे तयार करण्याचे श्रेय त्यांना जाते. प्रयत्नांना दिशा असेल, तर अपयशातूनही मार्ग काढत यशस्वी होता येते हेच किरण यांचे कर्तृत्व आपल्याला सांगते...