आत्मविश्वास वाढवण्यासाठी...

आत्मविश्वास वाढवण्यासाठी...

जीवनात कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे आपला कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास. कोणतीही संधी मिळण्यासाठी आत्मविश्वासाची खूप आवश्यकता असते आणि जर आत्मविश्वासच नसेल तर मिळणाऱ्या संधीही अशाच वाया जातात. अगदी बिझनेस साठीचा विचार करताना सुद्धा 'आत्मविश्वास' हा फॅक्टर खूप महत्वाचा समजला जातो. आज अनेक बिझनेसमन्सनी आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःचा बिझनेस कुठल्या-कुठे नेला आहे...

आत्मविश्वास मिळवण्यासाठी, तो वाढवण्यासाठी व तो टिकवून ठेवण्यासाठी मेहनत करावी लागते. आपला आत्मविश्वास आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो, ज्यामुळे आपण लोक, संधी आणि सकारात्मक उर्जेला आकर्षित करत असतो किंवा मागे टाकत असतो...

काही वेळा, काही प्रसंगांत आपल्या ध्येयाविषयी व ते गाठण्याविषयी काही शंका आपल्या मनात येतात व आपण मनाने डगमगू लागतो. त्यातून निर्माण होणारी काळजी, भीती, शंका यामुळे आपल्या मनात अनिश्चितता निर्माण होते. यावर उपाय म्हणजे, आत्मविश्वास. आपण ठरवलेल्या ध्येयावर आपण ठाम राहणे, ती गोष्ट प्रत्यक्षात येईल व त्या दृष्टीने जी योजना आहे व ती प्रयत्नपूर्वक राबवत आहोत, तर मनाची जी अवस्था आपल्याला ते करायला भाग पाडते, ती म्हणजे आत्मविश्वास!

आपलाच आपल्या ध्येयावर विश्वास नसेल तर दुसरा कसा ठेवेल? विश्वास नसेल तर काम करण्याचा उत्साह राहणार नाही, आपली एकाग्रता राहणार नाही. दुसरे आपल्याविषयी काय बोलतात याचा आपण विचार करत बसू, त्याचा आपल्याला राग येईल, दु:ख होईल. ह्यावर एकमेव उपाय म्हणजे, आत्मविश्वास बाळगणे...


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


आत्मविश्वास असल्यावर आपल्याला बरोबर वाटणारी, आपण ठरवलेली गोष्टच आपण करतो. आपण रिस्क उचलून जास्तीचे काम करायला तयार होतो. आपल्या चुका मान्य करून दुसऱ्याकडून शिकायची तयारी ठेवतो...

मेहनत करून यश मिळवतो. एकदा ध्येय निश्चित केल्यावर, त्याचा प्लॅन तयार केल्यावर परत-परत त्यावर शंका न घेता, अपयशाची तयारी ठेवून, आपल्या ध्येयाप्रति काम करत राहिले पाहिजे. त्यासाठी आवश्यक माहिती व ज्ञान मिळविल्याने आत्मविश्वास वाढतो..

ज्या गोष्टीची भीती वाटते, ती गोष्ट करून बघितल्याने आत्मविश्वास वाढतो. तयारी व स्ट्रॅटेजी विचार व अभ्यास करून केलेली असेल, तर त्याने आत्मविश्वास वाढतो. आशा आणि विश्वास ठेवल्याने आपला कॉन्फिडन्स कधीच कमी होत नाही. नकारात्मक विचारांना काबूत ठेवावे..

नकारात्मक विचार येणे, भीती वाटणे, काळजी वाटणे हे सर्व आत्मविश्वासाच्या अभावी घडून येणारे प्रकार आहेत. पण हे सर्व असताना देखील आपल्या लक्ष्यावरील नजर हटू द्यायची नाही. आशा व विश्वास कायम ठेवून कृती करून पुढे जात राहिले पाहिजे...

वेळ लागला, कष्ट पडले, साहस-जोखीम पत्करावी लागली, तरीही ध्येयापासून दूर नाही गेले पाहिजे. म्हणजेच सकारात्मक विचार, निर्धार, निर्भयता याच्याबरोबरच आत्मविश्वासाने यशाच्या मार्गावरील टप्पे पार करा. जर तुम्ही न्यायाने पुढे जात असाल, तुमच्या कामाचा आराखडा तुमच्याकडे आहे, मार्गावर येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची तुमची तयारी आहे आणि तुमचा तुमच्यावर विश्वास आहे, तर मग तुम्हाला पुढे जाण्यापासून, तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. 


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा आत्मविश्वास वाढविण्यासाठी खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा: 
1) आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा. 
2) योग्य आणि खरे वागा.
3) आनंद व उत्साहाने सर्व कामे करा. 
4) सर्वांच्या उपयोगाचा, फायद्याचा, हिताचा विचार करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. 
5) अभ्यास करून, समस्येचा सर्व बाजूंनी विचार करून, तज्ज्ञांची मदत घेऊन उत्तर, तोडगा, उपाय शोधून काढा व तो अमलात आणा. 
6) नेहमी पुढे जात रहा, शिकत रहा, यशस्वी होत रहा. 
7) प्रत्येक बाबतीत मोठ्या व अनुभवी लोकांची आवश्यक मदत व मार्गदर्शन घेत रहा.
8) अधिकाधिक चांगल्या गुणांचा व सवयींचा विकास करा. 
9) आत्मविश्वास वाढविण्यासाठी आपल्या कामाचा दर्जा सुधारा. 
10) कोणत्याही बाबतीत तक्रारी करणे थांबवा. 
11) जबाबदारी घेऊन आताच्या वेळी काय उत्तम करू शकता ते करा.