जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या शाळेत शिकवत नाहीत…

जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या शाळेत शिकवत नाहीत…

शाळा हे विद्येचं माहेरघर आहे. आपल्याला सर्वप्रथम अक्षराची ओळख, अंकाची ओळख शाळेत करुन दिली जाते. तेथून सुरु होतो आपल्या भावी जीवनाचा प्रवास... जसजसं आपण एक-एक इयत्ता पुढे जातो तसतसं आपण प्रत्येक विषयात निपुण होतो… शेवटी कॉलेज नंतर नोकरी असा प्रवास सुरु होतो.
 
पण जेव्हा आपण नोकरी आणि व्यवसायात पाऊल ठेवतो तेव्हा आपल्यासमोर अनेक प्रश्न उद्भवतात… संभाषण कौशल्य, अपयशाला सामोरे जाणे, टाईम मॅनेजमेंट, तुमची पॅशन… या बाबी आपल्या नव्याने कळतात तेव्हा आपल्याला समजतं हे तर आपल्याल शाळेत शिकवलंच नाही आणि उर्वरित आयुष्य या गोष्टींशी अशक्य आहे… म्हणून आम्ही तुम्हाला अशा जीवनातील महत्त्वपूर्ण बाबी सांगणार आहे ज्या शाळेत सांगितल्या किवा शिकवल्या जात नाहीत. 
 
अपयशाला कसे सामोरे जायचे... हे शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकवत नाहीत. तुमचे गुण इतरांपेक्षा जास्त हवेत किंवा शाळेतील स्पर्धेत तुम्ही अव्वल आले पाहिजे, अशी अपेक्षा कुटुंबिय तुमच्याकडून करतात पण जर आपण यात अपयशी ठरलो तर त्याला सामोरे कसे जायचं हे कोण शिकवत नाही… 
 
टाईम मॅनेजमेंट कसे करायचे... सर्वात महत्त्वाचे म्हणजे टाईम मॅनेजमेंट आपल्या जीवनात वेळ सर्वात महत्त्वाचा आहे. लहान असताना खेळ, शाळा यात आपण गुंतलेलो असतो तेव्हा टाईम मॅनेजमेंटचे महत्त्व सांगायले हवे पण असे आपल्याकडे होताना दिसत नाही.


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा 


पैसे कुठे आणि कसे गुंतवायचे... आपण जेव्हा कॉलेज पासआऊट होऊन नोकरी धंद्यातून पैसे कमवायला लागतो तेव्हा अचानक आपल्या हातात पैसे यायला लागतात. तेव्हा आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या गोष्टी मिळवण्याकडे आपण भर देतो. पण अशावेळी पैसे कुठे गंतवावे, कसे गुंतवावे हे आपल्या सांगणारे ज्ञान आपल्या
क्वचितच मिळते. 
 
यशस्वी होण्याचे सिद्धांत... जीवनात यशस्वी कसे व्हावे, यशस्वी होण्याचे सिद्धांत काय आहेत… हे सांगितले जात नाहीत. 
 

तुमची पॅशन कशी ओळखाल... शाळा आणि कॉलेजमध्ये फक्त अभ्यासावर भर दिली जाते. तुमची पॅशन, तुम्हाला कोणते काम आवडते किंवा तुम्ही कोणते काम सफाईदारपणे करु शकता या बाबींचा विचार केला जात नाही. याउलट तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर पॅशन फॉलो करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच तुमची पॅशन लवकरात लवकर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

 
दुस-यांवर छाप कशी पाडाल (संभाषण कौशल्य)... जीवनात संभाषण कौशल्य अधिक महत्त्वाचे आहे. जॉब इंटरव्ह्यु, बिझनेसमधील वाटाघाटींमध्ये संभाषण कौशल्य महत्त्वाचा रोल निर्माण करतात. म्हणून दुस-यांवर छाप कशी पाडाल योग्य संभाषण कौशल्य असणे महत्त्वाचे आहे आणि हे आपल्याला शाळेत क्वचितच शिकवतात. 
 
विचार करण्याची पद्धत... कामं असेल किंवा जीवन त्यात विचार करण्याची पद्धत कशी हवी याचे शिक्षण आपल्या शाळेत शिकवत नाहीत. प्रत्येक गोष्टीचे दोन पैलू असतात.
चांगला आणि वाईट, या पैलूंचा विचार करुन तुम्ही ती गोष्ट केली पाहिजे, असे काही शाळेत होताना दिसत नाही.
 
प्रवास करण्याचे फायदे... जर आपण योग्य विचार केला तर प्रवास हा आपला गुरु होऊ शकतो. नवनवीन ठिकाणी जाणे, तेथील लोकांना भेटणे, त्यांच्या संस्कृतीबद्दल माहिती घेण्याने आपण प्रगल्भ होतो याचा उपयोग आपल्याला जीवनात मार्गक्रमण करताना होतो. 
 
भावनांवर आवर घालणे... आपल्या भावनांवर कसा आवर घालावा हे आपल्या शाळेत शिकवले जात नाहीत. पण आयुष्यात पुढे जायचे असेल तर भावनांवर आवर घालणे महत्त्वाचे आहे. 
 
तर मित्रांनो या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या शाळेत शिकवत नाहीत पण आपल्याआयुष्यात या मह्त्त्वपूर्ण आहेत. यामुळेच आपण जीवनात यशस्वी होणार हे नक्की…