एकेकाळी भिक्षुक, वॉचमन ते आज 40 कोटींच्या कंपनीचा मालक...

एकेकाळी भिक्षुक, वॉचमन ते आज 40 कोटींच्या कंपनीचा मालक...

"मुंबईतल्या रस्त्यावरील एक बूट पॉलिश करणारा मुलगा मोठा होऊन बिझनेसचा मालक होतो!" "दोन वेळचे जेवण मिळण्याची भ्रांत असलेला युवक अमेरिका आणि लंडनमध्ये कोट्यवधी रुपयांचा बिझनेस करतो!" अशी अनेक उदाहरण आपण बॉलीवूड चित्रपटांमध्ये पाहिली आहेत. म्हणजे हे सर्व काल्पनिकच! प्रत्यक्षात ही उदाहरणं सत्यात उतरतात का??? 

होय, नक्की! आपण पाहिलेली सर्व स्वप्न सत्यात उतरतात फक्त आपण त्यांचा पाठपुरावा योग्यपणे केला पाहिजे. आपली आजची परिस्थिती कशीही अन् कुठलीही असो त्यावर मात करुन आपले स्वप्न पूर्ण करणे, कामात प्रगती करणे, हेच आपले जीवनातील ध्येय असले पाहिजे.

अशीच एक प्रेरणादायी माहिती आज आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत... एकेकाळी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करणारे, नंतर वॉचमन म्हणून नोकरी करणारे रेणुका आराध्य आज आहेत 40 कोटींच्या कंपनीचा मालक... पाहूयात त्यांनी हा स्वप्नवत वाटणारा जीवनप्रवास कसा सत्यात उतरवला...

वडील मंदिरातील पुजारी... रेणुका आराध्य यांचा जन्म कर्नाटक राज्यातील एनेक्कलजवळील गोपासंद्र या गावात झाला. त्यांचे वडील एका मंदिरात पुजारी होते. आई-वडील जे माधुकरी मागत त्यावरच त्यांचं जेवण असा रोजचा दिनक्रम. 10-12 वर्षाचा झाल्यानंतर रेणुका यांनीही आई-वडिलांच्या पायावर पाय ठेऊन भिक्षा मागायला सुरुवात केली. 


दहावी नापास झाल्यानंतर पडेल ते काम केले... दरम्यान रेणुका यांच्या वडिलांची त्यांची रवानगी चिकपेट येथील आश्रमात केली. त्यानंतर काही काळातच रेणुका यांच्या वडिलांना स्वर्गवास झाला. तेव्हा आई, लहान भावंडं पूर्ण परिवाराची जबाबदारी रेणुका यांच्या खांद्यावर आली. याच दरम्यान, दहावीच्या वर्षाला नापास झाले आणि घर सांभाळण्यासाठी रेणुका पडेल ते काम करु लागले. त्या काळात त्यांनी हेल्पर, सेल्समन अशी वेगवेगळी काम केली.

व्यवसायात अपयश आणि वॉचमनची नोकरी... छोट्या-मोठ्या नोकरीत हवे तेवढे पैसे मिळत नाहीत. म्हणून त्यांनी बिझनेस सुरु केला. आपल्याकडील पैसे लावून त्यांनी सूटकेस आणि व्हॅनिटी बॅगची कव्हर बनवण्याचा बिझनेस सुरु केला; परंतु त्यात त्यांना अपयश आले. पुढे 600 रुपये महिना अशी वॉचमनची नोकरी रेणुका यांनी स्वीकारली आणि 20 व्या वर्षी त्यांचे लग्नही लावण्यात आले.


पैसे कमी अन् घरातील वाढत्या जबाबदा-या... पगार कमी, बिझनेस ठप्प आणि घरातील वाढत्या जबाबदा-यामुळे रेणुका बैचेन असतं. आपण जास्तीत जास्त पैसे कसे कमवू याचा विचार ते करीत असतं. याच वेळी त्यांनी सर्व सोडून ड्रायव्हर बनण्याचा विचार केला. तेव्हा त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठीही पैसे नव्हते. काही जुगाड करीत त्यांनी पैसे जोडून लायसन्स काढले. पुढे रेणुका यांनी एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरीची सुरुवात केली.

डेड बॉडी पोहोचविण्याचे कामही केले... "आपल्या सेवेने ग्राहक समाधानी आणि आनंदी झाला पाहिजे," असा रेणुका यांचा कटाक्ष! तो त्यांनी आपल्या प्रत्येक कामात पाळला. रेणुका वेगवेळ्या ट्रॅव्हल कंपनीत काम करीत असताना त्यांना एकदा डेड बॉडी पोहोचविण्याचे काम आले. त्यांनी तेही आनंदाने केले. अनेकजन कामानिमित्त वेगवेगळ्या शहरात असतो. तेथे मृत्यू ओढावला तर डेड बॉडी त्यांच्या घरी नेण्याचे काम रेणुका करीत असत. त्यांनी 4 वर्षांत 200-300 डेड बॉडी पोहोचविण्याचे काम त्यांनी पूर्ण केले.

'प्रवासी कॅब्स प्रायव्हेट लिमिटेड'ची स्थापना... रेणुका आराध्य यांनी ड्रायव्हरचे काम चांगल्या रितीने करीत होते. याच वेळी त्यांनी स्वतःचा व्यवसाय पुन्हा थाटण्याची कल्पना केली. एवढेच नाहीतर त्यांनी लगोलग पाच गाड्याही खरेदी केल्या. तेवढ्यात 'इंडियन सिटी टॅक्सी' कंपनी कोणी विकण्यास काढली. ही कंपनी रेणुका यांनी विकत घेतली आणि त्याचे नामकरण 'प्रवासी कॅब्स प्रायव्हेट लिमिटेड' असे केले. एवढेच नव्हेतर त्यांनी मोठ-मोठ्या कंपनीसोबत टाय-अप करण्यास सुरुवात केली. 'अमेझॉन इंडिया' ही त्यातीलच एक. अमेझॉननंतर त्यांना  Google, Walmart, C-gates, General Motors अशा अनेक कंपन्यांसोबत रेणुका यांच्या कंपनीने टाय अप केले.

1,000 कर्मचारी आणि 40 कोटींची कंपनी... अल्पवधीतच रेणुका यांच्या 'प्रवासी कॅब्स प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीने अनेक राज्यात आपल्या सेवेचे जाळे विणले. एवढेच नव्हेतर आज त्यांच्या कंपनीत 1,000 कर्मचारी कार्यरत आहेत तर त्यांच्या कंपनीची उलाढाल 40 कोटी एवढी आहे. तसेच रेणुका आज 3 स्टार्ट अपचे डायरेक्टर म्हणून काम पाहतात. मित्रांनो, स्वप्न पूर्ण होतात, तुम्ही फक्त त्यांचा मेहनतीने पाठलाग केला पाहिजे!