गॅरेजमधील वर्कर आज आहे 1,000 कोटी कंपनीचे मालक...

गॅरेजमधील वर्कर आज आहे 1,000 कोटी कंपनीचे मालक...

आपण सर्वजण आपआपल्या जीवनात आपआपल्यापरीने संघर्ष करीत असतो. कोणाला कंपनीतील उच्चपदावर जायचं असतं तर कोणाला आपला बिझनेस सुरु करायचा असतो. वेगवेगळी माणसं वेगवेगळी ध्येयं... ध्येय पूर्ण करण्यासाठी जिद्द आणि मेहनत लागते. ती कमी माणसांकडेच असते. अशाच एका बिझनेसमनची कहानी पाहू यात ज्यांनी गॅरेजमधून सुरू केलेला संघर्ष आज 1,000 कोटींच्या कंपनीचा मालक म्हणून पूर्ण झाला आहे.

मित्राच्या गॅरेजमध्ये काम...  नितीन शाह यांचा जन्म मुंबईतील साधारण घरात झाला. सर्वसामान्यांप्रमाणे शाह यांचे कुटुंबाचेही हातावर पोट असा उदरनिर्वाह सुरु होता. अशा परिस्थितीत नितीन आणि त्यांच्या भावडांनी शिक्षण पूर्ण केले. घरची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने मित्राच्या गॅरेजमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरींग करण्यासाठी ऍडमिशन घेतले. 


फायर प्रोटेक्शनची गरज... मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असताना त्यांना कंपनी किंवा बिझनेसेसमध्ये फायर संरक्षण असावे, असे वाटले. कंपनीत आग लागली की, सर्वप्रथम कंपनीचे महत्त्वाचे कागदपत्र आणि माल राख होतो. महत्त्वाची कागदपत्रे आणि कोटी रुपयांचा माल सुरक्षित राहण्यासाठी स्वतः हे काम सुरु केले. १९९५ साली नितीन फायर प्रोटेक्शन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची स्थापना केली.


आंतरराष्ट्रीय स्तरावर कारभार सुरु... नितीन फायर कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे असून देशातील अनेक राज्यात आणि मध्य-पूर्व आशिया आणि आखाती देशातही नितीन शाह यांच्या फायर प्रोटेक्शन कंपनीचे काम सुरु आहे. पूर्वी त्यांच्याकडे कंपनी उभारणीसाठी आर्थिक पाठबळ नव्हते आज त्यांची कंपनी 1,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.