कॅडबरी - केस स्टडी... आपले प्रोडक्ट अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची अनोखी पद्धत!

कॅडबरी - केस स्टडी... आपले प्रोडक्ट अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची अनोखी पद्धत!

कॅडबरीची सुरुवात... कॅडबरी कंपनीचा उदय १९०५ मध्ये युनायटेड किंगडम येथे झाला; पण कॅडबरीला भारतात यायला १९४८ साल उजाडले. गेली ७० वर्षे कॅडबरी देशातील चॉकलेट मार्केटमध्ये कार्यरत आहे आणि आपल्या देशातील ४० टक्के चॉकलेट मार्केट कॅडबरीकडे आहेत.

कॅडबरीचे प्रोडक्ट्स... आता आपण कॅडबरीचे प्रोडक्ट्स पाहू यात... डेअरी मिल्क, जेम्स, 5 स्टार आणि बॉर्नविले...

जाहिरातींचे महत्त्व... आपले प्रोडक्ट कितीही जबरदस्त असो जाहिरातींशिवाय ते व्यर्थ आहे. हे कॅडबरीच्या निर्माणकर्त्यांना समजले आणि ते आपले प्रोडक्ट विकण्यासाठी म्हणजेच अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी जाहिरात हे माध्यम निवडले. म्हणूनच कॅडबरीने त्यांच्या जाहिरातींमध्ये सुंदर टॅगलाईन आणि दिलखेच जिंगल्स दिसतात आणि त्यामुळे कॅडबरीने सर्वांचे मन जिंकले.


पाहू यात कॅडबरीच्या काही जाहिराती… 'असली स्वाद जिंदगी का...' कॅडबरीने १९९३ साली 'असली स्वाद जिंदगी का' या टॅगलाईनअंतर्गत जाहिरात आणली होती. यात तरुण मुलं आणि क्रिकेट पाहणारा प्रेक्षक दाखविण्यात आला आहे. तेव्हा कॅडबरीने थेट तरुणांना ध्यानी ठेऊन ही ऍड बनवली होती

खाने वालो को बहाना चाहिये... कॅडबरीने नंतर 'खाने वालो को बहाना चाहिये' ही जाहिरात आणली. यात कंपनीने आपला फोकस मॅरिड कपल आणि वृद्धांवर ठेवला. तसेच 'खाने वालो को बहाना चाहिये' हे जिंगल्स कोणत्याही वयात कॅडबरीचे खाण्याचे स्पष्ट संकेत देतात.


मिस पालमपूर... २००० साली कॅडबरीच्या जाहिरातीत महानायक अमिताभ बच्चन आणि नवाजुद्दीन सिद्दीकी दिसले. गावातील गायीला मिस पालमपूरचा पुरस्कार मिळाला, हा आनंद द्विगुणीत करण्यासाठी कॅडबरी वाटली जाते. तेव्हा कंपनीने 'कुछ मीठा हो जाये' या टॅगलाईन अंतर्गत ही कॅम्पेन केली होती

इस दिवाली आप किसे खुश कर रहे है... 'इस दिवाली आप किसे खुश कर रहे है!' असे म्हणत कॅडबरीने दिवाळीदरम्यान एक जाहिरात आणली होती. दिवाळीमध्ये सर्व कुटुंबीय एकत्र येतात, सर्वत्र आनंद आणि गोडंधोडं खाण्याचे वातावरण असते. अशावेळेस कॅडबरी तुमचा आनंद वाढवते, असा यामागचा मातितार्थ.


कॅडबरी 5 स्टार - रमेश-सुरेश... कॅडबरीने आपल्या 5 स्टार या प्रोडक्टसाठी रमेश-सुरेश या दोन भावांची विनोदी जाहिरात तयार केली होती. प्रसंग गंभीर असो वा आनंदी कॅडबरी तुम्ही कधीही खाऊ शकता, असे या जाहिरातीतून मांडले गेले

कॅडबरी सिल्क… कॅडबरीने काही वर्षांपूर्वी सिल्क हा ब्रॅन्ड बाजारात आणला. या ब्रॅंडद्वारे फक्त तरुणांना फोकस करण्यात आले होते. तरुण कपलमध्ये होणारी भांडणे, छोटा-मोठा आनंद साजरा करण्यासाठी सिल्क हा पर्याय निवडा, यावर भर देण्यात आला होता