उद्योजकांनो, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय का?

उद्योजकांनो, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय का?

तुम्ही सामान्य माणूस असाल किंवा मोठे अब्जधीश, वेळ कुणासाठीही थांबत नाही. तुमचा वेळ मार्गी लागतोय का, हे पाहिले पाहिजे. यासाठी आज आपण या ब्लॉगद्वारे पाहुयात तुमचा वेळ कसा वाया जात आहे... 

स्वतःच्या कंपनीत कर्मचा-यांसारखी कामे करणे... अनेक बिझनेसमन अशी चूक करतात. कंपनी / बिझनेस स्वतःचा आहे म्हणून रात्रंदिवस काम करतात. आपली कामं सूकर करण्यासाठीच तर आपण तज्ज्ञ कर्मचा-यांना हायर करतो. त्यांना योग्य पगार देतो. अशावेळेस त्यांना कामं डेलिगेट करुन द्यायची. आपण फक्त काम झाले की नाही यावर पारत ठेवायची.  


बिझनेसमनचं काम काय? खरंतर बिझनेसमनचे काम आहे आपल्या कंपनीत फंडिंग आणने, आपल्या व्यवसायाची वाढ कशाप्रकारे होईल, यावर लक्ष केंद्रित करणे. ही आहेत उद्योजकाची कामं! हे सर्व सोडून बिझनेसमन क्लेरिकल कामे करण्यात व्यस्त असतात. म्हणजेच आपण भलतचं काही करीत असतो, त्यात आपला पूर्ण वेळ खर्ची होतो आणि आपल्या व्यवसायाची वाढ होत नाही. 

बिझनेसमनने काय करावं... प्रसिद्ध इन्वेस्टर वॉरेन बफेट सांगतात, यशस्वी लोकं आणि खूप यशस्वी लोकांमधील फरक म्हणजे स्पष्ट नकार. खूप यशस्वी लोकं जे काम नाही करायचंय त्यास थेट नकार देतात. आणि आपल्या कामावर फोकस ठेवतात.


डेलिगेशन महत्त्वाचे... तसेच आपण आपल्या कंपनीतील कामांचे उत्तम डेलिगेशन केले पाहिजे. जर तुम्ही स्वतःच्या कंपनीत कर्मचा-यासारखे काम कराल तर तुमची तुमच्या बिझनेसवरील ग्रिप हळूहळू सुटेल, असेही ते सांगतात.

आता पाहुयात जगातील अब्जाधीश आपले टाईम मॅनेजमेंट कसे करतात… 

जॅक डोर्सी - ट्विटरचे सहसंस्थापक आणि सीईओ
ट्विटरचे सर्वेसर्वा जॅक डोर्सी हे आठवड्यातील ८० तास काम करतात. त्यांने ऑफिसमध्ये प्रत्येक वारासाठी एक थीम तयार केली आहे. सोमवारी - मॅनेजमेंट, मंगळवारी - प्रॉडक्ट्स, बुधवारी - मार्केटिंग असे जॅक यांनी प्रत्येक वारी प्रत्येक मिटींगची नोंद करुन ठेवली आहे.


जेफ विनर - लिन्कडीनचे सीईओ
जेफ विनर दरारोज दोन तास एका खोलीत स्वतःला खोलीत डांबून ठेवतात. यावेळेत त्यांना कोणीही डिस्टर्ब केललं चालत नाही. आपले काम अजून उत्तम कसे होईल याचे चिंतन ते करीत असतात.

रिचर्ड ब्रॅन्सन - व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक
व्हर्जिन ग्रुप आंतरराष्ट्रीय बाजारात नेणारे रिचर्ड दररोज १० मिनिटांची चालती मिटिंग घेतात. याप्रकारच्या मिटिंग घेतल्याने वेळ भरपूर वाचतो तसेच उत्पदकता आणि टाईम मॅनेजमेंटही उत्तमप्रकारे होते.

तर उद्योजकांनो, महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमचा वेळ फक्त बिझनेसवाढीवरच केंद्रित करा!