सेलिंगबाबतचा हा किस्सा वाचाच... तुमच्या सेलिंगबाबत सर्व समस्यांचे हेच उत्तर आहे!

सेलिंगबाबतचा हा किस्सा वाचाच... तुमच्या सेलिंगबाबत सर्व समस्यांचे हेच उत्तर आहे!

सेलिंग काय तर आपल्या सेवा / प्रोडक्ट ग्राहकाला विकणे, अशी आपली भोळी-भाबडी समजूत; पण बिझनेस कोच स्नेहल कांबळे सांगतात सेलिंग म्हणजे फक्त प्रोडक्ट किंवा सेवा नसून सेलिंग म्हणजे भावना विकणे. एकदा का तुम्ही समोरील व्यक्तीच्या भावनांना हात घातला, तुमचे प्रोडक्ट किंवा सेवा नक्कीच विकल्या जातील. याबद्दल आपण एक केस स्टडी पाहू यात...

एडवर्ड बर्नीझ हे माध्यम जगतातील ख्यातनाम व्यक्ती आहे. त्यांना The Father Of Public Relations म्हणजेच जनसंपर्काचे जनक असे म्हणतात. सध्या माध्यामात चालणारी PR ची सुरुवात त्यांनी प्रथम अमेरिकतून केली.


एडवर्ड बर्नीझ सेलिंगबाबत एक किस्सा सांगतात...

जर तुम्हाला पिआनो हे वाद्य विकायचं आहे तर लोकांना थेट पियानो विकायला जाऊ नका.

लोकांना असे सांगा की, पियानो वाजवून अनेक लोकं आनंदी आणि सुखमय जीवन जगत आहेत. पियानो ही तुमच्या आनंदाची गरज आहे.

मग बघा लोकं पियानो सहज खरेदी करतील.


1928 मध्ये एडवर्ड बर्नीझ यांनी पीआर संकल्पना अशीच जगासमोर मांडली आणि आज संपूर्ण जग पब्लिक रिलेशनवर चालत आहे.

गव्हर्नमेंट, कॉर्पोरेट, स्मॉल स्केल बिझनेस, कलाकार, खेळाडू, शाळा, कॉलेजेस, राजकीय नेते ते गल्लीतील नगरसेवक यांचे पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट असते.


एडवर्ड बर्नीझ यांनी 1928 साली अवघ्या जगाला पब्लिक रिलेशन विकलं. मित्रांनो सेलिंग म्हणजे प्रोडक्ट/सेवा विकणे नाही तर सेलिंग म्हणजे तुमच्या भावना दुस-याला विकणे. जर तुम्ही ते करू शकलात तर तुमचा बिझनेसला कोणीही रोखू शकणार नाही.