सुटीच्या दिवशी जास्तीत जास्त पैसे कसे कमवाल?

सुटीच्या दिवशी जास्तीत जास्त पैसे कसे कमवाल?

जास्तीत जास्त पैसे कोणाला नको... आपल्या बॅंक अकाऊंटमध्ये अमाप पैसे हवेत, हे सर्वांचेच स्वप्न आणि ध्येय आहे. त्यासाठी आपण काम करतो. आपले कुटुंब मोठे असते किंवा आपल्या कुटुंबाच्या गरजा अधिक असतात किंवा जास्तीत जास्त पैसे आपल्या गाठीशी हवेत असे अनेकांचे मत असते. या विचारांमध्ये काही गैर नाही; पण ते पैसे योग्य मार्गाने मिळवले पाहिजेत.

जास्तीत जास्त पैसे कमाविण्यासाठी अनेक लोकं सुटीच्या दिवशीही काम करतात. आज काल अनेक कर्मचा-यांना शनिवार-रविवार असे दोन सुटी असते. या दिवसात वेगवेगळी कामं करुन अनेक लोकं सेकंड इन्कम जनरेट करतात. तर आज आपण पाहू यात सुटीच्या दिवशी कोणती कामं कराल जेणेकरुन जास्तीत जास्त पैसे कमावू शकता...


कॅब चालवणे... काही दिवसांपूर्वी एक इंजिनिअरबाबत वाचलं होतं. तो इंजिनिअर दिवसा मोठ्या कंपनीत काम करीत तर रात्री आणि सुटीच्या दिवशी ओला/उबरमध्ये कॅब चालवत असे. असे करत त्याने स्वतःची गाडी घेतली आणि त्याच्याकडे सध्या तीन गाड्या आहेत. दरम्यान ज्यांना गाडी चालवणे आवडत असेल तर अशा लोकांनी कॅब चालवावी. तसेच ऑफिसमधून येताना कारपूल हा ऑप्शनही तुम्हा पैसे कमावून देऊ शकतो.


टेक्नॉलिजीकल सुविधा देणे... सध्या तंत्रज्ञानावर आधारित नव-नवे बिझनेसेस सुरु होत आहेत. अशावेळेस तुम्ही तंत्रज्ञान विषयातील किडे असाल तर तुम्ही टेक्नॉलिजीकल सुविधा देऊनही पैसे कमावू शकता. उदा. कुठल्या कंपनीच्या वेबसाईटचा एसईओ करणे, कुठल्या एका बिझनेसचे बिझनेस सल्लागार म्हणून काम पाहणे, अशी काम सुटीच्या दिवसात करुन तुम्ही पैसे कमावू शकता.


सर्व्हे करणे... मोठमोठ्या कंपन्या, राजकीय पक्ष, मार्केटिंग कंपन्या आपल्या प्रोडक्ट किंवा सेवांचा ऑनलाईन / ऑफलाईन सर्व्हे करतात. अशावेळेस हे काम तुम्ही सुटीच्या दिवशी पूर्ण करु शकतात आणि चांगली अमाऊंट कमवू शकतात.   

बिझनेस वाढविण्यासाठी सोशल माध्यमाचा वापर करु शकता... कोणा एकाचा बिझनेस तुम्ही सोशल मीडियाद्वारे वाढवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर करु शकता. आजकाल फेसबुक, इन्स्ताग्रामवर अनेक लोक आपल्या बिझनेसचे मार्केटिंग करतात. त्यामुळे त्यांना चांगले पैसे मिळतात, तुम्ही हे घर बसल्या तेही सुटीच्या दिवशी करु शकता.