गौतम अदानी - कॉलेज ड्रॉपआउट ते 860 कोटींचे मालक!

गौतम अदानी - कॉलेज ड्रॉपआउट ते 860 कोटींचे मालक!

गौतम अदानी यांचा जन्म 1962 साली गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झाला. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर गौतम यांनी गुजरात विश्व विद्यालय येथे कॉमर्स शाखेत शिक्षण घेतले. पण दुस-या वर्षीच त्यांनी शिक्षण सोडून मुंबईला जाण्याचे ठरवले. मुंबई म्हणजे सोन्याचे अंड देणारी कोंबडी म्हणून गौतम यांनी मुंबईला जाण्याचे ठरवले.


वडिलांच्या कामात रस घेत होते... कॉलेज सोडल्यावर गौतम यांनी काही दिवस आपल्या वडिलांचा टेक्सटाइल बिझनेस सांभाळू लागले. काही पैसे कमाविल्यानंतर त्यांनी मुंबईला जाण्याचे ठरवले. 18 वर्षाचा मुलगा डोळ्यात मोठी स्वप्ने घेऊन मुंबईला आला होता. शहरात आल्या आल्या त्यांनी छोटं-मोठं काम करण्यास सुरुवात केली.

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


महिंद्रा ब्रदर्समधून कामाला सुरुवात... मुंबईमध्ये आलेला प्रत्येक माणूस एका मोठ्या ब्रेकच्या शोधात असतो. गौतम अदानी यांना तो ब्रेक मिळाला. महिंद्रा ब्रदर्समध्ये डायमंड सॉर्टर म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. पुढील दोन वर्ष त्यांनी हे काम केले. यात त्यांनी डायमंड इंडस्ट्रीमधील सर्व बारकावे शिकले. त्यानंतर त्यांनी डायमंड ब्रोकरेजचा बिझनेस सुरु केला. असे म्हणतात की, या व्यवसायामधून लाखो रुपये कमवले. वयाच्या विसाव्या वर्षी गौतम अदानी यांनी आपल्या बिझनेसमधून लाखो रुपये जमा केले होते.


स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 


पुन्हा अहमदाबादला प्रयाण... 1981 साली गौतम अदानी यांनी अहमदाबादला प्रयाण केले. गौतम यांचे ज्येष्ठ बंधू मनसुख अदानी यांनी प्लॅस्टिक फॅक्ट्री सुरु केली. ही फॅक्ट्री चालवायला गौतम यांनी गुजरात गाठले. त्यांनी प्लॅस्टिक बनविण्यासाठी लागणारे Polyvinyl Chloride (PVC) मोठ्या प्रमाणावर आयात केले. हा बिझनेस करताना त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय व्यापा-यांशी संबंध आले. गौतम यांनी त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय व्यापार समजण्यास आणि शिकण्यास सुरुवात केली. 


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

पहिली एक्सपोर्ट कंपनी सुरु केली... आतापर्यंत गौतम अदानी यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार समजून घेतला होता. आता त्यांना जागतिक स्तरावर आपले वर्चस्व निर्माण करायचे होते. म्हणूनच 1988 साली त्यांनी अदानी एक्सपोर्ट लिमिटेड ही कंपनी सुरु केली. आज ही कंपनी सर्वात वेगवान वाढणारी कंपनी म्हणून सर्वश्रुत आहे.


'अदानी ग्रुप'मध्ये आज 50 हून अधिक कंपन्या आहेत. गौतम यांचा बिझनेस भारतापुरताच मर्यादित नसून जगभर पसरला आहे. ऑस्ट्रेलिया हा देशातील त्यांच्या बिझनेस मुख्य बिझनेस म्हणूनही ओळखला जातो. उद्योजकांनो आणि तरुणांनो कोणी विचार तरी केला असेल का कॉलेजमधील ड्रॉप आऊट विद्यार्थी आज 860 कोटींचा मालक होईल... पण गौतम अदानी यांनी हे करुन दाखवले. आपणही त्यांच्याकडून हे बिझनेस कौशल्य शिकले पाहिजेत...