जगातील यशस्वी उद्योजकांचे डेली रुटीन… ऐकून थक्क व्हाल!

जगातील यशस्वी उद्योजकांचे डेली रुटीन… ऐकून थक्क व्हाल!

फेसबुकचा मार्क झकरबर्ग, अमेझॉनचा जेफ बेझॉझ, आपले रिलायन्सचे मुकेश अंबानी, चायनीझ उद्योजक जॅक मा हे जगातील नावाजलेले उद्योजक… परंतु तुम्हाला या उद्योजकांचे डेली रुटीन माहीत आहे का??? हे जगातील सर्वात यशस्वी बिझनेसमन्स आहेत आणि ते त्यांच्या डेली रुटीनने यशस्वी बनले आहेत. तर पाहू यात जगातील शक्तीशाली, सामर्थ्यशाली, श्रीमंत बिझनेसमनचे डेली रुटीन...

ते सर्व दिवसाचे रुटीन ठरवतात... जगभरातील यशस्वी बिझनेसमन्स सर्वात प्रथम दिवसभराचे रुटीन ठरवतात. दिवसभरात काय करायचे आहे, कोणते काम कधी करायचं आहे, हे ते ठरवतात. त्यानुसार त्या कामाची अंमलबजावणी करुन ते काम पूर्ण करतात.


सकाळचा वेळ महत्त्वाच्या कामासाठी राखून ठेवतात... जगभरातील यशस्वी बिझनेसमन्स सकाळचा वेळ महत्त्वाच्या कामासाठी राखून ठेवतात. हे सर्वजन सकाळच्या वेळीच कंपनी किंवा बिझनेस संबंधीत Important & Very IMP निर्णय घेतात. एका स्टडीनुसार असे लक्षात आले की सकाळी आपले मन आणि बुद्धी फ्रेश असते. त्याचा फायदा बिझनेस वाढीच्या निर्णयांसाठी होऊ शकतो.

रेव्हेन्यू जनरेट ऍक्टिव्हीटीसाठी वेळ काढा... कंपनी म्हटलं तर आकडेवारी आणि प्रोडक्ट्स/सर्व्हिस विकून रेव्हेन्यू जनरेट करने, हे आलचं. अशावेळेस जास्तीत जास्त रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी नव्या कल्पना शोधा. प्रोडक्ट्स/सर्व्हिसेस जास्तीत जास्त कशा विकल्या जातील यावर भर द्या.


प्रगतीचा आढावा घ्या... तुम्ही रोज जी काही काम करीत असाल त्या प्रगतीचा आढावा घ्या. तुम्ही ध्येयापर्यंत कितपत पोहोचला आहे, तुम्ही ध्येयापासून कितपत लांब आहात, हे त्यावरुन कळेल. त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करु शकता.

टीमला सोल्यूशन काढण्यासाठी प्रोत्साहित करा... यशस्वी बिझनेसमन त्यांच्या टीमला सोल्यूशन काढण्यासाठी प्रोत्साहित करतात. कितीही प्रॉबलेम्स आले तरी ते टीमच्या मागे समर्थपणे उभे राहतात. त्यांच्या टीमला काम करण्यासाठी नेहमी प्रेरणा देतात.


प्रत्येक बिझनेस ऍक्टिव्हीटीसाठी वेळ द्या... आपण पाहिलं तर कंपनी किंवा बिझनेसमध्ये अनेक फन्कशन्स आणि ऍक्टिव्हीटीज असतात. प्रत्येक कंपनीचा प्रत्येक विभाग कंपनीशी एकसंध हवा. याचा फायदा बिझनेस टार्गेट पूर्ण करण्यासाठी होतो. म्हणूनच बिझनेसमन म्हणून प्रत्येक बिझनेस ऍक्टिव्हीटीसाठी वेळ द्या आणि आढावा घ्या.

शिकत रहा... यशस्वी बिझनेसमन नेहमी शिकत राहण्यावर भर देतात. त्यांना रोज नवे काही शिकायचे असते. त्याची अंमलबजावणी ते आपल्या बिझनेसमध्ये करतात आणि आपला बिझनेस वाढवतात. कोणतेही बिझनेसमन पहा त्यांनी एका स्ट्रीममध्ये व्यवसाय सुरू केला. आता ते वेगवेगळ्या बिझनेसेसमध्ये आहेत. याचे कारण म्हणजे त्यांनी शिकण्यावर भर दिला.