टाटा, अंबानी, बिर्ला व मित्तल यांच्यासारखं यशस्वी बिझनेसमन व्हायचयं तर 'या' सवयी तात्काळ सोडा!

टाटा, अंबानी, बिर्ला व मित्तल यांच्यासारखं यशस्वी बिझनेसमन व्हायचयं तर 'या' सवयी तात्काळ सोडा!

भारतातील यशस्वी बिझनेसमन्सची यादी मोठी आहे. आपल्यामधील प्रत्येक उद्योजक किंवा तरुणाला रतन टाटा, मुकेश अंबानी, बिर्ला, मित्तल या प्रसिद्ध बिझनेसमनसारखे व्हायला आवडेल, यांच्यासारखा बिझनेस करायला आवडेल, यांच्यासारखं बिझनेस वर्गात अधिराज्य गाजवायला आवडेल... काय मंडळी आवडेल ना??? 'होय' असे उत्तर आपसूकच येईल. पण या बिझनेसमन्सनी हा प्रवास कसा केला असेल याची कल्पना केली आहे का कधी... यांनी प्रथम त्यांच्या वाईट सवयी सोडल्या. "मनुष्याकडील अज्ञान गेल्यावर राहते ते फक्त ज्ञान!" या ज्ञानाच्या जोरावरच हे सर्व भारतातील नामी उद्योगपती बनू शकले. 

तर या प्रसिद्ध उद्योजकांनी कोणत्या सवयी सोडल्या ते पाहू यात...

अहंकार सोडा... उद्योगात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडील अहंकार सोडा. आपल्या इगोमुळे आपण अनेकांना दगाऊ शकतो. नम्र रहा आणि कोणतीही मदत मागण्यास घाबरु नका. त्यामध्ये आपले आणि आपल्या बिझनेसचेच भले आहे.

आजचे काम आजच करा... तुम्ही बिझनेसमन असाल किंवा एका कंपनीचे मालक असाल... एक गोष्ट ध्यानी ठेवा. हातात जे काम घेतलं ते तात्काळ पूर्ण करा. असे केल्यास तुमच्या कर्मचा-यांनाही वेळेत काम करण्याची सवय लागेल.

वारंवार प्रतिक्रिया देणे टाळा... कोणती चूक झाली किंवा तुमच्या मनासारखे न झाल्यास कर्मचा-यांवर रागवू नका. सर्वप्रथम चूक का झाली, त्याचे कारण शोधा. कर्मचा-यांनी चूक असेल तर त्याला सौम्य भाषेत खडसवा. यामुळे आपली चांगली छाप दुस-यांवर पडते.

सहका-याला कमीपणाची वागणूक देऊ नका... बिझनेसमधील सहकारी किंवा कंपनीतील कर्मचारी असोत, उच्च असो वा कनिष्ठ असो... कोणत्याही मनुष्याला कमीपणाची वागणूक देऊ नका... एकमेकांना सांभाळून घेणे हे नेहमीच चांगले.

कोणीही परिपूर्ण नसतो... "कोणताही मनुष्य परिपूर्ण नाही!" हे वाक्य नेहमी ध्यानी ठेवा. प्रत्येकाकडे काहीना काहीतरी कमी असतेच. अशावेळी समोरच्या मनुष्याचा आदर करा. त्याच्यामध्ये चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा.

वायफळ खर्च करु नका... बिझनेसमधील पैसे किंवा आपल्याकडील पैशांचा वायफळ खर्च करु नये. "पैशानेच पैसा मोठा होतो!" तुमच्याकडे जास्त पैसे असतील किंवा जास्त नफा झाला असेल तर त्या पैशांचा विनियोग करा. शेअर्स, पॉलिसिजमध्ये गुंतवा. अशाने तुमचा वायफळ खर्च वाचेल आणि पैसे दुप्पट होतील.