उत्तराखंडच्या दिव्या रावतने मशरुम शेतीतून उभी केली कोट्यवधी रुपयांची कंपनी...

उत्तराखंडच्या दिव्या रावतने मशरुम शेतीतून उभी केली कोट्यवधी रुपयांची कंपनी...

शेती हा आपणासर्वांचा म्हणजेच सर्वाधिक भारतीयांचा पारंपरिक व्यवसाय. आपण आता जर शेती करत नसलो तरीही आपल्या वाड-वडिलांनी कधीनाकधी शेती केलीच असेल. काळ बदलला, आपण शिक्षण घेतले त्यामुळे अनेक नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. यामुळे शेती व्यवसाय मागे राहिला परंतु आपल्यापैकी अनेकांनी नोकरीला रामराम करीत पुन्हा शेती सुरु केली. त्यातून ते स्वतः चांगलं उत्पन्न कमवित असून अनेकांसाठी रोजगार निर्मिती केली आहे. तर पाहू यात अशाच एका महिला उद्योजक दिव्या रावत यांच्या महान कार्याची यशोगाथा...

छोटे गावात पाहिलेली मोठी स्वप्ने... उत्तराखंड सारख्या राज्यातील चमोली या छोट्या खेड्यात दिव्या रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील लष्करातून रिटायर झाले असल्यामुळे घरात एक वेगळीच शिस्त. अशातच दिव्याने मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेणे आणि पाच आकडी पगाराची नोकरी करणे हे स्वप्न उराशी बाळगले.


दिल्ली काबीज... हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिव्या यांनी दिल्ली गाठली. नोएडा येथील एमटी यूनिवर्सिटी आणि इग्नू येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. येथे त्यांना पगारही चांगला मिळत होता. नोकरीमध्ये त्यांनी अनेक वर्षे काढली. पुढे नोकरीत मन रमेनासे झाले. काहीतरी वेगळं करायचं त्यांनी ठरवलं.

मोठा गेम करायचायं तर नोकरी सोडवी लागेल... दिव्याच्या मनात काही वेगळं होतं. रोजच्या नोकरीमध्ये तिचे मन आधीच रमत नव्हते. मोठा गेम करायचायं तर नोकरी सोडवी लागेल... आणि तसेच त्यांनी केले. नोकरी सोडून त्यांनी थेट गाव गाठले आणि शेतीत काम करण्यास सुरुवात केली. हा निर्णय दिव्या यांच्या घरच्यांना मुळीच पटला नव्हता; पण काहीतरी करते ना असू देत.


मशरुम उत्पादनाचा बिझनेस सुरु केला... दिव्या शांत बसणारी नव्हती. शेतीत संशोधन सुरु केले. दरम्यान, दिव्याने 2014 साली देहरादून येथील मशरुम प्रोडक्शन टेक्नोलॉजी फॉर आंत्रेप्रेन्योर द डायरेक्टर ऑफ मशरुम रिसर्च सेंटरमधून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर आपल्या गावात जाऊन फक्त 30,000 हजार रुपयांच्या गुंतवणुकीद्वारे मशरुम शेती करण्यास सुरुवात केली. काही महिन्यातच व्यवसायाने ग्रीप पकडली.

कोट्यवधीची कंपनी... वर्षातच मशरुमचा व्यवसायाने चांगला वाढला. गावातील लोकांना रोजगार मिळाला. दिव्याने आपल्या व्यवसायाला 'सौम्या फूड प्रायव्हेट लिमिटेड' असे नामकरण केले. त्यांच्या कंपनीतून मशरुम्स दिल्ली आणि अन्य राज्यात जातात. दिव्या सांगतात, "जीवनात कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी स्वतः ते काम करा आणि ते पुढच्या पीढीपर्यंत पोहोचवा, नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल..." आज दिव्या अनेक लोकांना मशरुम उत्पादन करण्याचे प्रशिक्षणही देतात.


'मशरुम लेडी' म्हणून नाव पडले... उत्तराखंडमधील छोट्याशा गावात घडवलेल्या मशरुम क्रांतीमुळे दिव्या रावत यांना 'मशरुम लेडी' असे नावच पडले. या कामाबद्दल तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते तसेच अनेक आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार दिव्या यांना मिळाले आहेत.  

तर मराठी उद्योजकांनो वेळ गेलेली नाही, तुम्ही कधीही बिझनेस सुरु करु शकता. फक्त तुमच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती हवी, दिव्या रावत यांच्यासारखी...