डिजिटल मार्केटिंगद्वारे स्वतःच्या बिझनेसमध्ये Crowdfunding कशी आणाल?

डिजिटल मार्केटिंगद्वारे स्वतःच्या बिझनेसमध्ये Crowdfunding कशी आणाल?

Crowdfunding हा एक गुंतवणुकीचा भाग असून या गुंतवणुकीद्वारे बिझनेसमन आपल्या बिझनेसमध्ये अधिकाधिक गुंतवणूक आणू शकतात. आज आपण पाहू यात डिजिटल मार्केटिंगद्वारे आपल्या बिझनेसमध्ये Crowdfunding कशी आणायची.

Crowdfunding म्हणजे काय रे भाऊ... वर सांगितल्याप्रमाणे हा एक गुंतवणुकीचा भाग आहे. मोठ्या समुहाने कमी प्रमाणात जमा केलेली रक्कम म्हणजेच क्राऊडफंडिंग बिझनेस. तसेच क्राऊडफंडिंग हा बिझनेस इंटरनेटवर अधिक लोकप्रिय असून या माध्यमातून क्राऊडफंडिंग केली जाते. लघू उद्योजक अधिकाधिक या गुंतवणुकीचा मार्ग अवलंबतात. आता आपण माहिती घेऊयात डिजिटल मार्केटिंगद्वारे बिझनेसमध्ये Crowdfunding कशी आणायची.


फेसबुक ऍड्स... सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया माध्यम म्हणजेच फेसबुकवर आपल्या बिझनेसची जाहिरात करुन आपण क्राऊडफंडिंग बिझनेसमध्ये आणू शकतो. सदर कॅम्पेन फेसबुक युझरचे स्थळ, लोकसंख्याशास्त्र आणि आवडी-निवडीवर आधारलेले असतात. 

‘Lookalike’ audiences चा वापर... ‘Lookalike’ audiences तुमच्या वेबसाईट किंवा फेसबुक पेजवर आलेल्या युझर्सना पुन्हा-पुन्हा टार्गेट करणे. आपण ‘Lookalike’ audiences कस्टमर किंवा गुंतवणूकदाराचा ईमेल डेटाबेस तसेच फेसबुकच्या सहाय्याने तयार करू शकतो. तसेच हा ‘Lookalike’ audiences आपण वारंवार टार्गेटिंग करू शकतो.


सर्च इंजिन मार्केटिंग... तुमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक इनव्हेस्टर तयार असतील; परंतु तुम्ही त्यांच्यापर्यंत कसे पोहचाल? यावेळी सर्च इंजिन मार्केटिंगचा वापर केला जातो. गुगल ड्राईव्ह ट्रॅफिकद्वारे क्राऊडफंडिंग आपल्या बिझनेसमध्ये येऊ शकते.

ट्विटर व लिंकडिनवरील ऍड्स... बिझनेस टू बिझनेस व्यवसायासाठी ट्विटर व लिंकडिनवर ऍड करणे सर्वात महत्त्वाचे आहे. या दोन वेबसाईटवरील युझर प्रोफेशनल बिझनेसमन आणि कर्मचारी असतात, असे म्हणतात. याचा फायदा आपल्याला क्राऊडफंडिंगसाठी होऊ शकतो. 


ईमेल मार्केटिंग... ईमेल मार्केटिंगच्या सहाय्याने बिझनेसमन्स क्राऊडफंडिंग करू शकतात. अनेकांना वाटते ईमेल मार्केटिंग हे इतिहासजमा झालेले टूल आहे; परंतु तसे नाही. याद्वारे आपण स्थानिक आणि राष्ट्रीय बिझनेसला टार्गेट करू शकतो. आणि कुणास ठाऊक आपल्या कंपनीसाठी चांगली क्राऊडफंडिंगही मिळू शकते. 

तर मराठी उद्योजकांनो अशाप्रकारे आपण आपल्या लघू बिझनेसमध्ये क्राऊडफंडिंग आणू शकतो.