योगगुरु की बिझनेसमन? बाबा रामदेव यांनी कशी बदलली बिझनेस जगतातील समीकरण...

योगगुरु की बिझनेसमन? बाबा रामदेव यांनी कशी बदलली बिझनेस जगतातील समीकरण...

योगगुरु बाबा रामदेव यांच्या 'पतंजली' या आयुर्वेदिक कंपनीने सर्वप्रथम टूथपेस्ट बाजारात आणली त्यानंतर साबण, बिस्किट आणि नूडल्स इत्यादी. यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांच्याकडे बिझनेसमन म्हणून पाहू लागले. असं का? साधारण योगगुरु ते यशस्वी बिझनेसमन झालेल्या बाबा रामदेव यांनी बिझनेस जगतातील समीकरण कशी बदलली, ते पाहू यात...

बीएसएनएलसोबत हातमिळवणी... काही महिन्यापूर्वी 'पतंजली'ने बीएसएनएलच्यासाथीने स्वतःचे सिम कार्ड लॉन्च केले. अंतर्गत बीएसएनएल स्पेशल पतंजली बीएसएनल १४४ प्लॅन लॉन्च केला. त्यात अनलिमिटेड कॉलिंग आणि ६० जीबी डेटा ३० दिवसांसाठी देण्यात आला आहे.


परंतु ही तर सुरुवात आहे... काही दिवसांपूर्वी पतंजलीने 'देसी व्हॉट्स ऍप' म्हणजेच 'किंभो ऍप' लॉन्च केले आहे. सदर ऍप आतापर्यंत ३ लाख लोकांनी डाऊनलोड केले आहे. 

कपड्यांचा ब्रॅंड... त्यानंतर 'पतंजली'ने स्वतःचा 'परिधान' हा कपड्यांचा ब्रॅंड लॉन्च केला. या अंतर्गत कंपनीने भारतात १०० स्टोअर्स सुरु केले आहेत. यात ते योगाचे आऊटफिट्स, बेडशीट्स आणि संस्कारी जीन्स विकणार आहेत,


मोठमोठ्या ब्रॅंड्सना टक्कर... जर आपल्याला वाटत असेल की बाबा एवढ्यावरच थांबतील तर तसं नाही, पतंजली 'स्वदेशी फूड चैन' सुरु करण्याच्या तयारीत आहेत. अर्थ पंडितांचे म्हणने आहे की,  भविष्यात ही फूड चैन मॅक्डी, केएफसीशी स्पर्धा करेल.


आक्रामक बिझनेसमुळे गेल्या वर्षभरात तूप टूथपेस्ट, आयुर्वेदिक औषध इ. प्रोडक्ट्सद्वारे पतंजलीने १०,००० कोटी रुपयांचा रेव्हेन्यू क्रॉस केला. आता पतंजली Colgate, Amul, Dabur & Unilever या ब्रॅड्सला जबरदस्त टक्कर देत आहे.

बाबांची स्ट्रॅटेजी... रामदेव बाबा यांची स्ट्राटेजी साधी आणि सोपी आहे. "प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आपल्या प्रोडक्टद्वारे पाय रोवायचे आणि massive market share कमवायचे." यामुळे रामदेव बाबा यांनी व्हॉट्स ऍपलाही सोडले नाही. याद्वारे सर्व इंड्रस्ट्री पादाक्रांत करण्याची बाबांची इच्छा आहे.