सरपंच थाळीः नवं काहीतरी करून दररोज लाखोंची कमाई करणारा तात्यांचा ढाबा

सरपंच थाळीः नवं काहीतरी करून दररोज लाखोंची कमाई करणारा तात्यांचा ढाबा

आपल्या व्यवसायात किंवा नोकरीमध्ये रोज काहीतरी नवीन करणे हे आव्हानात्मक असते; पण जेव्हा आपण काहीतरी नवं करण्याचा ध्यास ठेवतो आणि ते पूर्ण करतो, त्यानंतर मिळणारा आनंद समाधानकारक असतो. असचं काम केलयं सचिन आणि संदीप वाळके या पुण्यातील उद्योजकांनी... रोजच्या हॉटेल व्यवसायात त्यांनी नवं काहीतरी निर्माण केलं आणि खवय्यांना भावले. आज नाशिक, मुंबई, सातारा, कोल्हापूर येथून खवय्ये पुण्यातील तात्यांच्या ढाब्यावर जेवायला येतात. तर आज आपण पाहू यात तात्यांच्या ढाब्याची यशाचे रहस्य...

सुरुवात... संदीप आणि सचिन वाळके यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या वडिलांच्या नावावरुन तात्यांचा ढाबा पुण्यातील औंध येथे सुरू केला. अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी आणि मासांहारी जेवण म्हणून हा ढाबा तेव्हा प्रसिद्ध होता; परंतु कालांतराने व्यवसायात तोच-तोचपणा दोन्ही भावांचे सतवत होता. दोघांनाही काहीतरी नवीन करायचे. तेव्हा पुण्यातील एक पंजाबी थाळी फेमस झाली होती. 

 
अनोख्या मासाहारी थाळी... आणि सदर पंजाबी थाळी महाराष्ट्रभर फेमस झाली. तेव्हा या दोन्ही भावांनी ठरवले. आपण याचसारखी महाकाय थाळी निर्माण करायची परंतु थाळीमध्ये असतील मासांहारी पदार्थ... होय, मासांहारी... असे मासांहारी पदार्थ जे खाऊन खवय्यांचे मन तृप्त झाले पाहिजे. अशी थाळी ज्यात खवय्यांना वेगवेळ्याप्रकारचे मासांहारी पदार्थ असले पाहिजे, असं काहीतरी तयार करायचं या दोघांनी ठरवले.   

लोकांना लुभावणा-या थाळ्या... त्यातून वाळके बंधूंनी सरपंच थाळी, पाटील थाळी, सावकार थाळी, कारभारी थाळी अशा थाळींचे निर्माण तात्यांचा ढाबा या आपल्या हॉटेलमध्ये केले. सरपंच थाळीमध्ये मटणाचे अनेक प्रकार आणि पाच ते सात लोकं जेवतील असे अन्नपदार्थ असतात. तर पाटील थाळी चार ते पाचजण आरामात खाऊ शकतात. त्याचप्रमाणे सावकार थाळी, कारभारी थाळीही आहेत. या थाळ्यांमधील अन्नपदार्थ जेवढे चविष्ट असतात, तेवढेच त्यांची नावे आकर्षक आहेत. म्हणून लोकं या नावाने आकर्षक होऊन येथे जेवणासाठी येतात. 


थाळींची किंमत... तात्यांच्या ढाब्यावरील थाळींची किंमत पुढीलप्रमाणे... सर्वात मोठी सरपंच थाळी २,१०० रुपये, पाटील थाळी १,६०० रुपये सावकार थाळी १,६०० रुपये, कारभारी थाळी १,२०० रुपये अशी या थाळींची किंमत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने लोकं येतात तात्यांच्या ढाब्यावर येतात. तर नाशिक, मुंबई, सातारा, कोल्हापूर येथूनही येथे लोकं आपली मासांहारी खाण्याची तलफ भागवण्यासाठी येतात.

रोजची गुंतवणूक... वाळके बंधू सांगतात, दररोज दीड लाख रुपये एवढी गुंतवणूक आहे. दररोज २०० किलो मटन, १०० चिकन आमच्या किचनमध्ये शिजते. तसेच पूर्वी ३० ते ४० हजारपर्यंत रोजचा बिझनेस व्हायचा. आता म्हणजेच थाळींचा बिझनेस सुरु झाल्यापासून दोन ते अडीच लाखांपर्यंत रोजचा गल्ला जमा होतो. ते पुढे सांगतात, जर तुम्ही चव चांगली दिली की लोकं तुमच्याकडे नक्की येतील. म्हणून आम्ही चवीवर कधीही तडजोड करीत नाही.


तर उद्योजकांनो पाहिलतं, तुमच्या व्यवसायामध्ये नव्याची सांगड घालण किती महत्त्वाचे आहे. आपल्या व्यवसायात दररोज काहीतरी नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करा, तुमच्या ग्राहकांन काहीतरी नवीन द्या, त्यांना नक्कीच तुमची सेवा आवडेल...