भारतातील श्रीमंत उद्योगपतींवर किती कोटी रुपये कर्ज आहे?

भारतातील श्रीमंत उद्योगपतींवर किती कोटी रुपये कर्ज आहे?

सध्या देशात क्रिकेट, सिनेमा या विषयांपेक्षा भारतीय उद्योगपतींच्या कर्जांच्याच चर्चा सर्वात जास्त होत आहेत. वर्तमानपत्र, टीव्हीचे प्राईम टाईम आणि सोशल मीडियावर या चर्चांना उधान आले आहे. अनेक उद्योगपतींनी बॅकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पलायन केले आहे. तसेच काही उद्योगपती यांच्यासारखे पलायन करतील, अशी भीती बॅंक आणि सरकारला वाटत आहे. म्हणूनच सरकार आणि बॅंक अशा उद्योगपतींवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. याचधर्तीवर आम्ही एक यादी तयार केली आहे ज्यात भारतातील प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योगपतींवर किती कोटी रुपये कर्ज आहे, याबद्दल सखोल मांडणी केली आहे.

  • रिलायन्स ग्रुपः देशातील श्रीमंतशाली बिझनेस कुटुंबियापैकी एक असलेले उद्योगपती अनिल अंबानी ऊर्जा क्षेत्र आणि मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्यावर १.२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. ही रक्कम देशातील सर्वात मोठी कर्जाची रक्कम मानली जाते.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

  • जीव्हीके ग्रुपः भारतीय विमानतळांचे बांधकाम, ऊर्जा क्षेत्र आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे गणपती वेंकट कृष्णा रेड्डी म्हणजेच जीव्हीके हा ग्रुपकडे ३३,९३३ कोटी रुपयांचे कर्ज आहे.

 

  • व्हिडीओकॉन ग्रुपः सदर कंपनी टेलिव्हिजन तयार करते तसेच डीटूएच सर्व्हिसेसही देते, कंपनीचे सीईओ वेनुगोपाल धूत यांचे अनेक बिझनेस असून त्यांच्यावर अनेक बॅंकांचे ४७,९७६ कोटी रुपये एवढे कर्ज आहे.

Click here to watch latest motivational videos 

  • लॅन्को ग्रुपः बांधकाम आणि ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असणारे लगदापती मधूसुदन राव यांच्याकडे बॅंकेचे ४७,१०२ कोटी रुपये कर्ज आहे.

 

  • अदानी ग्रुपः काही वर्षांपासून उद्योग जगतात मोठे नाव कमावलेल्या अदानी ग्रुप कृषी, लॉजिस्टिक आणि ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच ऑस्ट्रेलियातील कोळसा क्षेत्रातही हा ग्रुप कार्यरत आहे. दरम्यान अदानी ग्रुपकडून बॅंकाना ९६,०३१ कोटी रुपये कर्ज देणे आहे.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

  • तसेच जेपी ग्रुपकडे ७५,१६३ कोटी, जीएमआर ग्रुपकडे १२,८५० कोटी, जेएसडबल्यूकडे ५८,१७१, एस्सारकडे १,०१ लाख कोटी तर वेदांता ग्रुपकडे १,०३ लाख कोटी रुपये कर्ज घेतले असून बॅंकांना एवढे पैसे मिळणे बाकी आहे. 

To register for upcoming seminar click here