पुणेकर नवनाथ येवले चहा विकून कमवतात महिना १२ लाख रुपये!

पुणेकर नवनाथ येवले चहा विकून कमवतात महिना १२ लाख रुपये!

जेव्हा पंतप्रधान नरेंद मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीला स्वतःचे ब्रॅंडिंग एक चहावाला असे केले, त्या दिवसापासून देशातील सर्व चहावाल्यांना ‘अच्छे दिन’ आले. चहा विकणे हे काम छोटं नसून आपण या व्यवसायात मेहनतीने लक्षाधीश होऊ शकतो किंवा मोठे काम करू शकतो, असा पायंडा तेव्हापासून पडला. आता तर पुण्याच्या नवनाथ येवले यांच्या चहाने अल्पावधीत आपले नाव जगभरात पोहचवले आहे. येवले यांच्या ‘येवले अमृततुल्य’ या टी हाऊसने महिनाभरात १२ लाखांचा बिझनेस केला आहे. सध्या देशात दिल्लीपासून गल्लीपर्यंत येवले यांच्या टी हाऊसचीच चर्चा सुरू आहे. तर पाहूयात अस्सल पुणेकर व्यवसायिक नवनाथ येवले यांची यशाची कहाणी… 

पुणे शहराला चहा पाजण्याचे स्वप्न… चहाचा व्यवसाय हा येवले कुटुंबियांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. हा व्यवसाय नवनाथ येवले यांच्या वडिलांनी सुरू केला. १९८३ साली त्यांच्या वडिलांनी पुण्यातील सारसबाग येथे चहाचे पहिले दुकान उघडले. तसेच येवले कुटुंबिय पहिल्यापासून दूध पुरवठा करण्याच्या व्यवसायामध्ये होते म्हणून जोड धंदा म्हणून हा चहाचे दुकान येवले यांनी थाटले. चहाचा वडिलोपार्जित व्यवसाय येवले यांच्याकडून नवनाथ येवले यांच्याकडे आले. ते सांगतात की, वडिलांचे स्वप्न होते की, “आपला चहा संपूर्ण पुणे शहराने प्यावा आणि हेच ध्येय मनी धरून आम्ही सारे काम करीत आहोत.” 

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

येवले टी हाऊसचे सध्या पुणे शहरात तीन स्टॉल असून, प्रत्येक स्टॉलमध्ये १२ कर्मचारी काम करतात. त्यांच्या चहाच्या चवीमुळे येवले टी हाऊस हे सर्वांचेच आवडीचे ठिकाण बनले आहे. सहसंस्थापक नवनाथ येवले यांच्यासहीत त्यांचे भाऊ ‘येवले अमृततुल्य’ टी हाऊसचे काम पाहतात. काही दिवसांपूर्वी येवले टी हाऊसची आणखीन एक शाखा भारती विद्यापीठ, पुणे येथे सुरू झाली आहे. येवले टी हाऊसच्या शाखा महाराष्ट्रभर आणि देशभर करायच्या आहेत, हे येवले बंधूंचे ध्येय आहे.

Click here to watch latest motivational videos 

येवले टी हाऊस आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवायचे आहे… नवनाथ येवले सांगतात की, “येवले टी हाऊस हा ब्रँड जगभरात पोहचवायचा आहे. तसेच, वडापाव किंवा भजी विकून जितका रोजगार उपलब्ध होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात चहा विकून रोजगार मिळत असल्याचे,” त्यांनी सांगितले.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

रोजगार निर्मितीचे लक्ष्य… सध्या देशासमोर बेरोजगारीचा सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. दरवर्षी लाखो तरुण मंडळी पासआऊट होत आहेत. अशावेळेस बेरोजगारीचा प्रश्न आणखीण बळावणार आहे. म्हणूनच येवले टी हाऊसला ब्रँड करून यामार्फत अनेक रोजगार संधी उपलब्ध करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर मराठी उद्योजकांनो कोणतेही काम छोटं किंवा साधं नसून आपण ते काम किती आत्मियतेने करतो, यावर अवलंबून आहे तसेच तुमचे यशसुद्धा तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे.