मराठी राजभाषा दिन विशेषः मराठी राजभाषा दिन आणि त्याचे महत्त्व!

मराठी राजभाषा दिन विशेषः मराठी राजभाषा दिन आणि त्याचे महत्त्व!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।

धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।

एवढ्या जगात माय मानतो मराठी।।

उद्या म्हणजेच २७ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मराठी भाषा दिवस’, मराठी भाषा दिन, ‘मराठी भाषा गौरव दिन’ अशा अनेक नावाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिना निमित्ताने ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरचं अवर्णनीय असून आपण आणि भविष्यातील पीढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. याचे महत्त्व आपण पुढे पाहू यात.

कुसुमाग्रज यांच्या कार्याची महती… पुणे येथे १९१२ साली जन्मलेल्या वि. वा. शिरवाडकर यांनी लहानपणापासून लिहण्याची आवड होती. त्यांनी कोवळ्या वयातच कविता लिहण्यास सुरूवात केली. पुढे कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातील नावाजलेलेली साहित्य रचना त्यांच्या लिखानातून अवतरत राहिली. त्यांच्या अनोख्या साहित्यासाठी १९७४ साली नटसम्राट या नाटकासाठी ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’ मिळाला. तसेच १९८७ साली साहित्यातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ आणि भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवीत करण्यात केले.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

२७ फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाष दिन साजरा केला जातो. या दरम्यान विविध प्रकारचे मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेला उत्तम दिशा देण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

Click here to watch latest motivational videos 

मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी आपलीच… दरम्यान आज आपण आपल्या भाषेचा म्हणजेच आपल्या मायबोलीचा त्याग करून इंग्रजी भाषेचा अवलंब करीत आहोत. इंग्रजी ही काळाची गरज आहे, नक्कीच, याबद्दल दुमत नाही; परंतु, त्यासाठी आपण मराठीची कास सोडावी, हे मनाला पटणारे नाही. आज आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी पाठवतो, मध्ये मराठी भाषा कशी अवघड आहे आणि काना, मात्रा, उकार आणि वेलांटीने आम्ही कसे हैराण झालो आहोत, अशा आशयाचे विद्यार्थ्यांचे व्हिडीओ व्हॉट्स अपवर व्हायरल करण्यात आले होते. मुलांना मराठीचे ज्ञान योग्य देण्याऐवजी आपण ते व्हिडीओ एकमेकांना पाठवून मजा घेत होतो.

To register for upcoming seminar click here 

अशाप्रकारे मराठी भाषा संवर्धन होणार नाही तरुण मुलांना इंग्रजीसोबत मराठी भाषेचे ज्ञान द्या, मुलांना मराठी शाळेत पाठवा, जर इंग्रजी शाळेत गेला तर आपल्या विद्यार्थ्याची दुसरी भाषा मराठी असावी हा कटाक्ष तुम्ही तुमचा ठेवा. तुमच्य मुलांना महाराष्ट्राचा इतिहास, मराठीचा इतिहास, आपल्या भाषेतील साहित्य वाचायला प्रवृत्त करा, हे करताना तुम्ही ते पहिले करीत आहात का, हे पहा. लहान मुले आपलेच अनुकरण करीत आहात म्हणून पहिले स्वतः करा नंतर दुस-यांमध्ये बदल घडवायला जा. म्हणूनच सुरुवात स्वतःच्या घरातून करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदल एका रात्रीत घडणार नाही म्हणून आपले प्रयत्न सुरूच ठेवा. जय मराठी, जय महाराष्ट्र!

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टीळा,

हिच्या संगाने जागल्या, द-याखो-यातील शिळा।