जगातील दुसरा श्रीमंत मनुष्य Warren Buffett… पहा काय करतात?

जगातील दुसरा श्रीमंत मनुष्य Warren Buffett… पहा काय करतात?

“Someone’s sitting in the shade today because someone planted a tree a long time ago.” प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि जागतिक बिझनेस मॅग्नेट Warren Buffett यांनी सांगितलेला हा कोट आहे. “आज आपण झाडाच्या सावलीत उभे राहिलो आहोत कारण फार वर्षापूर्वी कोणीतरी झाड लावले होते.” असा याचा मराठी अनुवाद. जसे परीस कोणत्याही वस्तूला लागले की त्या वस्तूचे सोने होते तसेच Warren Buffett यांनी ज्या कंपनीत गुंतवणूक केली, ती कंपनी हमखास मार्केटमध्ये यशस्वी होणारच, असे अमेरिकेत गणित ठरले. कोणताही बिझनेस न उभारता वॉरेन यांनी आपले नाव जगातील श्रीमंताच्या यादीत कोरले. ऑगस्ट 2017 साली ते जगभरातील श्रीमंतांच्या यादीत दुस-या क्रमांकावर होते. पाहू यात Warren Buffett यांचा जीवनप्रवास…

वाढवा तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय 

वयाच्या 16व्या वर्षी 53 हजार अमेरिकन डॉलर्स कमविले… Warren Buffett यांचा जन्म 1930 साली  यूएसमधील नेब्रास्का येथे झाला. तरुणपणीच त्यांना उद्योगधंदे आणि कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणुकीची सवय लागली. म्हणूनच त्यांनी न्यू यॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स येथून अर्थशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. वॉरेन यांनी त्यांचे पहिले शेअर्स वयाच्या 11व्या वर्षी खरेदी केले. ते किशोरवयीन वयात होते पण पैसे कुठे आणि किती गुंतवायचे हे त्यांनी चांगलेच हेरले होते. त्यांनी वर्तमानपत्र घरोघरी टाकण्याचे काम केले. 16व्या वर्षी त्यांच्याकडे 53 हजार अमेरिकन डॉलर्स होते.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

सर्वात वाईट डील… 1993 साली Warren Buffett यांनी त्यांच्या जीवनातील वाईट डील साईन केली. वॉरेन यांनी डेक्सटर शू कंपनीमध्ये 443 मिलीयन अमेरिकन डॉलर गुंतवले होते आणि त्यांना या डीलमधून मोठे नुकसान झाले होते. या नुकसानानंतर ते त्यांनी मार्ग बदलला नाही किंवा गुंतवणूक करणे सोडले नाही. वॉरेन पुन्हा उमेदीने कामाला लागले. आपल्या मिळकतीतील 25 बिलीयन रक्कम त्यांनी सामजिक संस्थांना केली आहे.

Click here to watch latest motivational videos 

फक्त एक ईमेल पाठवला आहे… सर्वांना वाटते की, मोठा गुंतवणूककार किंवा बिझनेसमन सतत बिझी असतात; परंतु हा आपला गैरसमज आहे. Warren Buffett यांनी आतापर्यंत एकच ईमेल पाठविला आहे. मायक्रोसॉफ्टच्या यांना त्यांनी ईमेल पाठवला होता. हाच त्यांचा पहिला आणि शेवटचा ईमेल ठरला. तसेच वॉरेन यांचे वाचन फार आहे. त्यांचा दिवसातील 80 टक्के वेळ पुस्तके वाचण्यात जातो.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

कोठे गुंतवणूक करायची… Warren Buffett यांच्या मते सोन्यातील गुंतवणुकीत सर्वाधिक परतावा नाही. म्हणून ते सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला कोणालाही देत नाहीत. त्यापेक्षा शेअर्स आणि घर वा प्लॉटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला वॉरेन देतात.

To register for upcoming seminar click here 

सध्या वॉरेन हे 87 वर्षाचे आहेत आणि जगातील यशस्वी म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. त्यांनी श्रीमंतीवर एक टिप्पणी केली होती ती अशी, “मला माहिती होते की मी श्रीमंत होणार आहे, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती!”आणि आज ते 81.1 बिलीयन डॉलरचे मालक आहेत. आपलाही आपल्या कामावर आणि स्वतःवर आत्मविश्वास हवा… तरच आपण आपआपल्या क्षेत्रात अमेझिंग काम करू शकतो.