दिवसाच्या 35 हजार ऑर्डर्स… एवढा आहे Big Basket चा बिझनेस

दिवसाच्या 35 हजार ऑर्डर्स… एवढा आहे Big Basket चा बिझनेस

प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा सांगतात की, “मी माझे जीवन काही मूल्यं आणि नैतिकतेच्या आधारावर जगण्याचा प्रयत्न केला. तसेच कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी मी झटून उभा राहिलो आणि प्रत्येक गोष्टीला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. तरुणांनीही त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करावा.” याच आधारावर टाटा या कंपनीचा संपूर्ण डोलारा उभा आहे. हे वाक्य टाटा ग्रुपमध्ये काम करणा-या प्रत्येकाच्या मनावर कोरले आहे आणि म्हणूनच टाटा ग्रुप देशातील सर्वोत्तम बिझनेस ग्रुपपैकी एक आहे. हे सत्य टाटामधील कर्मचारी आणि कंपनीशी जोडलेले सर्वजन मानतात.

वाढवा तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय 

अशांपैकीच एक आहेत हरी मेनन. हरी हे टाटा ग्रुपमधील एक उत्तम कर्मचारी होते. हरी यांनी स्वतःचा बिझनेस सुरु करण्यासाठी टाटामधील नोकरी सोडून Big Basket ही कंपनी सुरु केली; परंतु हरी हे आज ही ‘टाटा’मधील तत्त्वे आणि नैतिकता विसरले नाहीत. ‘टाटा’च्या ‘सर्वप्रथम ग्राहकसेवा’ या ब्रीदवाक्य त्यांनीही आपल्या कंपनीत रुजू केले आणि आज Big Basket ही कंपनी ऑनलाइन ग्रोसरी क्षेत्रात सर्वप्रथम क्रमांकावर आहे. तर आज घेऊ यात  Big Basket या कंपनीचा आढावा… 

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

Big Basket भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन सुपरमार्केट आहे. ग्राहकांनी छोट्या-मोठ्या वस्तूंसाठी बाजारात जावे लागते. हेच हेरून हरी मेनन आणि यांच्या टीमने घरच्या किराणा माल आणण्याची कष्ट वाचविण्याचे ठरविले. साधारण 1999 साली व्ही एस सुधाकर, हरी मेनन, विपुल पारेख, अभय चौधरी आणि व्ही. एस रमेश यांनी मिळून ‘फॅब मार्ट’ नावाने ऑनलाइन शॉपिंगचा व्यवसाय सुरु केला. दाक्षिणात्य राज्यात यांचा बिझनेस जोरात सुरू होता. दरम्यान 2006 साली आदित्य बिरला ग्रुप यांनी या कंपनीत गुंतवणूक केली. त्यानंतर 2011 साली या कंपनीचे नाव Big Basket या नावाने ठेवण्यात आले आणि असा सुरू झाला Bigbasket.com चा ऑनलाइन किराणा मालचा व्यवसाय.

Click here to watch latest motivational videos 

Big Basket चे बिझनेस मॉडेल… प्रत्येक व्यवसायाचे बिझनेस मॉडेल असते. Big Basket चे बिझनेस मॉडेल त्रिकोणीय तत्त्वांवर अवलंबून आहे.

1. सर्वोत्तम ग्राहक सेवा – Big Basket कंपनीचे यश सर्वोत्तम ग्राहक सेवेवर टिकून आहे. कोणत्याही मालाची डिलीव्हरी ते एका दिवसात देतात.

2. उत्पादनांची विविधता –  Big Basket कंपनीने आपल्याकडे 14 हजारांहून अधिक वेगवेगळे प्रोड्क्ट्स ठेवली आहेत. ही १४ हजार प्रोडक्ट्स सामान्य माणसांच्या रोजच्या गरजेहून अधिक आहेत.

3. सतत परिवर्तन – Big Basket कंपनी वेबसाइटनंतर  ऍन्ड्राईड आणि आयओएस ऍप डेव्हलप केले. तसेच ‘स्मार्ट बास्केट’मुळे लोकांचा वेळ वाचला जातो.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

अशा त-हेने Big Basket ने स्वतःचा बिझनेस वाढविला आहे. सध्या कंपनी फक्त बंगळूरू, मुंबई आणि हैदराबाद येथे कार्यरत आहे. कंपनीकडे हजाराहून अधिक ब्रॅन्ड्स 14 हजार प्रोडक्ट्स आहेत. Big Basket सध्या दिवसाला 35,000 ऑर्डर्स येतात. या ऑर्डर्स साधारण 1,500 रुपयांपर्यंतचा असतात. आपला बिझनेस कोणताही असो आपल्याला त्यातून पैसा कमाविता आला पाहिजे. हरी मेनन आणि त्यांच्या टीमने ही हेच केले.

To register for upcoming seminar click here