Indian Celebrity नी फंडिंग केलेले स्टार्टअप्स

Indian Celebrity नी फंडिंग केलेले स्टार्टअप्स

आपल्या देशात क्रिकेट, बॉलीवूड आणि बिझनेसने अनेक सेलिब्रिटींना जन्माला घातले. प्रसिद्ध झाल्यावर पैसा तर येणारच मग तो गुंतवायचा कुठे, हा प्रश्न निर्माण होतो. अनेक Indian Celebrity गुंतवणूक कुठे करतात, त्यांची गुंतवणूक किती असते, कशाप्रकारे ते गुंतवणूक करतात, असे सारे प्रश्न आपल्याला पडतात. म्हणूनच आज आपण माहिती घेऊया Indian Celebrity नी फंडिंग केलेले स्टार्टअप्स…

सचिन तेंडुलकर – क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर यास आपण सीरियल बिझनेसमन म्हणू शकतो. सचिनने हॉटेल आणि अनेक बिझनेससमध्ये गुंतवणूक केली आहे. 2017 च्या मार्चमध्ये सचिनने हैदराबाद शहरातील टेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केल्याचे कळते. ही कंपनी स्मार्ट डिव्हाईसेस तयार करते.

वाढवा तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय 

शिल्पा शेट्टी-कुंद्रा – मॉडेल आणि यशस्वी अभिनेत्री असलेली शिल्पा शेट्टी-कुंद्राने बिझनेसमन राज कुंद्राशी लग्न केले आणि बिझनेसमध्ये पाऊल टाकले. ‘ग्रुपको इन्फोकॉम’ या स्टार्टअपमध्ये तिने गुंतवणूक केली असून हे स्टार्टअप लोकांना वाजवी दरात घर देण्यासाठी प्रसिद्ध आहे.

अमिताभ बच्चन – सदी के महानायक असा बिरुद मिरविणारे अमिताभ बच्चनही गुंतवणूकीमध्ये शहेनशहा आहेत. 2015 साली त्यांनी सिंगापूर बेसड ‘झिड्डू’ या क्लाउड सर्व्हिस देण्याऱ्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली. त्यांनी या स्टार्टअपमध्ये 2.50 लाख डॉलरची गुंतवणूक केली आहे.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

महेश भूपती – भारताचा स्टार टेनिसपटू महेश भूपती खेळातील  अनेक गुंतवणूकीसाठी ओळखला जातो. त्याने ‘स्पोर्ट्स 365’ या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली. देशातील तरुणांसाठी स्पोर्ट्स आणि फिटनेसचे प्रोडक्टस ही कंपनी तयार करते  

ए आर रहमान आणि शेखर कपूर – संगीतकार ए. आर. रहमान आणि दिग्दर्शक शेखर कपूरने एक स्टार्टअपचे निर्माण केले आहे. ‘क्यूकी’ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून याद्वारे तरुणासाठी नवनवा कॉन्टेन्ट प्रॉड्युस केला जातो.

Click here to watch latest motivational videos 

सलमान खान – भाईजान सलमान खानचे बिझनेस अनेकांना माहित नाहीत. पण तो ही सीरियल बिझनेसमन आहे. यात्रा या ट्रॅव्हल स्टार्टअपमध्ये त्याचे 5% स्टेकस आहेत. तसेच सलमान खान प्रोडक्शन हाऊसही त्याची कंपनी आहे

करिष्मा कपूर –  पूर्वाश्रमीची अभिनेत्री करिष्मा कपूरने कित्येक हीट सिनेमे दिले आहेत. आता बिझनेसवूमन झाली आहे. करिष्माचे ‘बेबीओय’स्टार्टअपमध्ये 26% शेअर्स आहेत. हे इकॉमर्स स्टार्टअप लहान मुलांच्या प्रॉडक्ट्ससाठी प्रसिद्ध आहे.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

मनोज वाजपेयी – नॅशनल पुरस्कार विजेता मनोज वाजपेयी हा बिझनेसमध्ये आहे हे ऐकून आपल्याला धक्का बसला असेल. त्याने आपल्या मित्रांसोबत ‘मुव्हीज’ या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. हे स्टार्टअप व्हिडीओज ऑन डीमांड वर कार्यरत असून देश-विदेशातील आगळेवेगळे सिनेमे लोकांना दाखवते

युवराज सिंग – टी20त सलग 6 सिक्स मारणारा सिक्सर किंग ‘यू वी कॅन’या सोशल एनजीओसाठी कार्यरत असून त्याने स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे. ‘हेल्दीयन’असे त्याच्या स्टार्टअपचे नाव असून ते सध्या दिल्लीमध्ये कार्यरत आहे. लवकरच ते मुंबई आणि बंगळूरू येथे काम सुरू करणार आहे.

To register for upcoming seminar click here