Business वाढवायचाय? ‘ही’ पुस्तके वाचायलाच हवी…

Business वाढवायचाय? ‘ही’ पुस्तके वाचायलाच हवी…

पुस्तकं म्हणजे कंटाळवाणा विषय… 21 व्या शतकात जिथं तंत्रज्ञानचं वर्चस्व आहे आणि येणा-या काळातही तंत्रज्ञान प्रगत होतचं राहणार आहेत. यापुढे सर्वात प्राचीन ज्ञानाचे साधन असलेली पुस्तकं कशी तग धरतं असतील असा प्रश्न आपल्या पडत असेल. परंतु,  पुस्तकांनी जसे भूताकाळात ज्ञानरुपी अमृत आपल्या पाजले तसेच काम ते पुढेही सुरु ठेवणार आहेत. फक्त ते आपण न आळस करत ग्रहण केले पाहिजे आणि आपण येथेच कमी पडतो. असो! आमचे काम आहे मराठी व्यवसायिक आणि मराठी तरुणांना Business विषयक माहिती देणे. तर आज पाहुयात अशी काही पुस्तके जी आपला Business वाढवायला आपल्याला मदत करतील…

Rework – जेसन फ्रायड आणि नोरा रॉबर्ट्स यांनी लिहलेले हे पुस्तक आहे. यात आपण काम कधी करावे, कधी करु नये. तसेच बिझनेसमनने प्लॅनिंग कसे करावे, गुंतवणूकदाराशी चर्चा कशी करावी, हे दाखले दिले आहेत.

Inbound Marketing: Get Found Using Google, Social Media, and Blogs – ज्या व्यवसायिकाचा बिझनेस ऑनलाईन आहे त्याने हे इन्बाऊंड मार्केटिंग हे पुस्तक वाचायलाच हवे. या डिजीटल ग्रंथाचे लेखक ब्रायन हॉलिगन असे असून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बिझनेस कसा विस्तार करायचा याची उत्तम माहिती यात आहे.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा

Awaken the Giant Within – टोनी रॉबिन्स हे अवेकन दी जायंट विथीन हा पुस्तकाचे लेखक आहेत. आपल्यातील सामर्थ्य जाणून उत्तम आऊटपूट कसे द्यावे, याची मांडणी या पुस्तकात केली आहे.

Outliers: The Story of Success – हे पुस्तक कॅनेडाचे माल्कम ग्लेवेल यांनी लिहिले आहे. पत्रकार, लेखक, आणि स्पीकर असलेले माल्कम यांनी आपला पूर्ण अनुभव या पुस्तकाता चितारलेला आहे.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

The Dip: A Little Book That Teaches You When to Quit – लेखक सेठ गॉडिन यांच्या विचारसरणीतून उतरलेले दी डीप हे पुस्तक आपल्याला सांगते की, जीवनात आपण कुठल्याक्षणी थांबायचे आणि कुठे पुढे जायचे.

Good to Great: Why Some Companies Make the Leap…And Others Don’t – कंपनी अथवा व्यवसाय छोटा असो वा मोठा त्या मोठ्या करण्याची ताकत आपल्यात असायला हवी, हे सांगत आहेत लेखक जिम कॉलिन्स ‘गूड टू ग्रेट’ या पुस्तकातून.

बिझनेस  कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

Rich Dad Poor Dad – श्रीमंत लोक आपल्या मुलांना कोणता सल्ला देतात आणि सामान्य लोक हा सल्ला देत नाहीत, याचे उत्तम विश्लेषन लेखक रॉबर्ट कियोसाकीने ‘रिच डॅड पूर डॅड’ यात केले आहे.

Think and Grow Rich – लेखन नेपोलियन हिल यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलेले ‘थिंक ऍन्ड ग्रो रिच’ हे पुस्तक आपला बिझनेस कसा वाढवायचा याबद्दल मार्गदर्शन देतात

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा  

The Lean Startup – तरुण उद्योजक स्वतःचा बिझनेस तंत्रज्ञानामुळे कसा उत्तमप्रकारे चालवितात, याची सखोल मांडणी लेखक एरिक रिझ यांनी ‘दी लिन स्टार्टअप’ या पुस्तकात केली आहे.

The 4-Hour Work Week – लेखक टिमोथी फेरिस यांनी ‘दी 4 अवर वर्क वीक’ या पुस्तकाची मांडणी केली आहे. कामाची 9-5 ही संकल्पना मोडित काढून नव्या पद्धतीने काम करुन बिझनेस कसा वाढवायचा, याबद्दलची मांडणी या पुस्तकात केली आहे.

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा