‘अशी’ करा स्वतःमध्ये गुंतवणूक

‘अशी’ करा स्वतःमध्ये गुंतवणूक

तुम्हाला अनेक जण सांगतिल, की स्वतःमध्ये गुंतवणूक करा. पण, ती करायची कशी? स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळवून देणार आहे. ती कशी हे आपण या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
प्रगतीसाठी वाचन करा..
अनेक जण वाचन तर करतात, पण कोणतं साहित्य वाचावं हे न कळल्यानं ते त्यांच्या प्रगतीसाठी पोषक ठरेलंच असं नाही. अनेक जण शाळेत अभ्यास करण्याचा कंटाळा येतो म्हणून जी पुस्तकांकडे पाठ करतात ते पुन्हा पुस्तकांच्या दुनियेत डोकावून पहात सुद्धा नाहीत. इथेच त्यांच्या प्रगतीला खीळ बसते. जर तुम्हाला पुस्तकं वाचण्याचा कंटाळा येत असेल, तर तुम्ही ऑडिओ बुक्स ऐकून ज्ञान मिळवू शकता.
लोकांसोबत संवाद साधा/मार्गदर्शक शोधा
वेगवेगळ्या क्षेत्रांतील तसेच विचारांच्या लोकांशी संवाद साधा. जेवढं तुम्ही वेगळ्या विचारधारांशी जुळवून घ्याल तेवढीच तुमच्यात सामाजिक जाणीव निर्माण होईल. तुम्ही हे जग चांगल्या पद्धतीनं समजू शकाल. जेव्हा तुम्ही तुमच्याच सारख्या लोकांशी बोलता, मैत्री करता किंवा सानिध्यात राहता तेव्हा तुम्ही चाकोरीबद्ध जगता. तुमच्या ज्ञानाची कवाडं तेव्हाच खुली होतील जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन कराल, शिकाल. कदाचित तुम्हाला भेटलेला एखादा नवीन व्यक्तीच तुमचा चांगला मार्गदर्शक बनेल.. जेवढ्या चांगल्या लोकांच्या तुम्ही संपर्कात रहाल तेवढी जास्त प्रगल्भता तुमच्यात येईल. असं झालं तर ती तुमच्या आयुष्यातील उत्तम गुंतवणूक ठरेल.
खूप प्रवास करा
जेवढा दूरवर तुम्ही प्रवास कराल तेवढी तुमची जगाबद्दलची समज बदलत जाईल. तुम्ही 10 तासांचा विमान प्रवास करा, तुम्हाला जग बदललेलं दिसेल. शिक्षण वेगळं, संस्कृती वेगळी, चालिरिती, परंपरा वेगळ्या, लोक वेगळे, त्यांचे रंग-रूप वेगळे.. जेवढं लांब तुम्ही जाता तेवढ्या तुमच्या कक्षा वृंदावतात. प्रवास ही एक अशी गोष्ट आहे म्हणा ना की जेवढं तुम्ही त्यावर खर्च कराल तेवढं श्रीमंत व्हाल..
 
कौशल्य वाढवण्यासाठी विविध कोर्स करा
 
तुमच्याकडे जन्मजात जी कला किंवा कौशल्य आहे त्याला कोर्सेस अपग्रेड करण्याचं काम करतात. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही शिकलेले कोर्स तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासंबंधीचा प्रशिक्षणक्रम तुम्हाला ज्ञात असणं गरजेचं आहे. संभाव्य धोके किंवा नुकसान टाळण्यासाठी तसेच बिझनेसमध्ये भरभराट करण्यासाठी अतिशय रास्त दरात उपलब्ध असलेला स्नेहलनीतीचा स्टार्ट-अप टू स्केल अप हा कोर्स तुम्ही करू शकता.
आरोग्य सुधारा
तुमचा पैसा आणि वेळ तुमचं आरोग्य सुदृढ बनवण्यावर खर्च करा. ते म्हणतात ना ‘सर सलामत तो पगडी पचास’
ज्ञान दिल्याने वाढते
जर तुम्हाला एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर ती गोष्ट इतरांना शिकवा. शिकणं म्हणजे समजून घेणं.. पाठांतर करणं म्हणजे शिकणं नाही. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट इतरांना शिकवता तेव्हा ती तुम्हाला व्यवस्थित समजलेली असते.
तुमच्यातील कलेला वेळ द्या
 
अनेकांमध्ये सुप्त कला दडलेल्या असतात. परंतु, कामाच्या ओघात किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये त्यांना त्यांच्यातील कलेचा विसर पडतो. तुमच्यातील कला ही तुमच्या उत्पन्नाचं साधन देखील होऊ शकते. तेव्हा तुमच्या आयुष्यातील धूळ खात पडलेल्या त्या कप्प्याला पुन्हा नव्याने उजाळा द्या.    
ध्यानधारणा
दिवसभराच्या कामातून काही वेळ ध्यानधारणेसाठी जरूर काढा. त्यामुळे चित्त शांत होऊन नेहमीची कामे करताना अंगात उत्साह संचारतो. चिडचिड कमी होते. तणावापासून मुक्ती मिळते. मनाची एकाग्रता वाढून कामामध्ये संपूर्ण लक्ष केंद्रीत करता येते.