ब्रँड डेव्हलप कसा करायचा?

ब्रँड डेव्हलप कसा करायचा?

आज तुम्ही पाहिलंत तर जाहिरातीचा जमाना आहे. प्रत्येक जण जाहिरातीच्या माध्यमातून माझंच प्रोडक्ट किंवा ब्रँड कसा चांगला हे सांगण्याचा ओरडून ओरडून प्रयत्न करत असतो. तुम्ही टिव्ही लावा, मॅगझिन वाचा, पेपर बघा किंवा मोबाईल मध्ये डोकावून पहा. हे ब्रँड काही तुमचा पिच्छा सोडणार नाहीत. हे ब्रँड अगदी ढिगाने निर्माण झाले असले तरी त्यातले काहीच ब्रँड हे स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत किंवा लोकांच्या मनात घर करून आहेत. असं का होतं? असं होतं कारण काही ब्रँड लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता निर्माण करण्यात यशस्वी होतात. त्यांनी निवडलेली स्ट्रॅटेजी काम करते. म्हणूनच ब्रँडच्या यशासाठी आधी एक यशस्वी स्ट्रॅटजी बनवता आली पाहिजे. 
एवढ्या ब्रँडच्या गर्दीत ठळकपणे उठून दिसण्यासाठी तुम्हाला तुमचं स्थान निर्माण करावं लागेल आणि ते टिकवून ठेवावं लागेल. मार्केटींग किंवा जाहिरात करताना तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी शोधावं लागेल किंवा वेगळ्या पद्धतीने तुमचं म्हणणं मांडावं लागेल. जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसाल किंवा वेगळे वाटाल तेव्हाच तुमच्याकडे लोक आकर्षित होतील. तुमचा मेसेज हा तुमच्या टार्गेट कस्टमरला रुचेल किंवा आपलासा वाटेल असा असला पाहिजे. शिवाय हल्लीच्या पिढीला सुसंगत असा असावा. तुमच्या स्पर्धकांपेक्षा अधिक आणि वेगळे असे काय तुम्ही तुमच्या ब्रँडच्या माध्यमातून ग्राहकांना ऑफर करता हे देखील महत्त्वाचं आहे. 
ग्राहकांच्या अपेक्षा विचारात घेऊन, तुमची मेर्केटींग आणि रिसर्च टिम, सेल्सची टिम यांच्याशी सल्ला-मसलत करून प्रभावी प्लॅन आखून तो अंमलात आणा. मित्रांनो ब्रँड डेव्हलप करणं हा काही एक दिवस किंवा काही महिन्यांचा प्रश्न नाही तर ती एक प्रक्रिया आहे.. त्यासाठी तुम्हाला तुमचा बराचसा वेळ द्यावा लागेल, समर्पण वृत्तीने काम करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल.