ब्रँड म्हणजे काय?

ब्रँड म्हणजे काय?

ब्रँड म्हणजे नक्की काय? बिझनेस आणि मार्केटींग मध्ये ब्रँड हा शब्द प्रामुख्याने वापरला जातो. परंतु, प्रत्येकालाच या शब्दाचा अर्थ माहीत असेलच असं नाही. ब्रँड म्हणजे ज्याप्रकारेएखाद्या व्यक्तिचा, प्रोडक्टचा किंवा कंपनीचा अनुभव घेणारे लोक त्यांच्याबद्दल जागरूक असतात किंवा कॉन्शस असतात.. एखाद्या ब्रँडला डोळ्यासमोर आणा.. कोणतंही ब्रंड. आपल्यापैकी बरेच जण ॲपलचे फॅन असतील, त्यामुळे आपण ॲपलचं उदाहरण घेऊया. असे कोणतेही कंप्युटर्स, फोन, हेड फोन नाहीत ज्याशिवाय आपण जगू शत नाही. पण, ॲपल असे प्रोडक्ट्स बनवतं. आपण म्हणू शकतोब्रँड हे एक चिन्ह, लोगो, नाव, शब्द किंवा वाक्य आहे जे कंपन्या त्यांचे उत्पादन इतरांपेक्षा वेगळे ठरण्यासाठी वापरतात.
आजमार्केटमध्येहजारो उत्पादने आणि सेवांसह सर्व काही वेगाने कमोडिटाईज केले जात आहे.या सगळ्या गोंधळातून एखादाचब्रँड लक्ष वेधून घेतो, हेच त्या ब्रँडचं यश असतं. ब्रँडचंमार्केटींग, जाहिरात, प्रमोशनकशाप्रकारे केलं जातं यावर त्याच्यावरची लोकांची निष्ठा, विश्वास, किंवा मास-मार्केटअपीलउभं राहू शकतं. एक ब्रँड त्याच्यावर लोकांच्या असलेल्या विश्वासामुळे,तसेच त्याच्या विशिष्ट ओळखीमुळे मार्केटमधल्या इतर सारख्याच उत्पादनांपासून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करतो. त्याच्यातील याच वैशिष्ट्यांमुळेच त्यासाठी लोक जास्त पैसे देण्यासाठी सुद्धा तयार होतात. 
एका ब्रँडला त्याची स्वतंत्र ओळख, नाव, संस्कृती, दृष्टिकोन, भावना आणि बुद्धिमत्ता असते. हे सर्व ब्रँडचा मालक त्याला देत असतो आणिटार्गेटकस्टमरलाज्या उद्देशाने ब्रँडचीविक्री करण्याचा विचार केलेला असतो त्या उद्देशाला धरून राहण्यासाठी मालकाला सतत जागरूक रहावंलागतं. 
जर तुम्ही तुमच्या बिझनेसचा विचार करत असाल तर त्याची ओळख कशी निर्माण करण्यासाठी कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात ते पहा.
बिझनेसचं नाव काय?
त्याचं डिझाईन?
ते कशाप्रकारे संवाद साधेल? (ब्रँडपोझिशनींग)
त्याची मूल्ये कोणती आहेत आणि ती कशावर आधारित आहेत? (उदा. ब्रँड वचन)
ते कशाशी संबंधित आहे? (टार्गेटमार्केट)
ब्रँड सर्वांना माहीत आहे का? (तुमच्या ब्रँडबाबत लोक जागरूक आहेत का?)
ब्रँड आणि ब्रँडच्या नावातील फरक 
ब्रँड हे तुमच्या प्रोडक्टचंव्यक्तीमत्त्व असतं. पण, प्रत्येकवेळीब्रँडचं नाव हे त्या प्रोडक्टशीमिळतंजुळतंअसेलंच असं नाही.. जसं की ॲपल, युट्युब, नाईक, अमेझॉन या नावांवरून ही नावं नक्की कोणत्या प्रोडक्टशी संबंधित असू शकतात याचा बोध होत नाही जोवर आपण ब्रँडविषयी माहिती घेत नाही.