यु-ट्यूब साठी सोडलं शिक्षण, ‘हे’ आहेत भारतातील टॉप 3 युट्यूबर्स

यु-ट्यूब साठी सोडलं शिक्षण, ‘हे’ आहेत भारतातील टॉप 3 युट्यूबर्स

यु-ट्यूब हे खूप वेगात प्रसिद्ध झालेलं गुगल नंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं सर्च इंजिन आहे. दर मिनिटाला शेकडो तासांचे व्हिडिओ जगभरातून यु-ट्यूबवर अपलोड होत असतात. बिझनेसच्या प्रमोशनसाठी तसेच मनोरंजनाबरोबरच पैसे कमवून देणारं साधन म्हणूनही युट्यूबकडे पाहिलं जातं. टीव्ही शो, शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, म्युझिक व्हिडिओ, बातम्या, मुव्ही ट्रेलर, व्हिडिओ ब्लॉगींग, लाईव्ह स्ट्रीम्स असं सगळंच एकाच ठिकाणी पहायला मिळत असल्याने यु-ट्यूब वापरणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या ब्लॉगमध्ये आपण भारतातील टॉप 3 युट्यूबर्स बद्दल जाणून घेणार आहोत..   


1.    CarryMinati या नावाने अजय नागरचं युट्यूब चॅनल आहे. या चॅनलला भारतात सर्वाधिक सबस्क्रायबर्स आहेत. CarryMinati ला सध्या 29.5 मिलियन लोकांनी सबस्क्राईब केलं आहे. अजय हा फरिदाबादचा असून त्याचा जन्म 12 जून 1999 ला झाला. म्हणजे आता अजय फक्त 21 वर्षांचा आहे. वयाच्या 10 व्या वर्षीच त्याने युट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली होती. 2016 पर्यंत तो शाळेत गेला. त्यानंतर त्याच्या युट्यूब करियरसाठी त्याने शाळा अर्ध्यातच सोडून दिली. नापास होण्याच्या भीतीने तो 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसलाच नाही. त्यानंतर डिस्टन्स लर्नींगमधून त्यांने आपलं शिक्षण पूर्ण केलं. तो विनोदी तसेच विविध विषयांवरील त्याची मते प्रदर्शित करणारे व्हिडिओ शेअर करत असतो. शिवराळ भाषेमुळे त्याचा एक व्हिडिओ युट्यूबकडून डिलीट करण्यात आला होता.


2.    आशिष चंचलानी हा 27 वर्षांचा अभिनेता आणि विनोदी कलाकार आहे. त्याचा जन्म 8 डिसेंबर 1993 ला उल्हासनगर मध्ये झाला. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आणि विनोदाची आवड होती. युट्यूब चॅनलवर चांगला प्रतिसाद मिळू लागल्यावर त्याने युट्यूबलाच आपलं करियर बनवलं. सध्या त्याच्या युट्यूब चॅनलला 24.1 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.


3.    अमित भदाना हा 26 वर्षांचा तरुण या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. युट्यूबवर त्याला 22.8 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. 7 सप्टेंबर 1994 ला उत्तरप्रदेश मध्ये अमितचा जन्म झाला. 2012 मध्ये त्याने त्यांचं यूट्यूब चॅनल सुरू केलं तर 2017 पासून तो फुल टाईम युट्यूबर म्हणून काम करू लागला. 2018 मध्ये युट्यूबच्या टॉप 10 ग्लोबल व्हिडिओजमध्ये अमितच्या एका व्हिडिओचा समावेश होता. तो एक विनोदी कलाकार असून त्याचे बहुतेक व्हिडिओ विनोदी असतात.