कोरोनाच्या‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

कोरोनाच्या‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

कोरोनाची दुसरी लाट मागच्या वर्षीपेक्षा अधिक घातक असून मोठ्या प्रमाणात तसेच, जलद गतीने कोरोनाव्हायरसचे संक्रमण होत आहे. अशातच नागरिकांनी आपल्याला होणाऱ्याशारिरीक त्रासाकडे वेळीच लक्ष देऊन योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. या ब्लॉगमध्ये आपण कोरोनाव्हायरसची लागण झाल्यास   उद्भवणाऱ्या विविध लक्षणांची माहिती करून घेणार आहोत.

बिझनेस  कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये जुन्या व्हेरियंटच्या संसर्गाच्या तुलनेत खोकला आणि घसा खवखवणं, थकवा आणि स्नायूदुखी जास्त तीव्रपणे जाणवते.

 

यापैकी कोणतीही लक्षणं दिसू लागताच ताबडतोब चाचणी करून घेणं गरजेचं आहे. शिवाय, चाचणीचा अहवाल येईपर्यंत कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये.त्यांच्या कुटुंबियांनी देखील टेस्टचारिझल्टयेईपर्यंत घरीच थांबणं योग्य आहे.

  बिजनेसमधून भरपूर संपत्ती कशी कमवाल ? या स्नेहलनीतीच्या आगामी विनामूल्य वेबिनारसाठी नावनोंदणी करा...  व्हाट्सअप करा +91 93217 46252 किंवा इथे क्लिक करा 

तुम्हाला संसर्गाची लागण झाल्यापासून लक्षणं दिसेपर्यंत साधारण 5 ते 14 दिवसांचा वेळ लागू शकतो. तुमची टेस्टपॉझिटिव्ह आल्यास तुम्हीक्वारंटाईन होणं म्हणजेच अलगीकरणातरहाणं गरजेचं आहे. पुढील प्रक्रियेसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोरोनाव्हायरसचा शरीरातल्या विविध अवयवांवर परिणाम होऊ शकतो आणि त्याची वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात.

कोरोनाव्हायरसची लागण झाल्यास साधारण ५ प्रकारे लक्षणे दिसून येतात. सगळ्यांना सारखीच लक्षणे दिसून येतील असे नाही. पुढील पैकी तुम्हाला कोणती लक्षणे असल्यास त्वरीत खात्री करून घ्या.

तुमचा बिजनेस 10 पटीने वाढण्यासाठी स्नेहलनीतीचा 10X MBA ONLINE अँप 30 दिवसांसाठी विनामूल्य डाऊनलोड करा...

प्रकार १

डोकेदुखी, वास न येणं, स्नायूदुखी, खोकला, घसा खवखवणं, छातीत दुखणं, तापासारखी लक्षणं परंतु ताप नाही.

प्रकार २

डोकेदुखी, वास न येणं, खोकला, घसा खवखवणं, घसा बसणं, ताप, भूक न लागणं.

प्रकार ३

डोकेदुखी, वास न येणं, भूक न लागणं, अतिसार, घसा खवखवणं, छातीत दुखणं, खोकला नाही.

प्रकार ४

डोकेदुखी, वास न येणं, खोकला, ताप, घसा बसणं, छातीत दुखणं, थकवा येणं.

प्रकार ५

डोकेदुखी, वास न येणं, भूक न लागणं, खोकला, ताप, घसा बसणं, घसा खवखवणं, छातीत दुखणं, थकवा, गोंधळून जाणं, स्नायूदुखी

प्रकार ६

डोकेदुखी, वास न येणं, भूक न लागणं, ताप, खोकला, घसा बसणं, घसा खवखवणं, छातीत दुखणं, थकवा, गोंधळल्यासारखं वाटणं, स्नायूदुखी, धाप लागणं, अतिसार, पोटदुखी

 

यामध्ये अंगदुखी, थकवा, ताप, घसा खवखवणं, घसा बसणं ही लक्षणे जास्त प्रमाणात आढळून येतात.

उलट्या होणं, अतिसार वा पोट बिघडणं आणि पोटात दुखणं ही लक्षणं लहान मुलांमध्ये आढळल्यास ती कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची असू शकतात.

कोरोनापॉझिटिव्ह व्यक्तीला आढळणारी लक्षणं सौम्य असतील आणि इतर कोणतेही विकार नसतील, तर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच १४ दिवस क्वारंटाईन राहून कोरोनापासून मुक्ती मिळवू शकतात.