
कोरोनाव्हायरसच्यादुसऱ्या लाटेला आवर घालण्यासाठी संपूर्ण
महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून १५ दिवस म्हणजेच १ मे पर्यंतकडक
निर्बंध घालण्यात आले आहेत. या काळात संचारबंदी लागू करण्यात आली असून अत्यावश्यक
सेवा व अत्यावश्यक सेवेकऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक चालू रहाणार आहे. १३ एप्रिल
रोजी फेसबुकलाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या
जनतेशी संवाद साधला.
बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
·
या संपूर्ण १५ दिवसांच्या काळात अत्यावश्यक
कामांशिवाय कोणालाही घराबाहेर पडण्यास मनाई आहे. सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत
अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात येतील.
·
रुग्णालये, दवाखाने, औषधांची दुकाने, वैद्यकिय
सेवा, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, बेकऱ्या, लस उत्पादक कारखाने,
मास्क, जंतूनाशके, वैद्यकिय कच्चा माल, जनावरांशी संबंधित दवाखाने, शीतगृहे, हवाई
सेवा, रिक्षा, बस सुरू राहणार आहेत. पावसाळ्यापूर्वी करायची सर्व कामे सुरू
राहतील.
बिजनेसमधून भरपूर संपत्ती कशी कमवाल ? या स्नेहलनीतीच्या आगामी विनामूल्य वेबिनारसाठी नावनोंदणी करा... व्हाट्सअप करा +91 93217 46252 किंवा इथे क्लिक करा
·
वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके यांची छपाई आणि
वितरण सुरू राहिल.
·
ई-कॉमर्स सेवा केवळ अत्यावश्यक वस्तू आणि
सेवांच्या पुरवठ्यासाठी सुरू राहतील.
·
बँक सेवा, सेबीने मान्यता दिलेल्या सेवा सुरू
राहतील.
·
हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश असले तरीही पार्सलची
सेवा सुरूच राहणार आहे. अत्यावश्यक सेवेकरी तसेच गरीबांचे हाल होऊ नयेत यासाठी
हातगाडीवरील खाद्यविक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेतपार्सल सेवा सुरू
ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
·
चित्रपट गृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, तरणतलाव
(स्वीमिंग पूल) बंद राहतील.
·
चित्रपट, मालिका, जाहिराती यांचे चित्रीकरण बंद
राहिल.
·
या काळात मुख्यमंत्र्यांनी ५ हजार ४७६ कोटी
रुपयांचेपॅकेज जाहीर केले आहे.
·
गरीबांना ३ किलोगहू आणि २किलो तांदूळ महिनाभर
सरकारकडून देण्यात येणार आहेत. (७ कोटी जनतेला याचा लाभ मिळणार आहे.)
·
शिवभोजन थाळी १ महिना मोफत दिली जाणार आहे.
सुमारे २ लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे.
·
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रिय
विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रियदिव्यांगनिवृत्ती वेतन योजना अशा या
पाच योजनांतील लाभार्थ्यांना दोन महिन्यांसाठी प्रत्येकी १००० रु. आगाऊ सहाय्य
देण्यात येईल.
·
अधिकृत फेरीवाल्यांना १५०० रु. मदत दिली जाणार
आहे. रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
·
परवानाधारकरिक्षाचालकांना १५०० रु. मदत मिळणार
आहेत.
·
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना १५०० रु. अनुदान
म्हणून देण्यात येणार आहेत. १२ लाख नोंदणीकृत कामगारांना याचा लाभ घेता येईल.
·
आदीवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत
असलेल्या १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रतिकुटुंब २ हजार रु. देण्यात येणार आहेत.