आयुष्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी..

आयुष्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी..

मोठे निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला कोणती गोष्ट प्रेरित करते हे समजून घ्या. तुम्हाला आयुष्यापासून काय हवं आहे? हे स्वतःला विचारा. कारण ते माहीत करून न घेणं म्हणजे कुठे जायचं ते माहीत नसताना घरातून बाहेर पडण्यासारखं आहे. तुम्हाला सुंदर घर, आर्थिक सुरक्षा आणि कुटुंब हवंय की धाडसी आयुष्य जगायचंय, भरपूर काम करून भरपूर कमवायचंय की कमी पगार आणि भरपूर मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत तुम्ही खुश आहात? यामध्ये योग्य किंवा अयोग्य असं काही नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्याकडून काय हवंय यावर ते अवलंबून आहे.

 तुमचा बिजनेस 10 पटीने वाढण्यासाठी स्नेहलनीतीचा 10X MBA ONLINE अँप 30 दिवसांसाठी विनामूल्य डाऊनलोड करा...


हा छोटा निर्णय आहे की मोठा हे स्वतःला विचारा

तुम्ही तुमच्या एखाद्या निर्णयासाठी तुमचा किती वेळ आणि शक्ती खर्ची घालता, त्यावर तो निर्णय किती मोठा आहे किंवा महत्त्वाचा आहे हे अवलंबून आहे. तुम्ही घेतलेला एखादा मोठा निर्णय तुमचं कुटुंब, नाती, पैसे, सेव्हींग्ज, प्रतिष्ठा या सगळ्यावरच परिणाम करतो. असा निर्णय एकदा घेतल्यावर तुम्ही सहजासहजी मागे हटू शकणार नाही. पण, काही निर्णय असे असतात ज्यांच्यापासून पुन्हा सहजासहजी माघार घेता येते. तर, तुमचा निर्णय कोणत्या कॅटेगरीतला आहे हे ओळखा..

बिजनेसमधून भरपूर संपत्ती कशी कमवाल ? या स्नेहलनीतीच्या आगामी विनामूल्य वेबिनारसाठी नावनोंदणी करा...  व्हाट्सअप करा +91 93217 46252 किंवा इथे क्लिक करा 

छोटा निर्णय घेताना जास्त काळजी करू नका.

काही लोक स्वतः त्रास करून घेतात, तसेच त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा काळजीत टाकतात. एखाद्या छोट्या गोष्टीसाठी एवढी ऊर्जा खर्ची घालू नका.

जोखीम घेण्यासाठी तयार रहा      

जोखीम घेतल्याशिवाय तुम्ही आयुष्यात तुमचं इप्सित साध्य करू शकणार नाही. अविचाराने कोणतीही जोखीम घेऊ नका कारण त्यामुळे तुम्हाला दूरगामी परिणामांचा सामना करावा लागू शकतो.

बिझनेस करण्याचा किंवा इतर कोणतंही काम हाती घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी स्वअभ्यास करा. बऱ्याचदा काही लोक इतरांच्या बोलण्याने हुरळून जातात आणि स्वतः रिसर्च न करता सर्वस्वी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात किंवा आश्वासनांना बळी पडतात. तुम्ही तसं करू नका. स्वतः अभ्यास करून खात्री करून घ्या.

बिझनेस  कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा

तुमच्या भीतीवर विजय मिळवा..

अनेक जण भीतीपोटी अनेक मोठ्या संधी गमावून बसतात किंवा आत्मविश्वासाने व्यक्त होऊ शकत नाहीत. एकदा का तुम्ही तुमच्या भीतीला हरवलं की हे जग तुमचंच आहे. त्यामुळे भीतीपोटी कोणताही निर्णय घेऊ नका आणि कोणती गोष्ट नाकारूही नका.

भीतीप्रमाणेच अतिउत्साहीपणा सुद्धा तुम्हाला चुकीच्या मार्गाला घेऊन जातो. जेव्हा अतिउत्साही असाल तेव्हा कोणताही निर्णय घेऊ नका.

अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्या मित्राला सल्ला देताय. त्यामुळे होतं असं की मनातली भीती, अतिउत्साहीपणा जाऊन तुम्ही खरा तुमच्या फायद्याचा निर्णय घेऊ शकाल.