डिजिटल मार्केटींग.. बिझनेस वाढीसाठी जादूची कांडी

डिजिटल मार्केटींग.. बिझनेस वाढीसाठी जादूची कांडी

पूर्वी वर्तमान पत्र, मॅगझिन, टीव्ही केवळ या माध्यमांतून जाहिरात देण्याचा पर्याय खुला होता. मात्र, डिजिटल मार्केटींगचा उदय झाल्यापासून कमी खर्चात आणि कमी वेळेत अधिक लोकांपर्यंत पोहोचता येणे शक्य झाले आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इंटरनेट वापरणारे लोक एका दिवसामध्ये सरासरी 4 ते 6 तास ऑनलाईन असतात.
 डिजिटल मार्केटींग म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा इंटरनेटच्या माध्यमातून केलं जाणारं मार्केटींग. विशेष म्हणजे डिजिटल मार्केटींग केल्यास बिझनेसमध्ये झपाट्याने वाढ होते. कारण, तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसनुसार तुम्ही तुमच्या ग्राहकांना त्यांच्या वय, लिंग, शहरानुसार टार्गेट करू शकता. त्यामुळे प्रत्येक उद्योजकाने डिजिटल मार्केटींगचे महत्त्व ओळखून आपल्या व्यवसायात त्याचा वापर करून घेतला पाहिजे. बिल गेट्स यांनी देखील म्हटले आहे. “जर तुमचा बिझनेस इंटरनेटवर नसेल तर तो आऊट ऑफ बिझनेस होऊन जाईल.”
छोटा-मोठा असा कोणताही उद्योग डिजिटल मार्केटींगच्या मदतीने हव्या त्या ग्राहकांसोबत, हव्या त्या भागात पोहोचवता येतो. डिजिटल मार्केटिंग अत्यंत स्वस्त आहे. अगदी कमी किंमतीपासून तुम्ही जाहिरातीला सुरुवात करू शकता. त्याला कसा प्रतिसाद मिळतो त्यानुसार तुम्ही तुमचे कँपेनिंग करू शकता. उहादरणार्थ, पे पर क्लीक मार्केटिंग हा एक डिजिटल मार्केटींगचा प्रकार आहे. यालाच PPC (पीपीसी) असंही म्हणतात. यामध्ये, जेवढे ग्राहक तुमच्या जाहिरातीवर क्लीक करतात, तेवढेच पैसे तुम्हाला द्यावे लागतात. फेसबुक, ट्विटर, यूट्युब, इंस्टाग्राम ,लिंक्डीन, पिंटरेस्ट, स्नॅपचॅट, गुगल प्लस अशा विविध सोशल मीडिया साईट्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या बिझनेसचे मार्केटींग करू शकता. 
पुढील माध्यमांतून डिजिटल मार्केटींग करता येते.
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO)
सर्च इंजिन मार्केटिंग (SEM)
सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)
पे पर क्लिक मार्केटिंग (Pay Per Click Marketing)
डिस्प्ले मार्केटिंग (Display Marketing)
कन्टेन्ट मार्केटिंग (Content Marketing)
अफिलेट मार्केटिंग (Affiliate Marketing)
ई-मेल मार्केटिंग (Email Marketing)
विडिओ मार्केटिंग (Video Marketing)
व्हॉट्स-अप मार्केटींग.

स्नेहलनीतीच्या मदतीने तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्हाला या डिजिटल मार्केटींग सुविधांचा लाभ घेता येईल.

व्यवसाय छोटा असो किंवा मोठा आज प्रत्येक जण आपल्या व्यवसायाच्या प्रमोशन साठी डिजीटल मार्केटिंग करत आहे. 66% विक्रेत्यानचा असा विश्वास आहे की डिजीटल मार्केटिंग हे एक बिझनेस प्रमोशन साठी यशस्वी माध्यम आहे. जणू काही बिझनेस वाढीसाठी जादूची कांडीच आहे.