MBA तरुणी अंडा भुर्जीच्या गाडीतून करते लाखोंची उलाढाल.

MBA तरुणी अंडा भुर्जीच्या गाडीतून करते लाखोंची उलाढाल.

बाईकवरून किंवा कारमधून लांबचा प्रवास करत असताना आपण रस्त्यावर मध्येच थांबून अंडा भुर्जी खाल्ल्याचं तुम्हाला आठवत असेल.. पण, कधी तुम्ही मुलीला अंडा भुर्जीची गाडी चालवताना पाहिलं आहे का? मुळात महिला अशा प्रकारच्या व्यवसायांमध्ये पिछाडीवर असतात. या ब्लॉगच्या माध्यमातून आपण अंडा भुर्जीची गाडी यशस्वीरित्या चालवून तिचा विस्तार करून लाखोंची उलाढाल करणाऱ्या रुपाली विषयी जाणून घेणार आहोत..  
रुपालीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ती अनेकांपर्यंत पोहोचली आहे. कदाचित तुम्ही सुद्धा तिचे व्हिडिओ पाहिले असतील. MBA ची पदवी घेतलेली पुण्यातली रुपाली जाधव सध्या अंडा भुर्जीची गाडी चालवून यशस्वी व्यवसाय करत आहे. नोकरीत अडकण्यापेक्षा तिच्या मामाने सुरू केलेला व्यवसाय मामाच्या पश्चात तिने सांभाळला. आणि आज एक यशस्वी उद्योजिका बनली आहे. 

स्वतःचा नवा बिझनेस सुरू करण्याची इच्छा असल्यास विनामूल्य वेबिनारमध्ये सहभागी व्हा. 

रुपाली जाधव चालवत असलेल्या शिव मल्हार अंडा भुर्जी सेंटरची सोशल मीडियात चांगलीच चर्चा आहे.. ती आठवीत असल्यापासुनच तिने मामाच्या अंडा भुर्जीच्या व्यवसायात मदत करायला सुरुवात केली होती. मामाच्या अचानक झालेल्या निधनानंतर 2013 मध्ये रुपालीवर कुटुंबियांची जबाबदारी येऊन पडली. आज रुपालीच्या नेतृत्वाखाली शिव मल्हार अंडा भुर्जीच्या तीन गाड्या सध्या पुण्यात चालवल्या जात आहेत. डेक्कन कॉर्नर, सेंट्रल मॉलजवळ, कर्वे नगर या ठिकाणी या अंडा भुर्जीच्या गाड्या आहेत.
एवढे शिकल्यावर नोकरी का करत नाहीस? असा प्रश्न स्वाभाविकपणे लोक, नातेवाईक, रुपालीला विचारतात. परंतु; शिक्षणाचा उपयोग आपल्या व्यवसाय वाढीसाठी करत असल्याचं रुपाली सगळ्यांना प्रांजळपणे सांगते. मुलींनी आपल्या आई-वडीलांचा व्यवसाय पुढे न्यावा, वाढवावा असं रुपाली आवर्जुन सांगते. अनेक वृत्तपत्रांनी तिच्या कामाची दखल घेतली आहे. तिच्या या कामावर अनेकांनी यु-ट्युब व्हिडिओ बनवले आहेत, याचा देखील सकारात्मक परिणाम तिच्या कामावर दिसून येत आहे. थोडक्यात अंडा भुर्जीचा व्यवसाय करता करता आपल्या कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेणारी रुपाली स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे..