मराठी सेलिब्रिटी आणि त्यांचे बिझनेस..

मराठी सेलिब्रिटी आणि त्यांचे बिझनेस..

अनेक मराठी सेलिब्रिटींनी त्यांचे स्वतःचे बिझनेस सुरू केले आहेत आणि उद्योगक्षेत्रात आपली यशस्वी वाटचाल करत आहेत. रेस्टॉरंट, फॅशन ब्रँड्स, प्रोडक्शन हाऊस अशा विविध माध्यमांतून ते कार्यरत आहेत. खरंतर सेलिब्रिटी म्हटलं की, त्यांना फॉलो करणारा मोठा चाहतावर्ग असतो, त्यामुळे एखादा फॅशन ब्रँड किंवा युट्यु पेज सुरू केलं तर त्यांना अल्पावधितच असंख्य ग्राहकांपर्यंत पोहोचता येतं.

 10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


सई ताम्हणकर – ने नुकताच द सारी स्टोरी नावाची शॉपींग वेबसाईट सुरू केली आहे. तिची कॉलेजची खास मैत्रीण श्रृती भोसले सोबत तिने हा ब्रँड सुरू केला आहे. श्रृती आणि सई या दोघींनाही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांची आवड होती. आपल्या आवडीला त्यांनी व्यवसायाचं स्वरूप दिलं आहे.

 

क्रांती रेडकर – सध्या चर्चेत असते ती तिच्या दोन ब्रँड्स साठी. झिया झायदा हा तिचा महिलांसाठी क्लोदींग ब्रँड आहे. तिच्या जुळ्या मुलींचं नावं तिने आपल्या ब्रँडला दिलं आहे. तर क्रॅकर हा तिचा ज्वेलरी ब्रँड आहे. काकण या चित्रपटाचं दिग्दर्शन तसेच निर्मिती करून यापुर्वी तिने आपली दिग्दर्शकिय चुणूकही दाखवली होती. 

 

तेजस्विनी पंडीत, अभिज्ञा भावे – विविध सिनेमे आणि मालिकांमधून आपल्या भेटीला येणाऱ्या या दोन अभिनेत्रींनी तेजाज्ञा नावाचा फॅश ब्रँड सुरू केला आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या ब्रँडसाठी जाहिरात केली आहे. पारंपारिक आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही शैलींचा संगम त्यांच्या कपड्यांतून दिसून येतो.

 

श्वेता शिंदे - हिने 2016 मध्ये वज्र प्रोडक्शन एलएलपी नावाचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. या अंतर्गत तिने झी मराठीवरील लागीर झालं जी या मालिकेची निर्मिती केली होती. या मालिकेला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर तिने झी युवासाठी डॉक्टर डॉन या मालिकेची निर्मिती केली. या मालिकेने देखील अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली.

   

महेश कोठारे – हे आपल्या कोठारे व्हिजन या कंपनी अंतर्गत विविध यशस्वी मालिकांची निर्मिती करत असतात. सध्या स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभलं या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या आहेत. याआधी त्यांनी झी मराठीवरील जय मल्हार या प्रसिद्ध मालिकेची निर्मिती केली होती.

 

प्रिया मराठे – पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रिया मराठे हिला विविध पदार्थ बनवण्याची आवड आहे. लॉकडाऊनच्या काळात विविध रेसिपी ती तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत होती. मिरा रोड येथे तिने बॉम्बे फ्राईज नावाचा आपला कॅफे सुरू केला आहे.

 

प्रिया बेर्डे – प्रिया बेर्डे यांनी 2019 मध्ये पुण्यातील बावधान परिसरातील मराठा मंदिरजवळ आपलं चखले नावंचं रेस्टॉरंट सुरू करून उद्योजिका म्हणून आपला प्रवास सुरू केला. त्यांना विविध पदार्थ बनवण्याची आवड आहे. त्यांच्या या आवडीला त्यांनी व्यवसायाचं रूप दिलं. 

 

निवेदिता सराफ – या उत्तम अभिनेत्री बरोबरच उत्तम गृहिणी आणि सुगरण आहेत. त्यांना विविध पदार्थ बनवण्याची आवड असून त्यांनी आपलं यु-ट्युब चॅनल सुरू केलं आहे. यामध्ये त्या नियमित वेगवेगळ्या पाककृती शेअर करत असतात. याव्यतिरिक्त त्या हंसगामिनी नावाचा क्लोदींग ब्रँड देखील चालवतात.

 बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


सई लोकूर – बिग बॉस मराठीमधून घराघरात पोहोचलेली सई लोकूर हिने तिचा सांझ या नावाचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. याद्वारे ती स्वतः डिझाईन केलेल्या विविध दागिन्यांची विक्री करते. सई लोकूर ही अभिनेत्री बरोबरच इंटिरियर डिझायनरही आहे.

स्वप्नील जोशी – नकळत सारे घडले ही मालिका तसेच तुला कळणार नाही या सिनेमाची निर्मिती केली आहे.

मुक्ता बर्वे – ने आपलं रसिका प्रोडक्शन्स नावाचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं असून त्याअंतर्गत तिने अनेक नाटकांची निर्मिती केली आहे. यामध्ये छापा काटा, लव्हबर्ड्स, इंदिरा यांचा समावेश आहे. रुद्रम या मालिकेची निर्मिती देखील तिने केली होती.

 

शशांक केतकर – अभिनेता शशांक केतकरने पुण्यात आईच्या गावात या नावाचं आपलं रेस्टॉरंट सुरू केलं होतं. मात्र, काही वैयक्तिक कारणामुळे त्याला ते बंद करावं लागलं होतं.